Aditya Roy Kapur Breakfast: तुम्हाला माहिती आहे का, अभिनेता आदित्य रॉय कपूर गेल्या आठ वर्षांपासून नाश्तात सलग एकाच प्रकारचा पदार्थ खातोय? करीना कपूर खानबरोबर तिच्या ‘ व्हॉट वुमन वॉन्ट ‘ या पॉडकास्टदरम्यान त्याने दिवसाची सुरुवात कोणत्या आवडीच्या पदार्थांपासून करतो याची माहिती दिली. यावेळी त्याने सांगितले की, मी गेल्या आठ वर्षांपासून एकाच प्रकारचा नाश्ता करतोय, तो म्हणजे ओट्स. त्यात काही फ्लेवर्स असतात. अंडीही मिसळलेली असतात. पण, त्यात अंडी मिसळलीत हे खाताना तुम्हाला कळतही नाहीत, कारण तशी चवही लागत नाही, त्यामुळे हा नाश्ता मला आवडतो. सकाळी मला काहीतरी गोड खाण्याची सवय असल्याने मी फळं खातो.

तुम्हाला माहिती आहे का, अभिनेता आदित्य रॉय कपूर गेल्या आठ वर्षांपासून नाश्तात सलग एकाच प्रकारचा पदार्थ खातोय? करीना कपूर खानबरोबर तिच्या ‘ व्हॉट वुमन वॉन्ट ‘ या पॉडकास्टदरम्यान त्याने दिवसाची सुरुवात कोणत्या आवडीच्या पदार्थांपासून करतो याची माहिती दिली. यावेळी त्याने सांगितले की, मी गेल्या आठ वर्षांपासून एकाच प्रकारचा नाश्ता करतोय, तो म्हणजे ओट्स. त्यात काही फ्लेवर्स असतात. अंडीही मिसळलेली असतात. पण, त्यात अंडी मिसळलीत हे खाताना तुम्हाला कळतही नाहीत, कारण तशी चवही लागत नाही, त्यामुळे हा नाश्ता मला आवडतो. सकाळी मला काहीतरी गोड खाण्याची सवय असल्याने मी फळं खातो.

अनेक वर्ष एकाच प्रकारचा नाश्ता शरारीसाठी खरंच फायदेशीर असतो का?

चेन्नईतील श्री बालाजी मेडिकल सेंटरमधील आहारतज्ञ्ज दीपलक्ष्मी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, या नाश्त्यात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, बेस्ट प्रोटीन, हेल्दी फॅटस आणि अँटिऑक्सिडंट्सचे संतुलित मिश्रण असते; ज्यामुळे दिवसाची सुरुवात करण्यासाठी हा नाश्त्यातील एक सर्वोत्तम पर्याय आहे.

ओट्समध्ये हळूहळू पचणारे कार्बोहायड्रेट्स असतात, तसेच त्यात फायबरचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे शरीरात ऊर्जेची पातळी राखण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. अंड्यात हाय प्रोटीन्स असतात, त्यामुळे स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आणि पोट भरण्यास मदत होते. बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात; तर सुका मेव्यात हेल्दी फॅट्स असतात, जी मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात, असे आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी यांनी सांगितले.

दीपलक्ष्मी यांनी पुढे सांगितले की, या नाश्त्याचे आरोग्यदायी फायदे मूलभूत पोषणापेक्षाही जास्त आहेत. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते, यामुळे भूक जास्त काळ नियंत्रणात ठेवता येते. चयापचय क्रिया सुधारते आणि स्नायूंचे आरोग्य सुधारते. विशेषतः सक्रिय जीवनशैली जगणाऱ्या व्यक्तींसाठी हे फायदेशीर असते.

अशाप्रकारे फायबर आणि प्रोटीनयुक्त नाश्ता केल्याने सकाळी कामात लक्ष केंद्रित करणे आणि ऊर्जा पातळी वाढवण्यास मदत होते. कॉफी पिण्यापूर्वी या प्रकारचा नाश्ता केल्यास अॅसिडिटी आणि पोटासंबंधित समस्या टाळण्यास मदत होते.

‘या’ गोष्टींची घ्या काळजी

पण, नाश्त्यात अनेक वर्ष ओट्स खाणं हे काही लोकांसाठी फायद्यापेक्षा नुकसानकारकही ठरू शकते, कारण ओट्स सामान्यतः आरोग्यदायी असले तरी त्यात फायटिक अॅसिड असते, ज्यामुळे शरीरात खनिजांचे पोषण थोडे कमी होते. फक्त ओट्स नाही तर आहारात विविध प्रकारच्या पौष्टिक घटकांचा समावेश केल्यास चिंतेचे काही कारण नाही. अंडी पौष्टिक असली तरी ती कमी प्रमाणात खावीत, विशेषत: हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्यांनी अंडी खाताना काळजी घ्यावी.

सुका मेव्यात पोषक तत्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो, पण कॅलरीजही जास्त असतात, त्यामुळे त्याचेही प्रमाणात सेवन करावे, विशेषतः वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी काळजी घ्यावी. याशिवाय पोटासंबंधित समस्या टाळण्यासाठी बेरीचे सेवनही मर्यादेत करावे.

एकंदरीत दीपलक्ष्मी यांनी सांगितले की, नाश्त्यात रोज ओट्स खाणं बहुतेक व्यक्तींसाठी विशेषतः सक्रिय जीवनशैली जगणाऱ्या लोकांसाठी सुरक्षित आहे. यामुळे मॅक्रोन्यूट्रिएंट्सचे संतुलन नियंत्रणात राहते, तसेच नियमित शारीरिक हालचाली करत असल्यास शरीरास ऊर्जा प्रदान करते; यामुळे निरोगी आरोग्यास चालना मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण, नाश्त्यात ओट्स खाण्याचे फायदे व्यक्तिगतरित्या बदलणारे आहेत. त्यामुळे तासनतास बसून राहणाऱ्या किंवा बसून काम करणाऱ्या व्यक्तीला नाश्त्यात ओट्स खाणं फायदेशीर ठरेलच असे नाही, त्याला शरीराच्या गरजेनुसार आहार खाणं महत्त्वाचे आहे. याशिवाय हाय कोलेस्ट्रॉल किंवा ॲलर्जी यांसारख्या विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्यांनी नाश्त्यात बदल करणं आवश्यक आहे, त्यामुळे नाश्ता किंवा आहारातही कोणत्याही पदार्थाचे सेवन करण्यापूर्वी एकदा आहारतज्ज्ञांची मदत नक्की घ्या.