Best Time To Shower Morning Or Night : शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी अंघोळ करणे खूप महत्त्वाचे असते. अंघोळ हा अनेकांच्या दैनंदिन दिनक्रमातील महत्त्वाचा भाग आहे. अंघोळीमुळे शरीर स्वच्छ होते. त्याशिवाय मानसिक आरोग्यावरही त्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येतो. पण, अंघोळीसाठी सकाळ की रात्र कोणती वेळ योग्य? त्यामुळे तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. अनेक वर्षांपासून अंघोळीच्या या वेळांवरून मतभेद पाहायला मिळतात.

अनेकदा सोशल मीडियावरही अंघोळीची सवय चांगली का आहे याबाबत धाडसी दावे केले जातात. अनेक वैज्ञानिक आधारांवरही अंघोळ करण्याच्या वेळा आणि सवयींबाबत वेगवेगळे दावे केले जातात.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
SM Mushrif Who killed Karkare
‘करकरेंच्या शरीरात नेमक्या कुणाच्या गोळ्या?’ Who Killed Karkare पुस्तकाचे लेखक एसएम मुश्रीफ म्हणाले…
Kiran Mane on Ujjwal Nikam
“दोन पक्षांवर दरोडे पडले तेव्हा हा भामटा…”, किरण मानेंची उज्ज्वल निकम यांच्यावर टीकात्मक पोस्ट
Prajjwal Revanna
सेक्स स्कँडल प्रकरणात प्रज्ज्वल रेवण्णांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लवकरच..”
EVM
“निवडणूक प्रक्रियेचं पावित्र्य राखा”, EVM वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारलं!
narendra modi
“मुस्लिम समुदायाला पहिल्यांदाच सांगतोय, त्यांनी आता…”, आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींकडून भूमिका स्पष्ट
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”

अंघोळीच्या वेळांचे दोन टप्प्यांत विभाजन केले गेले आहे. पण, तुम्ही सकाळी किंवा रात्री कधीही अंघोळ केली तरी तुमच्या आरोग्यावर त्याचा तसा काही विशेष परिणाम होत नाही. सर्वसाधारणपणे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही अंघोळ करू शकता, यावर अनेक डॉक्टरांनीही सहमती दर्शवली आहे.

तुम्ही सकाळी किंवा रात्रीच अंघोळ केली पाहिजे यामागे कोणताही वैज्ञानिक आधार किंवा पुरावा नाही, असे बफेलो विद्यापीठातील संसर्गजन्य रोग विभागाचे एमडी प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. थॉमस रुसो यांनी सांगितले

डॉक्टरांनी सांगितले की, अंघोळीच्या वेळांमागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही. एखादी व्यक्ती दिवसात एकापेक्षा जास्त वेळा अंघोळ करीत असेल, तर त्यामागे काही कारणे असू शकतात. कारण- हे व्यक्तीची सध्याची आरोग्य स्थिती आणि प्राथमिकतेवर अवलंबून असते.

सकाळी अंघोळ करण्याचे आणि रात्री अंघोळ करण्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात? तुमच्यासाठी कोणती वेळ योग्य आहे ते कसे निवडायचे? याबद्दल तज्ज्ञांचे काय मत आहे ते जाणून घेऊ….

सकाळी अंघोळ करणे खरेच फायदेशीर ठरते का?

मुळात सकाळी लवकर अंघोळ करणारी व्यक्ती रात्री पुन्हा अंघोळ करू शकते. रात्री झोपेत असताना जीवाणू आणि त्वचेच्या मृत पेशी चादर किंवा त्वचेवर जमा होतात, असे रटगर्स रॉबर्ट वूड जॉन्सन मेडिकल स्कूलमधील एमडी, त्वचाविज्ञानाच्या सहायक प्राध्यापक डॉ. सिंडी वासेफ म्हणाले.

जर तुम्हाला झोपताना घाम येत असेल, तर त्वचेवरील जीवाणू आणि त्वचेच्या मृत पेशी तुमच्या त्वचेवर तशाच चिकटून राहण्याची शक्यता आहे. पण, सकाळी अंघोळ केल्यास त्या दूर होतात.

