How to Control Bad Cholesterol: कोलेस्ट्रॉल अनेक कारणांसाठी माणसाच्या शरीरासाठी आवश्यक असतं. परंतु शरीरात कोलेस्ट्रॉलच्या वाढत्या प्रमाणामुळे आपल्याला हृदयासंबंधी अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक झाल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. यामुळे हृदय विकाराचा धोकाही निर्माण होतो. परंतु यावर वेळीच उपचार केल्यास, खाण्यापिण्यात काही बदल केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यास मदत होते. तर आज आपण जाणून घेऊया अशा काही आयुर्वेदिक टिप्स ज्यामुळे तुम्ही शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करू शकता.

वाढत्या खराब कोलेस्ट्रॉलसाठी घरगुती उपाय

दालचिनी

जर तुमच्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढत असेल तर दालचिनी पावडरची रेसिपी वापरून पहा. यासाठी रोज सकाळी चिमूटभर दालचिनी पावडर खा. याचा वापर केल्याने तुम्हाला काही वेळातच फायदा दिसेल. पण लक्षात ठेवा दालचिनी पावडर जास्त खाऊ नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.

Kitchen Jugaad Video
Jugaad Video: पोळीच्या पिठात साबण किसून टाका; स्वयंपाकघरातील ‘या’ मोठ्या समस्येतून होईल सुटका
how to To Stay Cool in summer
Heatwave Precautions : उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण कसे करावे? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स….
Summer Special Sabudana Batata Recipe
फक्त १ वाटी साबुदाणा-१ बटाटा आणि तोंडात घालताच विरघळणारे उपासाचे पापड, १५ मिनिटतात ५० पापडाची सोपी कृती
How to Identify Chemically Injected Watermelon FSSAI Suggestion
कलिंगड सुया टोचून, पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा; ‘या’ खुणा पाहूनच करा खरेदी

( हे ही वाचा: आजार टाळायचे असतील तर अशा प्रकारे नखे स्वच्छ करा; तज्ज्ञांकडून जाणून घ्या नखांचा आरोग्याशी असलेला संबंध)

अंबाडीच्या बिया

अंबाडीच्या बियाने तुम्ही शरीरातील खराब कोलेस्टेरॉल देखील काढून टाकू शकता. ते वापरण्यासाठी कोमट पाण्यात एक चमचा अंबाडीच्या बियांची पावडर मिसळा. त्यानंतर हे मिश्रण प्या. हळूहळू खराब कोलेस्टेरॉल तुमच्या शरीरातून मूत्र आणि विष्ठेद्वारे बाहेर पडू लागेल.

जवसाच्या बिया

वजन वाढल्याने त्रास होत असला तरी फ्लॅक्स सीडचा उपाय तुम्ही करू शकता. जवसाच्या बियांचे चूर्ण बनवा आणि एक चमचा पावडर कोमट पाण्यात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्या. असे मानले जाते की असे केल्याने शरीरातील चरबी देखील झपाट्याने कमी होऊ लागते.