काही तासांतच रमजानचा महिना संपेल आणि ईदचे सेलिब्रेशन सुरु होईल. ईदसाठी बाजार सजला असताना आता त्यात आणखी एक भर पडली आहे. ईदच्या निमित्ताने BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर जाहीर केली आहे. त्यामुळे एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्याबरोबरच इतरही अनेक लाभ घेता येणार आहेत. Eid Mubarak STV 786 असे या ऑफरचे नाव असून बीएसएनएलच्या सर्व ग्राहकांना त्याचा लाभ घेता येणार आहे. २जी, ३जी आणि ४ जी सुविधा वापरणाऱ्या सगळ्यांना ही रिचार्ज करता येतील.

या खास प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज १०० मेसेज एकूण ३०० जीबी डेटा १५० दिवसांसाठी मिळणार आहे. म्हणजेच रोज २ जीबी डेटा देण्यात येईल. व्हॉईस कॉलिंग मोफत असेल तरेच मुंबई आणि दिल्ली या सर्कलमध्ये ग्राहकांना मोफत कॉलिंग करता येणार आहे. १२ जूनपासून २६ जूनपर्यंत ग्राहकांना या प्लॅनचा लाभ घेता येणार आहे. या प्लॅनची किंमत ७८६ रुपये इतकी आहे. मागील वर्षीही कंपनीने याच किंमतीचा एक प्लॅन आणला होता. मात्र त्यामध्ये इंटरनेट डेटा कमी मिळत होता. तसेच मोफत मेसेजची सुविधाही नव्हती. याबरोबरच त्या प्लॅनची वैधता केवळ ९० दिवसांची होती. या प्लॅनशिवायही बीएसएनएलने नुकताच आणखी एक इंटरनेट प्लॅन लाँच केला होता. त्यामध्ये ग्राहकांना रोज ४ जीबी डेटा मिळत होता.