Almonds Can Cause Huge Problem in 4 Situations How Much Nuts Are Okay To eat in One Day Lifestyle Health news | Loksatta

बदाम खाल्ल्याने ‘हे’ ४ त्रास १०० च्या वेगाने वाढू शकतात! एका दिवसात किती व कसे बदाम खाणे आहे योग्य?

Almond Side Effects: तज्ज्ञांच्या माहितीनुसार काही आजारात बदाम हा एखाद्या विषारी घटकाप्रमाणे शरीरात काम करू शकतो. हे आजार कोणते व कोणत्या रुग्णांनी बदामाचे सेवन टाळायला हवे..

बदाम खाल्ल्याने ‘हे’ ४ त्रास १०० च्या वेगाने वाढू शकतात! एका दिवसात किती व कसे बदाम खाणे आहे योग्य?
एका दिवसात किती बदाम खाणे आहे योग्य? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Almond Side Effects: बदामाचे शरीरासाठीचे फायदे आपण सर्वच जाणतो. आपल्या शरीराला बदामाचे पोषण मिळावे म्हणून आईच्या पोटात असल्यापासूनच प्रयत्न सुरु असतात. गर्भावस्थेत महिलांना बदामाचे सेवन आवर्जून करण्याचा सल्ला अनेक आहारतज्ज्ञ देतात. इतरही वेळेस आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास, हृदयाच्या स्वास्थ्यासाठी बदाम खाणे फायद्याचे मानले जाते. मात्र तुम्हाला माहीत आहे का बदामाचे अधिक सेवन शरीराला फायद्यापेक्षा अधिक नुकसान पोहचवू शकते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार काही आजारात बदाम हा एखाद्या विषारी घटकाप्रमाणे शरीरात काम करू शकतो. हे आजार कोणते व कोणत्या रुग्णांनी बदामाचे सेवन टाळायला हवे हे आता आपण जाणून घेऊयात…

तुम्हाला बदामाचा कितपत धोका?

१) किडनी स्टोन

प्राप्त माहितीनुसार बदामात ऑक्सलेटचे प्रमाण अधिक असते, हा घटक पचनास कठीण असतो परिणामी बहुतांश वेळेस शरीर त्याचे पचन पूर्ण करत नाही व किडनीमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण वाढीस लागते. अशा परिस्थितीत मुतखड्याचा त्रास बळावण्याची शक्यता असत , जर आपल्याला अगोदरच किडनी स्टोनचे निदान झाले असेल तर अशा मंडळींनी तर बदामापासून दोन हात लांबच राहणे हिताचे ठरेल.

२) त्वचेच्या अॅलर्जी

बदामात अमांडाइन नावाचे प्रोटीन अधिक प्रमाणात असते. हे प्रोटीन काहींच्या शरीराला साजेसे ठरत नाही उलट याचा गंभीर परिणाम तुमच्या त्वचेवर दिसून येऊ शकतो. त्वचा तज्ज्ञांच्या माहितीनुसार ज्यांना अॅलर्जीचा त्रास आहे त्यांनी वैद्यकीय सल्ला घेऊनच बदामाचे सेवन कमी प्रमाणात करावे.

३) अॅसिडिटी

बदामाचे सेवन हे अपचनाचे कारण ठरू शकते. परिणामी सतत करपट ढेकर, अॅसिडिटी, डायरिया असे त्रास जाणवू शकतात. जर तुम्हाला मळमळ किंवा यापोटी बिघडल्याचे समस्या जाणवत असेल तर बदाम खाणे टाळावे.

४) श्वसन समस्या

बदाम हाइड्रोसायनिक ऍसिडचे प्रमाण अधिक असते. जर शरीरात या HCN चे प्रमाण वाढले तर श्वसनात अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणूनच बदामाचे सेवन हे प्रमाणात करणे गरजेचे आहे. आता हे योग्य प्रमाण नेमकं किती हे पाहुयात..

हे ही वाचा<< मूगडाळीचे सेवन ‘या’ ८ आजारांमध्ये ठरू शकतं विषासमान! श्वास घेणं होऊ शकतं कठीण, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

डॉ. वी. के. मिश्रा यांच्या माहितीनुसार बदामाच्या सेवनाच्या बाबत नियमित विचारला जाणारा प्रश्न म्हणजे बदाम सोलून खायचा की नाही? यावर डॉक्टर मिश्रा यांनी अत्यंत सोपे उत्तर दिले आहे. वैज्ञानिक दृष्टीने बदाम हे साल न काढताच खाणे फायद्याचे ठरू शकते. बदामाच्या सालांमध्ये पॉलिफिनॉल्स नामक एक घटक असतो जो एक अत्यंत उपयुक्त अँटिऑक्सिडंट आहे. बदामाची साल ही फायबरयुक्त असते. वरील त्रास नसणाऱ्या, ठणठणीत स्वास्थ्य असणाऱ्या व्यक्तीने एका दिवसात ५६ ग्रॅम म्हणजे १० ते १२ बदामाचे सेवन करण्यास हरकत नाही.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 13:42 IST
Next Story
मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात ‘या’ चुका अजिबात करू नका; नाहीतर दिवसभर Blood Suagr वाढलेली राहील