मिसळ म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे मस्तपैकी शेव, कांदा, पाव आणि तर्री असलेली उसळ. अनेक ठिकाणी मिसळ करताना मटकी वापरली जाते. त्यामुळे अनेकांच्या आवडत्या कडधान्यांमध्ये मटकीचा आवर्जुन समावेश करण्यात येतो. परंतु या मटकीचा वापर केवळ भाजी किंवा उसळ करण्यापूरताच मर्यादित नसून ती खाण्यामागे अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात मटकी खाण्याचे काही फायदे. –

मटकी खाण्याचे फायदे

१. मलावरोध दूर करते

२. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहते.

३. सर्दी, पडसे, कफ या विकारांत मटकीच्या उकळलेल्या पाण्याचा उपयोग करावा.

४. मधुमेह असल्याच मोड आलेली मटकी खावी.

५. मटकीतील पोटॅशियममुळे रक्तवाहिन्या सुरळीत काम करतात व रक्तदाब नियंत्रित ठेवतात.

६.मटकी लोहचा स्रोत असल्याने अँनिमियापासून संरक्षण मिळते.

७. झिंकमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते

या आजारात मटकी खाऊ नये

१. वातविकारात

२. अजीर्ण, अपचन

३. उदरवात, पोटदुखी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४. मूळव्याध, आतडय़ाची सूज