शारीरिक संबंधादरम्यान किंवा नंतर अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. याला सेक्स डोकेदुखी (sex headache) म्हणतात. सामान्य स्थितीत हे चिंताजनक नाही, परंतु जर ते सतत होत असेल तर ते मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते. सेक्स करतेवेळी जसजसा उत्साह वाढतो, तसतसा डोक्यावर आणि मानेवर दबाव त्याचा दबाव वाढतो. काही लोकांना सेक्सच्या आधी किंवा नंतर तीव्र डोकेदुखीचा त्रास होतो. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमण्या नीट काम करत नसल्याने असे घडते.

सेक्स हेडकची लक्षणे

मेयो क्लिनिकच्या मते सेक्स हेडकचे दोन प्रकार आहेत.

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
Loksatta editorial about 33 loss making firm donated electoral bonds to various parties
अग्रलेख: दे दान; कोणते ‘गिऱ्हाण’?
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

१) डोके आणि मानेमध्ये लैंगिक उत्साह वाढत जातो, तसतशी वाढणारी वेदना

२) सेक्स करण्यापूर्वी किंवा सेक्स केल्या नंतर अचानक होणारी डोकेदुखी.

काही लोकांना दोन्ही प्रकारच्या वेदना होतात. या वेदना काही मिनिटे तर कधी कधी दोन-तीन दिवसांपर्यंत राहू शकतात. जेव्हा परिस्थिती अधिकच बिघडते तेव्हा एखादी व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते, उलट्या होऊ शकतात आणि इतर न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात. ज्यांना आधीच मायग्रेनची तक्रार आहे त्यांना हा धोका जास्त असतो. सेक्स हेडेक स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक सामान्य आहे.

डॉक्टरांना कधी भेटायचे?

साधारणपणे, कोणतीही डोकेदुखी ही फार चिंताजनक नसते, परंतु सेक्स करताना डोकेदुखी होत असेल तर नक्कीच डॉक्टरांना भेटा. नाहीत ही वेदना ६ महिने आणि १ वर्षासाठी देखील त्रास देऊ शकते. जर तुम्हाला अशक्तपणा, बेशुद्धी, मळमळ, मानेत वेदना यांसारखी कारणे दिसत असतील तर डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.

( हे ही वाचा: भाजलेले चणे खाल्ल्याने Blood Sugar झपाट्याने कमी होईल; खाण्याची पद्धत जाणून घ्या)

सेक्स हेडेकची कारणे

सेक्स करतेवेळी डोक्याच्या आतली धमणी फुलायला लागते किंवा त्यामध्ये बुडबुडा निर्माण होतो. कधीकधी या भिंतीतून रक्तस्त्राव सुरू होतो. यामुळे स्ट्रोक येण्याची शक्यता असते. तसंच काही औषधांचा वापर, जसे की गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापरामुळे देखील ही डोकेदुखी वाढू शकते. काही संसर्गामुळे येणारी सूज हे देखील डोकेदुखीचं कारण ठरु शकते.

सेक्स हेडेकपासून बचाव कसा करता येईल?

सेक्स हेडेक टाळण्यासाठी, ऑर्गेजम होण्यापूर्वी सेक्स थांबविण्याचा सल्ला दिला जातो. तसंच दररोज असे व्यायाम नियमितपणे केले पाहिजेत ज्यामुळे डोके, मान आणि खांद्याच्या स्नायूंना आराम मिळेल. त्याचप्रमाणे संयमाने संभोग करा. नियंत्रणाबाहेर गेलेल्या लोकांमध्ये सेक्स हेडेक सामान्य आहे. तसंच परिस्थिती जास्तच बिघडण्यापूर्वी डॉक्टरांकडे गेलेलं कधीही चांगलं. वैद्यकीय मदतीने यापासून वेळीच सुटका मिळवू शकतो.