A young man died after drinking 5 bottles of alcohol in Karnataka : नुकतेच कर्नाटकमधील एका २१ वर्षीय तरुणाने पाच बाटल्या दारू प्यायल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्याच्या मित्रांबरोबर लावलेली १०,००० रुपयांची पैज जिंकण्यासाठी त्याने अतिमद्यपान केले. एकाच वेळी जास्त प्रमाणात मद्यपान करणे हे अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढवणारा किती मोठा घटक असू शकतो हेच या घटनेवरून सिद्ध होते. म्हणूनच मद्यपान करण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकू नका, कारण अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की, “मद्यपान हे आरोग्यासाठी विषारी आहे.”
जास्त मद्यपान करणे हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक (Excessive drinking is dangerous for heart health)
दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमधील कार्डिओथोरॅसिक आणि कार्डिओव्हस्कुलर, हार्ट अँड लंग ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. मुकेश गोयल यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की,”कधीकधी कमी किंवा मध्यम प्रमाणात मद्यपान करणे ही अनेकांसाठी महत्त्वाची चिंता असू शकत नाही. पण कमी वेळात जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने हृदयाच्या आरोग्यावर गंभीर आणि तात्काळ परिणाम करू शकते.मद्यपानाची ही पद्धत शरीराच्या सहनशीलतेवर परिणाम करते, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीवर हानिकारक परिणाम होतात.
जास्त मद्यपान केल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो?
अचानक रक्तदाब वाढतो (Sudden Spike in Blood Pressure)
एकाचवेळी जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने काही तासांतच हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावणाऱ्या काही हार्मोन्स सोडतात, ज्यामुळे रक्तदाब अचानक वाढतो. यामुळे धमन्या आणि हृदयावर ताण येतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. जलद सेवनामुळे रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण (BAC) धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकते, ज्यामुळे श्वसन, हृदय गती आणि शरीराचे तापमान नियमन यांसारख्या प्रमुख अवयवांवर आणि त्यांच्या कार्यावर परिणाम होतो.
निर्जलीकरण आणि अनियमित हृदय लय (अॅरिथमिया) (Dehydration and Irregular Heart Rhythms (Arrhythmias)
जास्त प्रमाणात मद्यपान हे निरोगी व्यक्तींमध्येही हृदयाच्या असामान्य लय निर्माण होण्याशी संबंधित आहे. मद्यपान हे मूत्रवर्धक (लघवीचे प्रमाण वाढवणारे) आहे आणि शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स आणि द्रव पदार्थाचे प्रमाण लवकर कमी करते. या प्रकरणात व्यक्तीने कोरी दारू (पाणी, सोडा किंवा सॉफ्ट ड्रिंक न मिसळता) प्यायल्यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरातील पाण्याची पातळी गंभीररित्या कमी झाली होती. स्थिर आणि नियमित हृदयाचे ठोके राखण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्स हे महत्त्वपूर्ण असतात. कोणताही असंतुलन हृदयातील विद्युत आवेगांमध्ये (electric impulses) व्यत्यय आणतो, ज्यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येतो.
हृदयाच्या स्नायू कमकुवत होणे (अल्कोहोलिक कार्डिओमायोपॅथी) Weakening of the Heart Muscle (Alcoholic Cardiomyopathy)
वारंवार जास्त मद्यपान केल्याने हृदयाच्या स्नायू कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे रक्त प्रभावीपणे पंप करण्याची त्यांची क्षमता कमी होते आणि शेवटी हृदय बंद पडते.
हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होते (Reduced Oxygen to the Heart)
दारूमुळे हृदयाच्या ऊतींना ऑक्सिजन पोहोचण्यास अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे एनजाइना (angina – छातीत दुखणे) किंवा मायोकार्डियल इन्फार्क्शन(Myocardial infarction) (हृदयविकाराचा झटका) होण्याचा धोका वाढतो.
रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो (Increased Risk of Blood Clots)
अतिमद्यपान केल्याने रक्तातील प्लेटलेट्स एकाच ठिकाणी साठण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे हृदय किंवा मेंदूतील रक्तवाहिन्या बंद करणाऱ्या धोकादायक गुठळ्या होण्याची शक्यता वाढते.
यकृत बिघडलेले कार्य (Liver Sysfunction)
यकृत प्रति तास मर्यादित प्रमाणात मद्याचे चयापचय करू शकते. जास्त प्रमाणात सेवन केल्याने अवयवावर परिणाम होतो. या प्रक्रियेदरम्यान तयार होणारे विषारी पदार्थ हाताळण्यास ते संघर्ष करत असताना ते लवकर जमा होतात आणि यकृताच्या पेशींना नुकसान पोहोचवतात.
मेंदूचे कार्य बिघडते (Impaired brain function)
मद्यामुळे मेंदूचे कार्य आणि मज्जासंस्थेची क्रिया मंदावते आणि शरीराच्या शारीरिक क्रिया सुरळीत आणि अचूकपणे करण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये, मेंदूचे कार्य मंदावण्यामुळे बेशुद्ध होणे, कोमात जाणे आणि अगदी मृत्यूदेखील होऊ शकतो