Home Remedies For Swollen Fingers : हिवाळ्यात मौसमी आजारांचा धोका वाढतो. खोकला, सर्दी, ताप याशिवाय त्वचेशी संबंधित समस्या अधिक आहेत. विशेषतः हिवाळ्यात लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात लहान मुलांच्या हाताची बोटे अनेकदा सुजतात. म्हणूनच तज्ञ लहान मुलांना हिवाळ्यात उबदार कपडे घालण्याचा सल्ला देतात, थंड पाण्याचा संपर्क टाळण्यासाठी आणि लोकरीचे हातमोजे घालण्यासाठी सांगतात. तसंच त्यांच्या बोटांवर सूज येत आल्याने खाज सुटणे आणि जळजळ होणे असा त्रास होत असतो. हे त्यांच्यासाठी वेदनादायक असू शकते. अशा परिस्थितीत हिवाळ्यात लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. काही खबरदारी आणि काही घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही लहान मुलांच्या बोटांना सूज येण्याच्या समस्येपासून मुक्त करू शकता. जर हिवाळ्यात तुमच्या लहान मुलांचे बोटे सुजत असेल तर सोपे घरगुती उपाय करून तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हळदीने सूज दूर करा
हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी हळद फायदेशीर आहे. वेदना आणि जळजळीची समस्या हळदीने दूर केली जाऊ शकते. थंडीमुळे बोटे सुजत असतील तर हळद पावडर ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळून सूजलेल्या भागावर लावा. काही वेळाने बोट स्वच्छ पाण्याने धुवा. या उपायाने हात-पायांची सूज दूर होऊ शकते.

आणखी वाचा : Relationship Tips : ब्रेकअपनंतरही जोडीदाराची आठवण येते? मग या टिप्स घेऊन नव्याने सुरुवात करा

लसूण आणि मोहरीच्या तेलाची मसाज
लहान मुले असोत की मोठी, मोहरीच्या तेलाची मालिश सर्व वयोगटातील व्यक्तींच्या बोटांची सूज दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. लहान मुलांच्या हाताच्या बोटांची सूज दूर करायची असेल तर मोहरीच्या तेलात लसणाच्या कळ्या टाकून कोमट करा. नंतर ते प्रभावित भागावर लावून मसाज करा. मोहरीच्या तेलाची लसणाने मसाज केल्यानेही खाज सुटण्यापासून आराम मिळतो.

आणखी वाचा : Beauty Tips : मान काळी पडलीय? ‘हा’ घरगुती उपाय करा, नक्की होईल फायदा

सैंधव मीठ जळजळ दूर करतं
बोटांवरील सूज कमी करण्यासाठी सैंधव मीठाचा वापर केला जाऊ शकतो. हात-पायांची सूज दूर करण्यासाठी मोहरीच्या तेलात एक चमचा सैंधव मीठ मिसळून गरम करा. हे मिश्रण सुजलेल्या भागावर लावा. काही वेळाने कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे सूज आणि खाज दोन्ही समस्या दूर होतात.

आणखी वाचा : Health Tips : तुमच्या अशा सवयींमुळे स्वादुपिंड खराब होतो, गंभीर समस्यांचा धोका वाढतो

कांदा जळजळ कमी करतो
आयुर्वेदानुसार कांद्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. कांद्यामध्ये आढळणारे एंटीसेप्टिक आणि अँटीबायोटिक गुणधर्म शरीरातील सूज कमी करतात. तसंच खाज सुटण्यापासून आराम देतात. लहान मुलांच्या बोटांची सूज कमी करण्यासाठी कांद्याचा वापर करत असाल तर कांद्याचा रस सुजलेल्या भागावर लावा. काही वेळाने स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा.

आणखी वाचा : Hair Care Tips : जर तुम्ही हेअर एक्सटेंशन वापरत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा

लिंबूमुळे जळजळीपासून आराम मिळेल
हिवाळ्यात अनवाणी राहिल्याने मुलांचे पाय थंड होतात आणि सुजतात. लिंबाचा वापर करून जळजळ कमी करता येते. कोमट पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा आणि कापसाच्या मदतीने सूज वर लावा. त्यामुळे सुजलेल्या बोटांना आराम मिळतो.

खोबरेल तेलात कापूर लावा
खोबरेल तेल शरीराची आणि बोटांची सूज कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे. जळजळ झाल्यामुळे खाज येते. शरीरावर लालसरपणा सुरू होतो. अशा परिस्थितीत खोबरेल तेल आणि कापूर हे दोन्ही अँटी-इंफेक्टंट म्हणून उपयुक्त ठरू शकतात. हे मिक्स करून प्रभावित भागावर लावल्याने वेदना आणि सूज कमी होऊ शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fitness health tips home remedies for swollen fingers winter care tips prp
First published on: 19-01-2022 at 22:18 IST