scorecardresearch

खराब कोलेस्ट्रॉल फेकून देईल लसणाचे तेल; केस व हृदयासाठीही बेस्ट! तज्ज्ञांनी सांगितलेली वापराची पद्धत पाहा

Bad Cholesterol And Health:खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून लसूण तेल हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांवर अंकुश ठेवण्यास मदत करते. हे तेल कसे बनवावे व त्याचा वापर कसा करायचा जाणून घेऊयात..

Bad Cholesterol Removing Garlic Oil Helps In Hair Growth and Heart Health Know From Health Expert How to Use
खराब कोलेस्ट्रॉल फेकून देईल लसणाचे तेल (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Garlic Oil Benefits For Cholesterol: मराठमोळ्या घरात लसूण नाही असं फार क्वचितच होत असेल. अगदी साध्या वरणाला लसणाची फोडणी दिली की लगेच दाल तडका तयार होतो. हिरव्या लसणाची चटणी, लाल लसणाची चटणी, लसणाचं लोणचं अशा वेगवेगळ्या रूपात लसूण आपल्या साध्या जेवणाला चमचमीत बनवण्याचे काम करते. पण तुम्हाला लसणाच्या तेलाविषयी माहित आहे का?

लसणाचे तेल कसे बनवाल? (How To Make Garlic Oil)

पोषणतज्ज्ञ सलोनी झवेरी यांच्या मते लसणाचे तेल बनवण्यासाठी लसूण ठेचून ऑलिव्ह ऑइलमध्ये भिजवले जाते. लसणाचा पूर्ण अर्क तेलात उतरल्यानांतर मग लसणाचे कण बाजूला करून तेल वापरता येते. या तेलाचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. शरीरातील घातक बॅक्टेरियाच्या वाढीस थांबवण्याचे काम हे तेल करते. लसणाच्या तेलातील अँटीफंगल गुणधर्मांमुळे तेल त्वचा, केस व आरोग्याच्या अनेक समस्या सोडवू शकते.

लसणाच्या तेलाचे फायदे काय? (Garlic Oil Benefits)

त्वचेवर लसणाचे तेल (Acne & Pimple Solution)

अनेकदा त्वचेच्या कोणत्याही थरात बॅक्टरीया जमा झाल्यामुळे मुरुम व पिंपलचा त्रास सुरु होतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या 2014 च्या अभ्यासानुसार, लसूण तेलामध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात जे मुरुमांवर उपचार करू शकतात. यावर सलोनी झवेरी सांगतात की, “लसणाच्या तेलातील अँटी बॅक्टेरियल व अँटी फंगल गुणधर्मांमुळे हे तेल बेस्ट ठरते. सहसा कोरफडीच्या गरात हे तेल मिसळून त्वचेला लावल्याने छान ग्लो असणारी त्वचा मिळवता येऊ शकते. लसणाच्या तेलातील अॅलिसिन, झिंक व व्हिटॅमिन ई त्वचेसाठी उपयुक्त आहे यामुळे रक्ताभिसरण वाढून त्वचा स्वच्छ होते. “

लसणाचे तेल केसावर कसा करतात प्रभाव (Garlic Oil For Hair)

लसूण तेलामध्ये बी-6, सी, मॅंगनीज आणि सेलेनियम सारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. लसणाच्या तेलातील अँटीफंगल घटक बॅक्टरीया नष्ट करण्यास मदत करतात, ज्यामुळे टाळू स्वच्छ आणि कोंडा मुक्त होतो. हा एक नैसर्गिक घरगुती उपाय आहे ज्यामुळे केसांची वाढ होते. मात्र हे तेल वापरताना काही थेम्ब आपल्या नियमित तेलात मिसळून लावावे जेणेकरून केसाला दुर्गंध येणार नाही.

सर्दी आणि फ्लूशी लढा (Garlic Oil For Cold And Flu)

अभ्यासातून असे दिसून आले आहे की लसूण तेल सर्दी तापावर उत्तम उपाय ठरू शकते. लसणाच्या तेलातील सक्रिय एलिन रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो. पोषणतज्ज्ञ सांगतात, आंघोळ करण्यापूर्वी लसूण आणि मोहरीच्या तेलाने शरीराची मालिश केल्यास थकवा कमी होऊ शकतो.

हृदयाचे आरोग्य सुधारते (Garlic Oil For Heart Health)

Maturitas या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की लसूण तेल घेतल्याने रक्तदाब लक्षणीयरीत्या कमी होतो. हे ट्रायग्लिसराइड्स आणि खराब कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी करू शकते. लसूण तेल हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांवर अंकुश ठेवण्यास मदत करते.

लसणाचे तेल आहारात कसे वापरावे? (How To Use Garlic Oil)

सलोनी झवेरी यांनी सांगितले की, “लसणाचे तेल ब्रोकोली, फ्लॉवर, मटार, टोस्ट, अंडी तसेच वाफवलेल्या भाज्यांच्या वर टाकून खाता येते. हे तेल वापरून झिंगी सॅलड ड्रेसिंग बनवता येते. लक्षात घ्या, या तेलाचा वापर दिवसाला 5 मिली पेक्षा जास्त नसावा.

हे ही वाचा<< जागीच जीव घेणारा हार्ट अटॅकचा सर्वात भयंकर प्रकार, ‘Widow Maker’, जाणून घ्या ‘ही’ प्रमुख लक्षणे

टीप: जर आपल्याला रक्तस्त्राव किंवा गुठळ्या होण्याच्या समस्या आहेत किंवा आतड्यांचे संक्रमण, खराब पचन किंवा पोटात अल्सर असे त्रास आहेत त्यांनी लसणाचे तेल वापरणे टाळावे, लसणाचे तेल वापरण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 10:46 IST
ताज्या बातम्या