Buttermilk Health Benefits: कडाक्याची उष्णता आणि कडक उन्हापासून वाचण्यासाठी आपण आपले शरीर वरून झाकतो. पण, शरीर निरोगी आणि आतून थंड ठेवण्यासाठी आपण पाण्यावरच जगतो. उन्हाळ्यात पाण्यासोबतच शरीराला निरोगी ठेवण्यासाठी हेल्दी पेय पिणेही आवश्यक आहे, जे या उष्णतेपासून वाचवतेच पण शरीराला थंड ठेवण्यासही मदत करू शकते. उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण विविध प्रकारची पेये घेतात. पण आज देसी पेय म्हणजे ताकाबद्दल जाणून घेऊयात. वास्तविक दहीपासून ताक तयार केले जाते. ताकामध्ये अ, ब, क आणि ई जीवनसत्त्वे सारखी अनेक प्रकारची पोषक तत्वे आढळतात. ताक हे एक सुपर हेल्दी पेय आहे, जे उष्णतेपासून संरक्षण करण्यास आणि शरीराला अनेक फायदे देते. चला तर मग जाणून घेऊया ताकाचे फायदे.

उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे

१. डिहाइड्रेशन – उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही ताकाचे सेवन करू शकता. ताक हे पोषक तत्वांचे भांडार आहे. त्यात मीठ, साखर, पुदिना टाकून प्यायल्याने डिहायड्रेशन, जुलाब आणि उष्णता टाळता येते.

(हे ही वाचा: मधुमेहाच्या रुग्णांनी दुपारच्या जेवणात करा ‘या’ गोष्टींचा समावेश! रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात)

२. पित्त – उन्हाळ्यात तेल, मसाले आणि तळलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने पचन बिघडते. अॅसिडिटी, पोटात जळजळ अशा तक्रारी असतील तर ताक सेवन करावे. जेवणानंतर ताक सेवन केल्याने आम्लपित्त आणि पोटात जळजळ होण्यापासून आराम मिळतो.

(हे ही वाचा: मधुमेहाच्या रुग्णांसाठी उसाचा रस फायदेशीर की धोकादायक? जाणून घ्या)

३. त्वचा- प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए हे गुणधर्म ताकामध्ये आढळतात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात रोज एक ग्लास ताक प्यायल्याने त्वचा निरोगी राहते.

(हे ही वाचा: Diabete: ‘या’ ३ वाईट सवयींचा मधुमेहाच्या रुग्णांना अधिक धोका! रक्तातील साखरेची पातळी सहज बिघडते)

४. लठ्ठपणा- लठ्ठपणा कमी करण्यासाठी रोज ताक प्या. ताकामध्ये कॅलरी आणि फॅट कमी असते. उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने चरबी लवकर जाळली जाऊ शकते.

(हे ही वाचा: Diabetes Diet: मधुमेहामध्ये साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आवर्जून खा ‘या’ ३ हिरव्या भाज्या!)

५. पोटदुखी, पोट खराब होणे आणि पोटात जळजळ होत असल्यास तुम्ही ताक सेवन करू शकता. त्यात काळे मीठ, पुदिना मिसळून प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(ही माहिती सामान्य ज्ञानाच्या आधारावर लिहिली आहे. गरजेनुसार तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)