Do Cashews Spike Blood Sugar Level : काजू हा चव आणि पौष्टिकतेसाठी ओळखला जातो. यामध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रोटिन असल्याने याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. काजू खाण्याचे अनेक फायदे असले तरी काजू खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते का? आणि मधुमेहाच्या रुग्णांनी काजू खावेत का? याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली.
क्लिनिकल आहारतज्ज्ञ गरिमा गोयल सांगतात, “काजूची एक वाटी (७५ ग्रॅम) खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी मध्यम प्रमाणात वाढेल,” पण कसे? जाणून घ्या सविस्तर
कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण आणि ग्लायसेमिक इंडेक्स (GI)
७५ ग्रॅम काजूमध्ये अंदाजे २० ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यापैकी तीन ग्रॅम आहारातील फायबर असतात, म्हणजे फक्त कार्बोहायड्रेटचे प्रमाण १७ ग्रॅम असते. गोयल सांगतात की, ७५ ग्रॅम काजूचे कॅलरीफिक मूल्य ४४० कॅलरी असते. याचा अर्थ असा की, कार्बोहायड्रेट्सचा कॅलरीवर परिणाम होत नाही; ज्यामुळे ब्रेड, पास्ता इत्यादी अतिकार्बोहायड्रेट पदार्थांच्या तुलनेत काजू खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी किंवा मध्यम प्रमाणात वाढते.
“याशिवाय, काजूमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. ७५ ग्रॅम काजूमध्ये २२ ग्लायसेमिक इंडेक्स असतो. कमी कार्बोहायड्रेट्समुळे काजू कमी ग्लायसेमिक लोड (GL) मध्ये येतो,” असे गोयल पुढे सांगतात.
गोयल यांच्या मते, कमी GI आणि GL ग्लायसेमिक नियंत्रणाच्या बाबतीत मधुमेहींसाठी एक चांगला पर्याय बनतात.
अतिप्रमाणात प्रोटिन आणि फॅट्स
काजूमध्ये प्रोटिन आणि फॅट्सचे प्रमाण खूप जास्त असते. ७५ ग्रॅम काजूमध्ये १४ ग्रॅम प्रोटिन आणि ३४ ग्रॅम फॅट्स असतात. “हे पोषक तत्व रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे, कारण पचनक्रिया मंदावते आणि जास्त प्रमाणात पोट भरल्यासारखे वाटते. फॅट्सच्या प्रमाणात ओलेइक अॅसिडचे (oleic acid) प्रमाण जास्त असते. तसेच कार्बोहायड्रेट-टू-फॅट प्रमाण कमी असल्याने मधुमेहींमध्ये चयापचय नियंत्रणासाठी हा एक उत्तम पर्याय बनतो,” असे गोयल सांगतात.
मॅग्नेशियमची मात्रा भरपूर प्रमाणात असते.
गोयल यांनी सांगितल्याप्रमाणे, काजूमधील मॅग्नेशियम ग्लुकोज चयापचय आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हीटीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. “रक्तातील साखरेची पातळी संतुलित करण्यासाठी मॅग्नेशियम शरीराच्या पेशींना इन्सुलिन हार्मोनचा चांगला वापर करण्यास मदत करतो,” असे गोयल सांगतात.
मधुमेहींसाठी ते आवश्यक आहे का?
जरी काजूची एक वाटी रक्तातील साखरेची पातळी थोडी वाढवत असली तरी मधुमेह असलेल्या लोकांनी ते किती प्रमाणात खावे याची काळजी घेणे गरजेचे आहे आणि अति प्रमाणात याचे सेवन करू नये. गोयल सांगतात, “जरी अति प्रमाणात काजूचे सेवन रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करत नसले तरी ते कॅलरीज वाढवू शकतात आणि वजनसुद्धा वाढवू शकतात. जर तुम्ही अति प्रमाणात काजूचे सेवन करत असाल तर रक्तातील साखरेची वाढ संतुलित करण्यासाठी फायबरयुक्त किंवा प्रोटिनयुक्त पदार्थांसह काजू खा, जसे की भाज्यांची कोशिंबीर, दही इत्यादी.”