Side effects of Eating Pistachios: काजू बदामापेक्षा अनेकांना पिस्ता जास्त आवडीचा असतो. गोड व चटपटीत चवीचा पिस्ता भलेही काजू बदामाप्रमाणे मुबलक प्रमाणात खाल्ला जात नसला तरीही अनेक पदार्थांमध्ये पिस्त्याला खास मान असतो. केशर पिस्ता आईस्क्रीमचे क्रेझ तर प्रत्येक सीझनमध्ये कायम असते. केवळ चवीलाच नव्हे तर पिस्ता हा आरोग्यासाठी सुद्धा तितकाच फायदेशीर आहे. हेल्थ लाईनच्या माहितीनुसार पिस्त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. तसेच व्हिटॅमिन बी ६, बी १, प्रोटीन व फायबरही भरपूर असते. पिस्ता हा कमी कॅलरीमुळे सुद्धा फायद्याचा मानला जातो. इतके फायदे असूनही पिस्ता काही मंडळींसाठी मात्र विषासारखे काम करू शकतो. आज आपण नक्की कोणत्या परिस्थितीत पिस्ता खाणे टाळावे व नेमका किती प्रमाणात पिस्ते खावे हे जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिस्ता खाल्ल्याने होणारे त्रास

उच्च रक्तदाब

हेल्थ लाईनच्या माहितीनुसार, पिस्ता खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची समस्या बळावू शकते. तसेच चक्कर येणे, अंधुक दिसणे, बेशुद्ध होणे असेही त्रास पिस्त्याचे सेवनाने होऊ शकतात. अनेकांना खारे पिस्ते आवडतात पण अगोदरच पिस्त्याची चव काहीशी खारट असते त्यात त्यावर प्रक्रिया केल्याने यातील सोडियमचे प्रमाण वाढू शकते. अतिरिक्त मीठ पोटात गेल्याने उच्च रक्तदाब होण्याचं शक्यता असते. त्यामुळेच बीपीशी संबंधित तक्रारी असल्यास तुम्ही पिस्त्याचे सेवन टाळावे किंवा अगदी कमी करावे.

अपचन, ऍसिडिटीच्या समस्या

पिस्त्यातमध्ये फायबर तत्व मुबलक असतात. फायबर हा खरंतर तुमच्या पचनक्रियेस चालना देणारा घटक आहे. मात्र प्रमाणाच्या बाहेर फायबर शरीरात गेल्यास यातून बद्धकोष्ठ. आतड्यांना सूज व वेदना, इरिटेबल बाउल सिंड्रोम असे त्रास होऊ शकतात. पिस्त्यामध्ये असणारे फ्रुक्टेन हे गॅस्ट्रोइन्टेस्टाइनल मार्गात ऍलर्जी निर्माण करू शकते, यामुळे चुकूनही रिकाम्या पोटी पिस्ता खाऊ नये.

मळमळ व तोंडाचे विकार

तज्ज्ञांच्या माहितीनुसार जर तुम्हाला नट्सची म्हणजेच सुक्या मेव्याची ऍलर्जी असेल तर चुकूनही पिस्ता खाऊ नये. अन्यथा अशा मंडळींना तोंडाच्या आतील भागात खाज, मळमळ, श्वसनाच्या समस्या व मुख्य म्हणजे अन्न गिळण्यास त्रास होऊ शकतो.

किडनी स्टोनचा धोका

पिस्ता हा ऑक्सलेट व मेथियोनीन यांचा साठा असतो. या सत्वांचा शरीरात अधिक प्रमाणात प्रवेश झाल्यास यातून कॅल्शियम वाढून मुतखड्याचे त्रास उद्भवू शकतात. तुम्हाला अगोदरच मुतखड्याचा त्रास असल्यास पिस्त्याचे सेवन टाळणेच हिताचे ठरेल.

हे ही वाचा<< बदाम खाल्ल्याने ‘हे’ ४ त्रास १०० च्या वेगाने वाढू शकतात! एका दिवसात किती व कसे बदाम खाणे आहे योग्य?

कॅन्सरचा धोका

तज्ज्ञांच्या माहितीनुआर, भाजलेला किंवा प्रक्रिया केलेला पिस्ता खाल्ल्याने शरीरात कॅन्सरचा धोका बळावण्याची शक्यता असते. जेव्हा उच्च तापमानात पिस्ता भाजला जातो तेव्हा त्याचे सेवन केल्यावर शरीरात कार्सिनोजेन एक्रिलामाइड्स पेशींची वाढ होऊ लागते. या पेशी कॅन्सरला कारणीभूत असणाऱ्या मुख्य घटकांपैकी एक आहेत.

किती प्रमाणात पिस्ता खाणे आहे योग्य?

नोएडाच्या अपोलो हॉस्पिटलचे एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉक्टर बी. के. रॉय यांच्या माहितीनुसार, वरील आजार नसणाऱ्या सुदृढ माणसाला प्रत्येक दिवशी १५ ते २० ग्रॅम पिस्ता खाण्यास काहीही हरकत नसते. तसेच अन्यही सुका मेवा हा जवळपास ४० ग्रॅम इतक्या मर्यादेत खाऊ शकता.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pistachio can cause big problems in these 5 conditions how much nuts are okay to eat in a day health news svs
First published on: 05-12-2022 at 13:26 IST