Uric Acid: युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते, शरीरातील युरिक ऍसिड हे मुख्यतः किडनीच्या मार्फत फिल्टर होऊन मलमूत्रातून बाहेर पडते पण जेव्हा किडनीची कार्यक्षमता कमी होते तेव्हा युरिक ऍसिड शरीरात छोट्या खड्यांसारखे जमा होते. डॉ. अमरेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार शरीरात युरिक ऍसिड वाढल्याने सांधे दुखीचा त्रास सुरु होतो, विशेषतः उठताना बसताना या व्यक्तींना सतत आधार घ्यावा लागतो व तरीही वेदना कमी होत नाहीत. बोटांना सूज येणे, गाठ झाल्याचे वाटणे, हातापायाच्या बोटांमध्ये सतत काहीतरी टोचतंय असं वाटणे ही सर्व युरिक ऍसिड वाढल्याची लक्षणे आहेत. तुम्हालाही सतत थकवा जाणवत असल्यास युरिक ऍसिडचे प्रमाण वाढणे हे मुख्य कारण असू शकते.

युरिक ऍसिड जसे वाढते तसेच ते कमी करणे सुद्धा आपल्याच हातात आहे. आहारावर नियंत्रण ठेवून आपणही या समस्यांवर मात करू शकता. युरिक ऍसिडची समस्या जाणवणाऱ्या व्यक्तींनी बीफ, बेकन, मटण याचे सेवन टाळावे असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात, या पदार्थांच्या पचनासाठी शरीराची अधिक ऊर्जा खर्च होते तसेच रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाणही बूस्ट होते. याशिवाय आईस्क्रीम, सोडा व फास्टफूडचे सेवनही कमी करावे. तुम्हाला ठाऊक आहे का की काही असे नैसर्गिक पदार्थ सुद्धा आहेत ज्यामुळे युरिक ऍसिडचे प्रमाण अचानक वाढते, हे पदार्थ कोणते व त्याचा नेमका कसा परिणाम होतो हे आपण जाणून घेऊयात..

शरीरातील युरिक ऍसिड वाढवतात ‘ही’ ३ फळे

चिंच

युरिक ऍसिडमुळे होणारे त्रास कमी करायचे असतील तर चिंच खाणे टाळावे. चिंचेच्या असणाऱ्या फ्रुक्टोजमुळे शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाणे वाढते, त्यामुळे चिंच ही युरिक ऍसिडचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. याशिवाय अधिक आम्ल असणाऱ्या पदार्थांचे सेवनही कमी करावे.

खजूर

युरिक ऍसिडचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी खजुराचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. खजूरात प्यूरीनचे प्रमाण कमी व फ्रुक्टोजचे प्रमाण अधिक असते. यामुळे रक्तातील फ्रक्टोज व परिणामी युरिक ऍसिड वाढू लागते.

चिकू

चिकू हा अनेक आजारांवर उपाय असला तरी युरिक ऍसिडच्या समस्या असल्यास या फळाचे सेवन टाळावे. चिकुमधील फ्रुक्टोजमुळे शरीरात युरिक ऍसिड वाढते त्यामुळे चिकूचे सेवन शक्यतो टाळावे किंवा कमी करावे.

Ayurveda Tips: जेवणानंतर आंघोळ का करू नये? अपचनाचा त्रास असलेल्यांनी आयुर्वेदातील हे उत्तर जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, युरिक ऍसिडचा त्रास आपल्याला होत असल्यास किंवा वरीलपैकी कोणतेही लक्षण जाणवत असल्यास याकडे दुर्लक्ष करू नका. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल.