Feel Sleepy After Coffee : सकाळी उठल्यानंतर कॉफी घेतल्याशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. त्याची त्यांना सवय झालेली असते. विशेषतः प्रवासानंतर थकलेल्या शरीराला किंवा रात्रभर जागण्यासाठी जेव्हा डोळे उघडे ठेवणे कठीण जाते तेव्हा झोप टाळण्यासाठी कॉफीची मदत घेतली जाते. पण, काही वेळा आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे कॉफी प्याल्यानंतरही काही लोकांना जास्तच झोप येते. हे कसं शक्य आहे?

“हो, कॅफिन मेंदूतील अ‍ॅडेनोसिन नावाच्या रासायनिक पदार्थाला ब्लॉक करतो ज्यामुळे झोप येत नाही त्यामुळे सामान्यतः कॉफी घेतल्यानंतर लोक अधिक काळ जागे राहतात” अशी माहिती सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी दिली.

पण, प्रत्येकाच्या शरीरावर कॅफिनचा परिणाम सारखा नसतो. शरीराच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रावर कॅफिनचा उलट परिणाम किंवा ‘रिबाउंड इफेक्ट’ निर्माण झाला, तर काही लोकांना ऊर्जा मिळण्याऐवजी झोप येऊ शकते. डॉ. हिरेमठ यांनी सांगितले, “कॅफिनचा परिणाम संपल्यावर शरीराला थकवा जाणवतो आणि व्यक्ती जागी राहण्याऐवजी तिला झोप येऊ लागते.”

शरीराची जनुकीय रचना आणि कॅफिनची प्रक्रिया (The body’s genetic makeup and caffeine processing)

कोणाला कॉफी प्यायल्यानंतर जाग येते आणि कोणाला झोप येते, हे मुख्यतः शरीरातील कॅफिन पचवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. काही वेळा हे शरीराचे जैविक (genetic) वैशिष्ट्यही ठरवते.

काही हृदयरोग किंवा मानसोपचार औषधे हे चालना देऊ शकतात का? (Can certain heart or psychiatric medications trigger this?)

डॉ. हिरेमठ यांनी सांगितले, ” हृदय किंवा मानसिक आजारांसाठी घेतली जाणारी काही औषधे शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेत बदल घडवतात. यामुळे कॅफिन घेतल्यानंतर काही लोकांना उलट परिणाम जाणवतो.
“काही अँटिबायोटिक्स किंवा अँटीडिप्रेसंट्समुळे यकृतातील चयापचय प्रभावित होते. परिणामी कॅफिनची विघटन प्रक्रिया मंद होते. त्यामुळे कॅफिनचा परिणाम जास्त काळ टिकतो किंवा थकवा जास्त जाणवतो,” असेही ते म्हणाले.

जीवनशैलीचा प्रभाव (Visual impact)

जर एखाद्याने दीर्घकाळ झोप घेतली नसेल, तर कॅफिन फक्त थकवा तात्पुरत्या प्रमाणात लपवते; पण शरीराची नैसर्गिक झोपेची गरज प्रबळ होऊन थकवा येतो. तसेच, अपुरा आहार, निर्जलीकरण आणि अनियमित जेवण यांमुळे कॅफिनचा जागरूकता वाढवणारा प्रभाव कमी होतो. “उच्च ताणाचे वातावरणदेखील कॅफिनचा प्रभाव कमी करते,” असे डॉ. हिरेमठ यांनी स्पष्ट केले.

जास्त कॉफी पिण्याचे दुष्परिणाम (Side effects of drinking too much coffee)

अत्यधिक कॉफी पिण्यामुळेही काही लोकांना झोप येते. “अत्यधिक कॉफी मेंदूला जास्त उत्तेजित करते आणि त्या कॅफिनचा परिणाम संपल्यावर झोप येते. त्यामुळे झोपेचा दर्जा खराब होतो आणि सतत थकवा येत राहतो,” असेही ते म्हणाले.

काही लोकांमध्ये जास्त कॉफी घेतल्याने कॉर्टिसॉलची पातळीही वाढते, ज्यामुळे उर्जा कमी होऊन सतत थकवा जाणवतो. डॉ. हिरेमठ यांच्या मते, “कॉफीचे प्रमाण आणि योग्य वेळ ठेवणे महत्त्वाचे आहे.