गर्भधारणेदरम्यान, काही महिलांना त्यांच्या शरीरात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे गर्भधारणेचा मधुमेह होऊ शकतो. ज्या स्त्रियांना मधुमेह नाही त्यांनाही हे होऊ शकते. अमेरिकेत दरवर्षी २ ते १०% स्त्रिया गरोदरपणात या मधुमेहाच्या बळी ठरतात. महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्यासोबतच गर्भधारणेचा मधुमेह हा गर्भातील बाळासाठी धोकादायक ठरतो. यावर उपचार न केल्यास प्रसूतीनंतर महिलांमध्ये टाइप २ मधुमेह होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.

अमेरिकन सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या अहवालानुसार, गर्भधारणेदरम्यान काही स्त्रिया शरीरासाठी आवश्यक इन्सुलिन तयार करू शकत नाहीत आणि त्यांना गर्भावस्थेतील मधुमेहाचा त्रास होतो. इन्सुलिन हे आपल्या रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते. हा मधुमेह सामान्यतः गर्भधारणेच्या २४ व्या आठवड्यात विकसित होतो. म्हणून, २४ ते २८ आठवड्यांच्या दरम्यान मधुमेहाची चाचणी घेणे फार महत्वाचे आहे. गर्भधारणेदरम्यान, शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. या बदलांमुळे शरीरात इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता निर्माण होते आणि रक्तातील साखर राखण्यासाठी अतिरिक्त इन्सुलिनची गरज भासते. ज्या महिलांचे शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही, त्या या मधुमेहाला बळी ठरतात.

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
People with diabetes Can Eat roasted or baked snacks Is this safe for blood sugar patients Need To Know What To Eat
मधुमेही रुग्णांनी ‘या’ पदार्थाचे सेवन केल्यास नियंत्रित राहील रक्तातील साखर; वाचा तज्ज्ञ काय सांगतात…

‘टाइप ३’ मधुमेहाचा मेंदूच्या आरोग्याशी थेट संबंध? वाढू शकतो मानसिक आजारांचा धोका

गर्भावस्थेतील मधुमेहाची लक्षणे सहसा दिसत नाहीत. वेळोवेळी केलेल्या चाचण्यांद्वारेच ते शोधले जाऊ शकते. या मधुमेहामुळे, सुमारे ५०% स्त्रियांना टाइप २ मधुमेह होतो. तथापि, आवश्यक पावले उचलून, मधुमेह होण्याचा धोका टाळता येऊ शकतो. गर्भावस्थेतील मधुमेहामुळे स्त्रियांमध्ये रक्तदाब वाढू शकतो. रक्तातील साखर कमी असू शकते. बाळाचे वजन खूप वाढू शकते, ज्यामुळे प्रसूतीमध्ये समस्या निर्माण होतात.

महिलांनी अशाप्रकारे करावा स्वतःचा बचाव

  • गर्भधारणेपूर्वी वजन नियंत्रित करा. तुमचे वजन जास्त असल्यास ते कमी करण्याचा प्रयत्न करा. गर्भधारणेदरम्यान वजन कमी होणे धोकादायक आहे. गरोदरपणात हे अजिबात करू नका.
  • गरोदरपणाच्या २४ व्या आठवड्यात गर्भधारणेचा मधुमेह विकसित होतो. अशा परिस्थितीत २४ ते २८ आठवड्यांच्या दरम्यान मधुमेहाची चाचणी करून घ्या. याआधीही चाचणी करता येते.
  • सकस आहार घेऊन तुम्ही ही समस्या टाळू शकता. याशिवाय गरोदरपणात सक्रिय असणं खूप महत्त्वाचं आहे. हलक्या शारीरिक हालचालींमुळे या आजाराचा धोका कमी होतो.
  • काही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या. अशा स्थितीत घरगुती उपचार करण्याचा प्रयत्न करू नका.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)