Body Swelling Remedies: हात-पायांवर सूज येणे ही सामान्य समस्या आहे. ही कोणालाही होऊ शकते. मात्र, तुमच्या हात, पाय किंवा शरीरावर सतत जर सूज येत असली तर ते चांगले नाही. ही काही आजाराची लक्षणे देखील असू शकतात. स्वेलिंगची लक्षणे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असू शकतात. काही लोकांना त्यांच्या चेहऱ्यावर सूज येते, तर काहींना त्यांच्या हात आणि पायांवर सूज येते. कधी कधी ही सूज हातपायांवर झालेल्या जखमांमुळे देखील असू शकते. शरीरात सूज अनेक कारणांमुळे असू शकते. ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. चला जाणून घेऊया या सोप्या उपायांबद्दल.

शरीरातील सूज कमी करण्याचे उपाय

  • शरीरातील सूज कमी करण्यासाठी दररोज तुळशीची ३ ते ४ पाने खावीत. यामुळे सूज कमी होईल. याशिवाय तुम्ही तुळशीचा चहाही घेऊ शकता.
  • सूज कमी करण्यासाठी कोमट पाण्यात चिमूटभर मीठ टाका. जर तुमचे संपूर्ण शरीर सुजले असेल तर पाण्यात मीठ टाकून आंघोळ करा. याने सूज बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

( हे ही वाचा: Viral Infection: बदलत्या ऋतूत वाढतोय व्हायरल इन्फेक्शनचा धोका; ‘ही’ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावधान)

swelling in hands and toes
हातापायांची बोटे अचानक सुजू लागली आहेत? तर ‘या’ ५ प्रकारे उपचार करा, मिळू शकतो त्वरित आराम
inflammation in body
सकाळी उठल्यावर तुमचा चेहराही सुजलेला दिसतो? तर यामागे असू शकतात ‘ही’ गंभीर कारणे, जाणून घ्या
SaReGaMaPa Little Champs Winner singer Kartiki Gaikwad home photos
लवकरच आई होणाऱ्या कार्तिकी गायकवाडचं घर आहे खूपच सुंदर, पाहा फोटो
mohena kumari welcomes baby girl
प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलंय लग्न
  • अंबाडीच्या बिया सूज कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. तुम्ही त्यांचा अनेक प्रकारे वापर करू शकता. उदाहरणार्थ, जवसाचे पाणी, भाजलेली जवस आणि चहा खूप उपयुक्त ठरेल.
  • सूज कमी करण्यासाठी मोहरीचे तेल गरम करा. या तेलाने शरीराला मसाज करा. असं केल्यास बराच फायदा होईल.
  • हात-पायांवर खूप सूज येत असेल तर कोथिंबीरीचे पाणी प्या. याने सुजेवर नियंत्रण राहील.
  • सूज कमी करण्यासाठी जेवणात खोबरेल तेल वापरा. तसेच या तेलाने शरीराची मालिश करा. याने सुजेवर त्वरित आराम मिळेल.