Pomegranate juice in winter: डाळिंब हे एक असं फळ आहे, ज्याचा फक्त रंगच सुंदर नाही तर त्याची चव आणि त्याचे फायदेदेखील अद्भूत आहेत. डाळिंब हे असं फळ आहे ज्यामध्ये अनेक पोषकतत्वे आहेत. व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट आणि काही इतर पोषकतत्वांनी परिपूर्ण अशा डाळिंबाचे सेवन केल्याने इम्युनिटी वाढते आणि शरीर स्वस्थ राहते. डाळिंबाचा रस प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि ह्रदयाचं आरोग्यही सुधारतं. रोज सकाळी डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. तसंच रक्तातील साखरही नियंत्रणात साधारण पातळीत राहील.
साधारणपणे फळांचा गुणधर्म थंड असतो. त्यामुळे असा समज असतो की, सर्दी, खोकला झाल्यावर फळांचं सेवन करू नये. मात्र आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचे एक्सपोर्ट डॉक्टर सलीम जैदी यांनी दि इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, डाळिंबाचा ज्यूस व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. हा ज्यूस रोज प्यायल्याने सर्दी, खोकला होत नाही, तर त्यावर हा ज्यूस गुणकारी ठरतो.

डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असते. ते आजारांपासून बचाव करण्यास मदत करते. अँटी-ऑक्सिडंट गुणांनी भरपूर अशा डाळिंबात पोटॅशियम असतं, जे सर्दी होऊन नाक वाहण्यावर गुणकारी ठरतं. सर्दी, खोकल्यावर उपचार करण्यासाठी तुम्ही डाळिंब असंच खाऊ शकता किंवा त्याचा ज्यूसही करू शकता. तर रोज डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने आरोग्यावर नेमका काय फरक पडतो हे जाणून घेऊ…

निरोगी त्वचा

डाळिंबात असणारे पॉलिफेनॉल्स, ज्यांना एलाजिटैनिन्स म्हटलं जातं. यामध्ये सूज कमी करणारे गुणधर्म असतात. हे जखम भरण्याच्या प्रक्रियेला वेगवान करतात आणि त्वचेचं वय वाढण्याच्या प्रक्रियेला संथ करते. रोज डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने एजिंगची लक्षणं कंट्रोलमध्ये येतात आणि त्वचा निरोगी राहते.

दातांची मजबुती

डाळइंबातील पॉलिफेनॉल्समध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण असतात, ते दातांवर तयार होणाऱ्या प्लाकला कारणीभूत ठरणाऱ्या बॅक्टेरियांची संख्या कमी करू शकतात. दातांवर ते बॅक्टेरिया चिकटण्याच्या क्षमतेला कमी करू शकतात. रोज डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने दात मजबूत होतात आणि बॅक्टेरिया साफ होऊन जातात.

ह्रदय निरोगी राहते

डाळिंबातील एक पॉलिफेनॉल, प्यूनिकलागिन धमन्यांमध्ये चरबी जमा होण्यापासून रोखण्यास मदत करू शकते. ते धमन्यांमध्ये तयार होणारे प्लाक स्थिर करण्यासही मदत करू शकते. त्यामुळे ते तुटण्यापासून आणि ह्रदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक होण्यापासून रोखू शकते.

डाळिंबाचा रस

डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणाच अँटी-ऑक्सिडंट्स असतात. ते शरीराचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

शरीरावरील सूज नियंत्रित करते

डाळिंबामध्ये आढळणारे पॉलिफेनॉल आणि इतर अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात. दररोज हा ज्यूस प्यायल्याने शरीराच्या विविध भागांमध्ये होणारी जळजळ नियंत्रित होण्यास मदत होते.