Should We Take Cold Shower in High Fever: अभिनेत्री देबिना बॅनर्जी सोशल मीडियावर आपल्या आयुष्याविषयी छोटे छोटे तपशील शेअर करत असते, दोन बाळांची आई असणाऱ्या देबिनाचे रुटीन पाहायला नेटकऱ्यांना सुद्धा फार आवडते. अलीकडेच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर तब्येत ठीक नसल्याची पोस्ट टाकून आपल्याला १०२ डिग्री ताप असल्याचे सांगितले होते. .या स्टोरीमध्येच तिने तिच्या डॉक्टरांनी ताप कमी करण्यासाठी दिलेला विचित्र सल्ला सुद्धा सांगितला. एरवी ताप- सर्दी असल्यास थंड पाण्यापासून लांब राहण्यास सांगितले जाते पण देबिनाच्या डॉक्टरांनी तिला थंड पाण्याने शॉवर घेण्याचा सल्ला दिला. आज याच सल्ल्यावर आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडून माहिती जाणून घेणार आहोत. ताप आल्यावर थंड पाण्याने आंघोळ केल्यास खरोखरच बरं वाटतं का याविषयी सविस्तर माहिती पाहू या..

ताप आल्यावर थंड पाण्याने आंघोळ करावी का?

डॉ रवी शेखर झा, संचालक आणि प्रमुख, पल्मोनोलॉजी, फोर्टिस हॉस्पिटल्स, यांनी indianexpess ला सांगितले की जेव्हा एखाद्याला ताप येत असेल तेव्हा थंड पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला देणे हानिकारक देखील असू शकते. जेव्हा तुम्हाला ताप येतो तेव्हा तुमच्या रक्तवाहिन्या शरीरात निर्माण होणारी उष्णता नष्ट करण्यासाठी पसरतात. थंड तापमानामुळे रक्तवाहिन्यांचे आकुंचन होते (रक्तवाहिन्या अरुंद होतात) आणि त्यामुळे उष्णता बाहेर पडत नाही. यामुळे ताप आणखी वाढू शकतो.

शरीराचे तापमान अत्यंत वाढले असेल व जेव्हा शरीर औषधांना प्रतिसाद देत नसेल, तेव्हा थंड पाण्याने स्पंजिंग करण्याची शिफारस केली जाते, (थंड पाण्याच्या घड्या डोक्यावर ठेवल्या जातात) परंतु थंड पाण्याने आंघोळ करणे धोकादायक आहे, यामुळे खरं तर चक्कर येणे, डिहायड्रेट वाटणे व हायपरथर्मिया अशी परिस्थिती उद्भवू शकते.

दुसरीकडे, डॉक्टर सुधीर कुमार, न्यूरोलॉजिस्ट यांनी थंड पाण्याने आंघोळ करण्याऐवजी साधारण तापमान असलेल्या नळाच्या पाण्याने आंघोळीचा सल्ला दिला, आहे. डॉक्टर सुधीर कुमार सांगतात की, ताप असताना आंघोळ केल्याने शरीराला थंडावा मिळून नैसर्गिकरित्या तापमान कमी होते.

हे ही वाचा<< खराब कोलेस्ट्रॉल फेकून देईल लसणाचे तेल; केस व हृदयासाठीही बेस्ट! तज्ज्ञांनी सांगितलेली वापराची पद्धत पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ,ताप आल्यावर घेतल्या जाणाऱ्या गोळ्या- औषधांबाबत सुद्धा डॉ झा यांनी सल्ला दिला, ते म्हणतात की, पॅरासिटामॉल सतत घेत राहिल्यास यकृतावर भीषण परिणाम होऊ शकतो. अशावेळी शरीराचे योग्य हायड्रेशन करत राहणे गरजेचे आहे.