Are You Working Out Extra, Body Signs: काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका २४ वर्षीय तरुणीला अचानक आयसीयूमध्ये दाखल करावे लागले होते. डॉक्टरांच्या माहितीनुसार या तरुणीच्या लघवीचा रंग हा अक्षरशः काळा झाला होता, हॉस्पिटलमध्ये लगेचच तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले. पण मुळात ही स्थिती कशामुळे उद्भवते हे समजून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. ही तरुणी आपल्या फिटनेसच्या बाबत अत्यंत सक्रिय होती, तिचे काम व जिम रुटीन ती रोज नेटाने पाळायची पण तरीही अशाप्रकारे तिचे आरोग्य बिघडणे हे आश्चर्यकारक होते. तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर सांगतात की, या स्थितीला rhabdomyolysis असे म्हणतात, यात तुमच्या खराब झालेल्या स्नायूंच्या उती तुटतात आणि प्रथिने, इलेक्ट्रोलाइट्स रक्तात सोडतात, ज्यामुळे हृदय आणि मूत्रपिंडांचे नुकसान होऊ शकते. डॉक्टरांना यामागे एक कारण आढळून आले ते म्हणजे तिचे अत्यंत उच्च तीव्रेतेचे व्यायामाचे रुटीन. या तरुणीने आपला विश्रांतीचा वेळ कमी करून व्यायामाचा वेळ व तीव्रता दोन्ही वाढवली होती.

या प्रकरणाविषयी सांगताना सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर डॉ. मिकी मेहता यांनी इंडियन एक्सस्प्रेसला व्यायामाच्या अतिरेकाने होणारे परिणाम व लक्षणे सांगितले आहेत. डॉ. मेहता म्हणतात की, व्यायामामुळे शारीरिक तंदुरुस्ती सुधारते, मूड सुधारतो आणि तुम्हाला अधिक ऊर्जा मिळते. पण जास्त व्यायाम करणे शरीर आणि मनासाठी नुकसानदायक असू शकते. जेव्हा व्यायामाचे प्रमाण, वारंवारता किंवा कालावधी शरीराच्या रिकव्हरी होण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक असते, जेव्हा व्यायाम स्नायूंच्या, फुफ्फुसाच्या आणि हृदयाच्या क्षमतेच्या पलीकडे जातो, तेव्हा त्याला अतिव्यायाम म्हणतात. तुम्हाला आठवड्यातून १५० मिनिटांचा मध्यम तीव्रतेचा व्यायाम पुरेसा ठरू शकतो.

तुम्ही व्यायामाने शरीराला खूपच थकवताय का? ही आहेत लक्षणे

  • तुम्हाला नेहमीचीच कामे करत असताना सुद्धा ऊर्जा कमी झाल्याचे जाणवणे, सुस्त वाटणे.
  • स्नायूंना वेदना जाणवणे, चालताना, उभे राहताना, बसताना सांधे दुखणे. काहींना तर तीन दिवसांपर्यंत किंवा त्यानंतरही वेदना जाणवतात.
  • चिडचिड वाढणे
  • धडधड वाढणे व श्वास घेताना अडचण येणे
  • व्यायामानंतर श्वासांची लय मूळ पदावर येण्यासाठी खूप वेळ लागणे.
  • सतत इजा होणे.

तुम्ही अतिव्यायाम करता तेव्हा शरीरात काय बदलते?

सतत उच्च तीव्रतेचा व्यायाम केल्याने शरीरात कॉर्टिसोलचे प्रमाण जास्त आणि टेस्टोस्टेरॉन पातळी कमी होऊ शकते. हे हार्मोनल बदल वारंवार वजन वाढणे, स्नायू कमी होणे, थकवा आणि अतिरिक्त पोटातील चरबीसाठी कारणीभूत असू शकतात. तुमची रोगप्रतिकारक शक्तीपण कमी होऊ शकते. अतिव्यायाम केल्याने तुमच्या हाडांना, स्नायूंना इजा होऊ शकते. फुफ्फुसातील कार्बनडाय ऑक्साईड, ऑक्सिडेटिव्ह ताण व शरीरातील लॅक्टिक ऍसिडची पातळी यांच्यातही वाढ होऊ शकते.

जेव्हा तुमचे शरीर तुमच्या स्नायूंना आणि इतर त्वरीत पुरेसा ऑक्सिजन देऊ शकत नाहीत तेव्हा तुमच्या पेशी तुम्हाला हालचाल करत राहण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा तयार करण्यासाठी ग्लुकोजचा वापर करतात. जास्त व्यायामामुळे वजनात असामान्य चढ-उतार होऊ शकतात आणि भूक नियंत्रणात व्यत्यय येऊ शकतो. सुरुवातीला, तीव्र व्यायाम भूक कमी करू शकतो, परंतु दीर्घकालीन अति व्यायाम चयापचय आणि भुकेच्या संकेतांमध्ये गोंधळ करू शातो, ज्यामुळे भूक कमी होते पण वजनात बदल होतो.

जास्त व्यायाम केल्याने तुमची झोप कमी होऊ शकते आणि तुम्हाला नैराश्य येऊ शकते.

हे ही वाचा<< झोपण्याआधी डोळ्यावर ‘ही’ वस्तू लावल्याने स्मरणशक्ती व एकाग्रता सुधारते? परीक्षांच्या काळात तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. मिकी मेहता यांनी पुढे सांगितले की, व्यायाम करायचाच नाही किंवा खूपच व्यायाम करायचा ही दोन्ही टोके टाळायला हवीत. तुम्हाला शरीराला आवश्यक व्यायाम दिल्यावर शांत करणे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे उच्च तीव्रतेच्या व्यायामानंतर कमी तीव्रतेचा व्यायाम पोहणे, सायकल चालवणे किंवा चालणे हे पर्याय विचारात घेतले पाहिजे. तसेच भरपूर पाणी प्या आणि संतुलित, पौष्टिक-दाट आहार घ्या जेणेकरुन तुमच्या आरोग्यास एकूण मदत होईल. लक्षात घ्या व्यायाम हा आनंद असायला हवा, शिक्षा नाही.