जर तुमचे आतडे काही खाद्यपदार्थांच्या बाबतीत संवेदनशील असेल, तर तुम्हाला पोट दुखणे, गॅस, सूज येणे व अस्वस्थता अशा समस्यांचा त्रास होऊ शकतो. पण, अन्नसंवेदनशील लोकांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या रोगाचा धोका वाढू शकतो का? जर्नल ऑफ अॅलर्जी आणि क्लिनिकल इम्युनॉलॉजीमध्ये नुकत्याच केलेल्या एका संशोधननुसार, गाईच्या दुधात असलेल्या लॅक्टोज असहिष्णुतेसारख्या संवेदनशील असलेल्या व्यक्तींमध्ये हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचा धोका वाढू शकतो. डॉ. मनीष बन्सल (हार्ट इन्स्टिट्युट, मेदांता, गुरुग्राम येथील क्लिनिकल आणि प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीचे वरिष्ठ संचालक) यांनी अन्नाबाबतची संवेदनशीलता हृदयविकाराचा धोका कसा दुप्पट करू शकते याबाबतची सविस्तर माहिती द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली आहे ती जाणून घेऊ.

गाईच्या दुधाची अ‍ॅलर्जी आणि गाईच्या दुधाची संवेदनशीलता हृदयासंबंधी रोगाचा धोका वाढवते का?

These five nutritious foods will give you super energy
अनहेल्दी सोडा; हेल्दी खा! सकाळी नाश्त्यात ‘हे’ पाच पौष्टिक पदार्थ देतील तुम्हाला सुपर एनर्जी
superfood needs for a good gut health
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी हे पाच पदार्थ ठरतील फायदेशीर, वाचा तज्ज्ञ काय सांगतात..
what happens if you give up dal for a month
महिनाभर डाळीचे सेवन न केल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होऊ शकतात?
Pushpalata, Decoration
निसर्गलिपी: पुष्पलता
Loksatta chaturang old age mental illness Psychiatrist
सांधा बदलताना: भान हरवलेल्यांचं भान!
How to take care of children in summer
उन्हाळ्यात ‘अशी’ घ्या मुलांची काळजी, मुलं राहतील निरोगी आणि आनंदी
Women Health, Thyroid, Weight Gain,
स्त्री आरोग्य : थायरॉइडच्या समस्येमुळे वजन वाढतं का?
what is heatwave in marathi
विश्लेषण: वाढत्या तापमानाचा तडाखा किती तीव्र? उष्माघात प्राणघातक कसा ठरतो?

जेव्हा आपल्या शरीरातील पेशी गाईच्या दुधातील अ‍ॅलर्जीचा सामना करतात, तेव्हा विशिष्ट प्रथिने अ‍ॅलर्जीच्या रूपात कार्य करतात, रोगप्रतिकारक शक्ती आणि IgE (शरीरातील प्रथिनांचा एक प्रकार) म्हणून ओळखल्या जाणार्‍या अँटीबॉडीज तयार करतात. ही रोगप्रतिकारक प्रतिक्रिया घडवणाऱ्या पेशी हृदयातील पेशींसारख्याच असतात; ज्यामुळे प्लाक (plaque) तयार होणे आणि कोलेस्ट्रॉल जमा होण्याची शक्यता असते. या प्रक्रियेमुळे प्लाक (एक प्रकारचा थर) अस्थिर होऊ शकतो; ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते.

हेही वाचा – तुम्ही रोज तूप खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…. 

अन्न संवेदनशीलता आणि अन्नाची अ‍ॅलर्जी यांमध्ये काय फरक आहे?

अन्न संवेदनशीलता तेव्हा उदभवते जेव्हा एखादी व्यक्ती विशिष्ट अ‍ॅलर्जी निर्माण करणाऱ्या घटकाच्या संपर्कात आल्यानंतर प्रतिसाद म्हणून रोगप्रतिकारक प्रतिक्रिया सक्रिय होते. या रोगप्रतिकारक प्रतिसादामुळे अँटीबॉडीज तयार होतात; परंतु त्या कोणतीही लक्षात येण्याजोगी लक्षणे निर्माण करीत नाहीत, त्याला अन्न संवेदनशीलता म्हणतात. तर दुसरीकडे जेव्हा अँटीबॉडीजच्या निर्मितीमुळे पोटदुखी, उलट्या किंवा अतिसार यांसारखी तत्काळ लक्षणे दिसू लागतात, त्याला अन्नाची अ‍ॅलर्जी म्हणून ओळखले जाते. उदाहरणार्थ- ग्लुटेन संवेदनशीलता असलेल्या व्यक्ती गव्हाचे पदार्थ टाळू शकतात. जर गव्हाचे पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारक प्रतिसादामुळे अँटीबॉडीज तयार झाल्या, तर ती अन्न संवेदनशीलता मानली जाते. परंतु, या गव्हाच्या पदार्थाचे सेवन केल्यानंतर जर व्यक्तीमध्ये पोटाशी संबंधित समस्या उदभवू लागल्या, तर त्याला अ‍ॅलर्जी म्हटले जाते.

हेही वाचा- खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नवीन सुपर डाएट? ‘या’ डाएटमुळे हृदयविकाराचा धोका कसा कमी होतो? जाणून घ्या…

कोणत्या प्रकारचे खाद्यपदार्थ हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या रोगाचा धोका वाढवू शकतात आणि अन्न संवेदनशीलता किती धोकादायक आहे?

पूर्वी असे मानले जात होते की, अन्न संवेदनशीलता हृदयविकाराच्या समस्यांमध्ये विशेष योगदान देत नाही. परंतु, अलीकडील अभ्यासांतून या कल्पनेला आव्हान दिले आहे. कारण- अभ्यासात असे दिसून आले आहे की, अनेक प्रकरणांमध्ये, अन्न संवेदनशीलता हृदयरोगाचा धोका दुपटीने वाढवू शकते. तसेच आणखी एका संशोधनानुसार, गाईचे दूध हे सर्वांत सामान्य अ‍ॅलर्जी निर्माण करणारे असल्याचे आढळून आले आहे; इतर आणखी खाद्यपदार्थांमध्ये विशिष्ट प्रकारचे सीफूड्स आणि शेंगदाणे हेदेखील अ‍ॅलर्जी निर्माण करणारे पदार्थ म्हणून ओळखले जातात.

अन्न संवेदनशीलता धूम्रपान आणि मधुमेहाइतकी धोकादायक असू शकते का?

एका संशोधनानुसार, धूम्रपान आणि मधुमेह यांसारख्या जोखमीच्या घटकांच्या वाढीशी हृदयविकाराच्या धोक्यात झालेल्या वाढीची तुलना करता येते. परंतु, दोन प्रमुख कारणांमुळे सावधगिरीने याचा निष्कर्ष काढला पाहिजे. पहिले कारण म्हणजे या विषयावर मर्यादित अभ्यास करण्यात आला असून, निश्चित संबंध सिद्ध करण्यासाठी अधिक माहिती आवश्यक आहे. दुसरे म्हणजे की, हे अभ्यास दोन्हीमध्ये संबंध दर्शवतात. परंतु नेमके तेच कारण आहे का हे अनिश्चित राहते. तसेच हेदेखील शक्य आहे की, अन्न संवेदनशीलता असलेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकारास कारणीभूत असलेले इतर घटकदेखील असू शकतात. त्यामुळे ठोस आणि निर्णायक पुरावे उपलब्ध होईपर्यंत मधुमेह किंवा धूम्रपान यांसारख्या जोखमीच्या घटकांना अन्न संवेदनशीलतेशी जोडणे घाईचे ठरू शकते.