Brown Rice or White Rice : तांदूळ हा आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. पांढऱ्या तांदळापेक्षा ब्राऊन राइस (तपकिरी तांदूळ)चे उत्पादन कमी घेतले जाते. त्याशिवाय ब्राऊन राइस हा पांढऱ्या तांदळापेक्षा आरोग्यासाठी चांगला आहे, असे अनेक तज्ज्ञ म्हणतात. त्याविषयी द इंडियन एक्स्प्रेसने आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती दिली.
कनिक्का मल्होत्रा सांगतात, “जेव्हा पांढऱ्या तांदळावर प्रक्रिया केली जाते, तेव्हा त्याचा परिणाम या तांदळाच्या पोषक मूल्यांवर दिसून येतो. प्रक्रियेदरम्यान पांढऱ्या तांदळातील पौष्टिक घटक कमी होतात. पांढऱ्या तांदळातील पौष्टिक घटक बदलण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. त्यामुळे ब्राऊन राइसपेक्षा या तांदळामध्ये पौष्टिक कमतरता आढळते.”

पांढरा तांदूळ आणि ब्राऊन राइसचे आरोग्यदायी फायदे मल्होत्रा यांनी सांगितले आहेत. या तांदळाचे फायदे आणि तोटे दोन्हीही आहेत. कोणी कोणता तांदूळ वापरावा, ही प्रत्येकाची वैयक्तिक पसंती आहे; पण ब्राऊन राइसचे फायदे पांढऱ्या तांदळापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे अनेक जण चांगल्या आहारासाठी ब्राऊन राइसची निवड करतात.

ब्राऊन राइस

ब्राऊन राइसमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे व खनिजे भरपूर प्रमाणात असतात. ब्राऊन राइस रक्तातील साखरेची मात्रा नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याशिवाय या तांदळामुळे हृदयविकाराचा धोका कमी करण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
त्याशिवाय ब्राऊन राइसचे तोटेसुद्धा आहेत. या तांदळामध्ये फायटिक ॲसिड आणि आर्सेनिक रसायन खूप जास्त प्रमाणात असते; ज्यामुळे शरीरातील खनिजे शोषून घेतली जातात. त्यामुळे ब्राऊन राइसचे अतिप्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही. विशेषत: गर्भवती महिलांनी ब्राऊन राइसचे अतिसेवन करू नये.
ब्राऊन राइसमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतात. फायबर हा पचनासाठी फायदेशीर आहे; पण ज्या लोकांना अतिप्रमाणात फायबर खाण्याची सवय नाही. त्यांना पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

हेही वाचा : Sugarcane : उन्हाळ्यात उसाचा रस पिताय? जाणून घ्या, उसाचे सेवन करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी?

पांढरा तांदूळ

पांढऱ्या तांदळामध्ये जीवनसत्त्वे बी आणि लोहासारखे आवश्यक पोषक घटक असतात; ज्यामुळे आपल्या शरीरास सहज ऊर्जा मिळते. ब्राऊन राइसमध्ये फायबर आणि काही पोषक घटक असतात; जे पांढऱ्या तांदळामध्ये दिसत नाहीत. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त होताना दिसून येते..

ब्राऊन राइसऐवजी तुम्ही पांढरा भात खाता का?

मल्होत्रा सांगतात, “एखाद्या व्यक्तीचा फिटनेस आणि आहाराच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन तुम्ही तांदूळ निवडू शकता. मल्होत्रा यांनी ब्राऊन राइस का खावा याची कारणे दिलेली आहेत.

रक्तातील साखरेची पातळी

ब्राऊन राइसमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते; जे पांढऱ्या तांदळाच्या तुलनेने रक्तातील साखर चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करते. ब्राऊन राइस मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक चांगला पर्याय आहे.

वजन नियंत्रणात ठेवणे

ब्राऊन राइसमध्ये फायबर अधिक असते. या ब्राऊन राइसचे सेवन केल्याने भूक कमी लागते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

चांगले आरोग्य

ब्राऊन राइसचा आहारात समावेश करा. ब्राऊन राइस पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत अधिक पोषक घटक आणि आरोग्यदायी फायदे पुरवितो. ब्राऊन राइसच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहते, वजन नियंत्रणात राहते आणि संपूर्ण आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.