सकाळी अंघोळ केल्याने एखाद्या व्यक्तीला अधिक ताजेतवाने झाल्यासारखे वाटते, तसेच सतर्क होण्यास मदत होऊ शकते. तुमच्या शरीराचे झोपेतून उठणे काही विशिष्ट संकेतांवर अवलंबून असते. त्यातील अंघोळ हा एक घटक असू शकतो, असे न्यूरोलॉजिस्ट अॅण्ड स्लीप मेडिसिन फिजिशियन शार्लोट्सविले न्यूरोलॉजी अॅण्ड स्लीप मेडिसिनचे एमडी, तसेच स्लीप अनप्लग्ड पॉडकास्टचे होस्ट डब्ल्यू. क्रिस्टोफर विंटर यांनी सांगितले..

डॉ. विंटर म्हणाले की, जर एखाद्या व्यक्तीने थंड पाण्याने अंघोळ केली, तर त्यामुळे शरीरातील नॉरपेनेफ्रिन आणि डोपामाइन (‘फील गुड’ हार्मोन) सारखे न्यूरोट्रान्समीटर सोडले जातात. या प्रक्रियेमुळे तुम्ही जागे राहू शकता.

सतर्कता आणि स्वच्छता या गोष्टींशिवाय सकाळी अंघोळ करणे ही अनेकांसाठी सोयीची निवड असू शकते. विशेषत: जे लोक सकाळी उठल्यानंतर व्यायाम करतात त्यांच्यासाठी.

२०१८ च्या ग्राहक बुद्धिमत्तेच्या सर्वेक्षणानुसार, जे अमेरिकन लोक वर्कआउटसाठी सकाळच्या वेळेस प्राधान्य देतात. त्यांच्यापैकी अर्धेच लोक सकाळी व्यायाम करतात. जर तुम्ही त्यापैकी एक असाल, तर नंतर फेरफटका मारणे आरोग्यदायी आहे.

सकाळी अंघोळ करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे त्वचेवरील माती, घाण स्वच्छ करणे यांसह घाम, घाण व तेल यांचा सर्वाधिक संपर्क आल्यास सकाळी अंघोळ करणे फायदेशीर असते. बहुतेक जण सकाळी व्यायाम केल्यानंतर अंघोळ करतात, असे माउंट सिनाई हॉस्पिटलमधील त्वचाविज्ञान विभागातील कॉस्मेटिक व क्लिनिकल रिसर्चचे संचालक जोशुआ झीचनर यांनी सांगितले.

रात्री अंघोळ करण्याची कारणे काय आहेत?

सकाळी अंघोळ करणे जरी तुमच्यासाठी फायदेशीर असले तरी रात्री अंघोळ करण्याचेही काही फायदे आहेत.

एक तर झोपण्यापूर्वी अंघोळ केल्यास दिवसभर त्वचेवर जमा झालेली घाण आणि रोगजंतू निघून जातात. तुमची अंथरुणे स्वच्छ आणि जंतूमुक्त राहतात. त्यामुळे तुम्हाला निरोगी झोप घेता येते, असे डॉ. झीचनर म्हणाले.

डॉ. रुसो यांच्या मते, यामुळे आजारांचा धोका टाळता येणार नाही. परंतु, जर तुमची किंवा तुमच्याबरोबर राहत असलेल्या व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती कमी असेल, तर तुम्ही बाहेरून घरात आल्यानंतर अंघोळ करणे गरजेचे आहे.

ज्यांना हंगामी अॅलर्जी आहे त्यांच्यासाठीही रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करणे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाढणाऱ्या अॅलर्जीच्या लक्षणांच्या वाढीस प्रोत्साहन देणाऱ्या जंतूंपासून सुटका मिळू शकते.

इसबसारख्या त्वचेच्या समस्या असलेल्या लोकांसाठी रात्री अंघोळ करणे उपयुक्त ठरू शकते. त्यावर डॉ. वासेफ म्हणाले की, वातावरणातील प्रदूषण आणि त्यातील काही घातक घटक त्वचेसंबंधित काही आजार वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्यात जर तुमचा अशा गोष्टींशी वारंवार संपर्क येत असेल, तर तुमच्या त्वचेला त्या गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी रात्री अंघोळ करणे अतिशय फायदेशीर ठरू शकते.

