ड्रायफ्रूट्स हे आरोग्यासाठी चांगले मानले जातात. वृद्ध असोत की लहान मुले, सर्व वयोगटातील लोकांना कोणत्याही समस्येमध्ये आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला दिला जातो. याबरोबरच सुका मेवा तुमच्या हृदयासाठीही चांगले असतात आणि ते तुमचे कोलेस्ट्रॉलही कमी करतात. ड्रायफ्रुट्स भिजवून खावेत असं आपण ऐकलं असेल, मात्र कोणते ड्रायफ्रुट्स भिजवून खावेत आणि कोणते खाऊ नयेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. यावर तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या…

‘हे’ ड्रायफ्रूट्स भिजवून खा

बदाम, मनुका, अक्रोड यासारखे ड्रायफ्रूट्स भिजवून खाणे अधिक फायदेशीर मानले जाते. लोकांना कच्च्या बदामाऐवजी भिजवलेले बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. भिजवलेले बदाम चघळायला आणि पचायला सोपे असतात आणि बदाम रात्रभर भिजवल्याने पचन प्रक्रियेत मदत करतात.

(हे ही वाचा: आंघोळीनंतर ओला टॉवेल गुंडाळून ‘सावरियाँ’ मधील रणबीरसारखं फिरता काय? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर )

‘हे’ ड्रायफ्रूट्स भिजवून खाऊ नयेत

काही ड्रायफ्रूट्स असे आहेत, जे भिजवून न खाल्लेच बरे असतात. त्यातील एक म्हणजे विशेषत: अक्रोडमध्ये आवश्यक फॅटी ऍसिड असतात, जी रात्रभर पाण्यात भिजवल्यानंतर कमी होऊ शकतात. त्यामुळे ते भिजवून खाण्याची गरज नाही. पिस्ता, खजूर काजू, अक्रोड, शेंगदाणे, यांसारखी ड्राय फ्रूट्स न भिजवता खाऊ शकतात. खजूर आणि मनुका हे असे ड्रायफ्रूट्स आहेत जे भिजवूनही खाऊ शकता आणि वाळलेल्या स्वरूपातही खाऊ शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे.)