Kiara Advani Beauty Secret : बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. चित्रपटांबरोबर तिच्या सुंदर त्वचा व केसाचीसुद्धा नेहमी चर्चा होते. पण तुम्हाला माहितीये का कियारा तिच्या त्वचेची कशी काळजी घेते? तिच्या सौंदर्यामागील रहस्य काय आहे?
मुंबईतील तिरा स्टोअर (Tira) लाँचच्या वेळी, कियारा ही लाल रंगाच्या कपड्यांमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. Vogue India शी बोलताना कियाराने तिच्या आजीचे सौंदर्य रहस्य आणि स्वतःच्या काही टिप्स सांगितल्या.

कियाराच्या आजीने सुंदर त्वचेसाठी सांगितलेले सीक्रेट

कियारा आजीकडून मिळालेल्या टिप्सविषयी सांगताना म्हणाली, “थोडे बेसन, थोडे घरगुती दूध किंवा त्यावरील मलाई व थोडे मध टाकावे. याची पेस्ट तयार करावी आणि ती पेस्ट चेहऱ्यावर लावावी. “
ती पुढे सांगते, “माझ्या आजीने मला दिलेला हा सर्वोत्तम डिटॉक्स मास्क आहे. पण त्याबरोबर तुम्ही खात असलेले फळ किंवा भाज्यांची सालेसुद्धा चेहऱ्यावर घासू शकता. तसे करणे तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.”

हेही वाचा : Winter Skincare Routine: हिवाळ्यात ‘या’ तीन गोष्टी करणे टाळा, अन्यथा ठरू शकतात त्वचेसाठी धोकादायक; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत….

खरंच हा घरगुती फेस मास्क फायदेशीर आहे?

द एस्थेटिक क्लिनिक्स येथील कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट, डर्मेटो-सर्जन आणि डर्मेटोलॉजिस्ट सल्लागार डॉ. रिंकी कपूर यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले, “बेसन, दूध किंवा मलाई व मध यांपासून तयार केलेला घरगुती फेस मास्क आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो आणि हा फेस मास्क एक नैसर्गिक डिटॉक्स मानला जातो.”

ते पुढे सांगतात, “घरगुती फेस मास्क तुमची त्वचा स्वच्छ करण्यास, त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास, तसेच त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करू शकतो. बेसनमध्ये एक्सफोलिएटिंग गुणधर्म असल्याने ते नैसर्गिक एक्सफोलिएटर मानले जाते.” एक्सफोलिएटिंग ही त्वचा स्वच्छ करण्याची एक पद्धत आहे; ज्यामुळे त्वचेची बंद झालेली छिद्रे उघडण्यास मदत होते.

हेही वाचा : Perfect Sandwich Tip : सँडविच बनवताय? मग हा ‘थ्री फिंगर रूल’ नक्की ट्राय करून पाहा, आहारतज्ज्ञ म्हणतात की…

हा फेस्क मास्क वापरताना कोणती काळजी घ्यावी?

हा फेस मास्क महिन्यातून एकदा किंवा दोनदा वापरण्याचा सल्ला देताना डॉ कपूर सांगतात, “हा फेस मास्क सुरक्षित मानला जात असला तरी तो प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी योग्य असू शकत नाही. प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगवेगळा असतो आणि या घरगुती मास्कमध्ये मिसळलेल्या विशिष्ट घटकांमुळे एखाद्याला अॅलर्जीसुद्धा होऊ शकते. याच्या अतिवापरामुळे त्वचेवर जळजळ जाणवणे, त्वचेवर मुरमे येणे किंवा पुरळ येणे, त्वचेवर लालसरपणा जाणवणे, त्वचा कोरडी होणे इत्यादी समस्या जाणवू शकतात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या लोकांची त्वचा अत्यंत संवेदनशील आहे, त्या लोकांनी हा घरगुती फेस मास्क वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही प्रकारचे घरगुती फेस मास्क किंवा स्किन केअर प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी हातावर पॅच टेस्ट करा त्यामुळे तुम्ही होणारे दुष्परिणाम टाळू शकता.