त्याव्यतिरिक्त ज्यांची त्वचा कोरडी आहे किंवा ज्यांना इसबसारखा त्वचेचा आजार आहे, त्यांनी त्वचेवर रोज मॉइश्चरायजरचा वापर करणे गरजेचे आहे. पण रोज हे काम करणे थोडी अधिक कंटाळवाणे ठरू शकते. अशा परिस्थितीत रात्री अंघोळ करणे अधिक सोयीचे असू शकते.

अशा प्रकारची त्वचा असलेल्या लोकांनी प्रथम वॉटर बेस लोशन वापरावे किंवा व्हॅसलीनसारख्या तेल-आधारित मॉइश्चरायझरचा वापर करावा, असे जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन अॅण्ड हेल्थ सायन्सेसमधील डर्मेटोलॉजी + एस्थेटिक्स संस्थापक संचालक व त्वचाविज्ञानाचे प्राध्यापक एमडी इफे जे. रॉडनी म्हणाले.

मॉइश्चरायझरचा वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेतील ओलावा टिकून राहतो. पण, मॉइश्चरायझरचा थर तुम्हाला सकाळी थोडा जाडसर वाटू शकतो; जो तुमच्या कपड्यांना चिकटू शकतो. त्यामुळे रात्रीची अंघोळ करणे हा उत्तम पर्याय ठरतो.

अनेकांना रात्री आंघोळ करावीशी वाटते. त्यामागचे कारण म्हणजे चांगले झोप लागते. ज्याप्रमाणे सकाळी अंघोळ करणे म्हणजे उठण्याची वेळ झाली याचा संकेत असू शकतो, त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी अंघोळ करणे म्हणजे झोपण्याची वेळ झाली याचा संकेत असू शकतो.

झोपण्यापूर्वी तुमच्या शरीराचे वाढते तापमान आणि त्यानंतर अंघोळीमुळे थोडी थंडी वाटणे हा तुमच्या चांगल्या झोपेसाठी एक नैसर्गिक ट्रिगर असू शकतो. कारण- रात्री शरीराच्या तापमानात झपाट्याने झालेली घट झोपेसाठी उपयुक्त ठरते.

अंघोळीचा कोणता पर्याय बेस्ट?

रात्री किंवा सकाळी दोन्ही वेळांत कधीही अंघोळ करणे फायदेशीर असले तरी रोज दोन वेळा अंघोळ करणे अनावश्यक आहे किंवा ते हानिकारकदेखील असू शकते, असे त्वचाशास्त्रज्ञांनी सांगितले.

वारंवार आंघोळ केल्याने त्वचा आणि केस कोरडे होतात. त्याशिवाय त्वचेची चमक कमी होऊ शकते, असे डॉ. वासेफ म्हणाले.

जर तुम्हाला दिवसातून दोनदा अंघोळ करावी लागत असेल, कदाचित तुम्हाला खूप घाम आला असेल किंवा तुम्ही व्यायामासाठी अचानक दुपारची वेळ निवडली असेल, तर पारंपरिक साबणाऐवजी तुम्ही अंघोळीसाठी क्लींजिंग ऑइल किंवा मॉइश्चरायझिंग क्लीन्सर वापरण्याचा विचार केला पाहिजे, अशी शिफारस रॉडनी यांनी केली.

ते म्हणाले की, दिवसातून दोनदा साबण वापरल्याने तुमच्या त्वचेतील आर्द्रता निघून जाते आणि त्वचा कोरडी होऊ शकते.

तुम्हाला तुमची अंघोळ करण्याची एक आदर्श वेळ ठरवायची असेल, तर तुम्ही तुमची सामान्य व्यायामाची वेळ, त्वचेची स्थिती किंवा अॅलर्जी आणि झोपेच्या कोणत्याही समस्या विचारात घ्या. परंतु, सर्वसाधारणपणे आंघोळ करण्याची सर्वोत्तम वेळ ही तुमच्यासाठी उपयुक्त वेळ ठरेल अशा प्रकारची असली पाहिजे.