कोमट दूध प्यायल्यास झोप येते, असे मानले जाते. वर्षानुवर्षांपासून निद्रानाश (Insomnia) म्हणजे झोप न येण्याच्या समस्येवर फायदेशीर ठरणारा उपाय म्हणून कोमट दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण, खरेच कोमट दूध शांत झोप लागण्यास मदत करते का याबाबत निरिक्षण केल्यानंतर शांत झोप आणि कोमट दूध यांच्यातील संबंधाचा खोटेपणा आणि सत्यता समोर येते.

“कोमट दूध शांत झोपेला प्रोत्साहन देणारा किंवा प्रवृत्त करणारा एक नैसर्गिक घटक आहे का? याबाबत मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या मुख्य आहारतज्ज्ञ भक्ती सामंत यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सविस्तर माहिती दिली आहे.

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत

गैरसमज १ : कोमट दुधात झोप आणणारे पदार्थ असतात.

सत्य : कोमट दुधात आढळणारे ट्रिप्टोफॅन (Tryptophan), अमिनो आम्ल(Amino acid) हे घटक झोपेच्या निंयत्रणात उपयूक्त ठरणारे दोन न्यूरोट्रांसमीटर सेरोटोनिन आणि मेलाटोनिन (Serotonin and Melatonin) यांचा एक गट आहे.

इतर अन्नपदार्थांच्या तुलनेत दुधात ट्रिप्टोफॅनचे प्रमाण कमी असले तरी झोपेवर होणारा त्याचा परिणाम नगण्य आहे. झोपेला प्रोत्साहन देण्यासाठी ट्रिप्टोफॅनचे न्यूरोट्रान्समीटरमध्ये रूपांतरित करण्याकरिता शरीराला अतिरिक्त पोषक आणि इतर घटकांचीदेखील आवश्यकता असते.

हेही वाचा – रोज ओट्स खाल्यामुळे खरेच वजन कमी होऊ शकते? ओट्स का आणि कसे खावेत; जाणून घ्या तज्ज्ञांकडून…. 

गैरसमज २ : तापमानाचा प्रभाव पडतो.

सत्य : कोमट दुधामुळे एक शांत आणि आरामदायक भावना निर्माण होऊ शकते; ज्यामुळे आराम मिळण्यास मदत होईल. कोमट दुधातून मिळणारा उबदारपणा हा एक मानसिक घटक असतो; जो शरीराला आराम करण्याची वेळ झाली आहे हे सांगण्यासाठी मदत करू शकतो. पण, दुधाच्या कोमट तापमानाचा झोपेवर थेट शारीरिक प्रभाव पडत नाही.

गैरसमज ३ : कोमट दूध हा शांत झोपेला प्रोत्साहन देणारा किंवा प्रवृत्त करणारा एक नैसर्गिक घटक आहे.

सत्य : कोमट दुधात सुखदायक आणि आरामदायी भावना निर्माण करण्याची क्षमता असते परंतु त्यामध्ये औषधांमध्ये असलेले झोपेला प्रवृत्त करणारे पदार्थ नसतात, जे झोप येण्यासाठी कारणीभूत असतात. थेट झोपेस प्रवृत्त करणारा प्रभाव असण्याऐवजी, ते अप्रत्यक्षपणे मानसिक आणि संवेदनात्मक अनुभवावर (sensory experience) परिणाम करू शकते. दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर, काही लोकांना अस्वस्थ वाटू शकते किंवा पचनासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः जर ती व्यक्ती लॅक्टोज सहन करू शकत नसेल, तर. अशा परिस्थितींमध्ये संभाव्यतः जाणवणारी वेदना ही झोपेला चालना देण्याशी संबंधित कोणत्याही फायद्यांना नाकारते; जे प्रत्येकाच्या सहनशीलतेचे महत्त्व स्पष्ट करते. कोमट दूध प्यायल्याने झोप येण्याच्या क्षमतेमध्ये प्रत्येक व्यक्तीनुसार फरक दिसून येतो. प्रचलित एक सामान्य सिद्धांत असा आहे की, कोमट दूध पितो तेव्हा आपोआप आपले मन आपल्याला बालपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जाते. जेव्हा आपण झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध पित असतो, तेव्हा नकळतपणे मेंदूला संकेत मिळतात की, आता झोपायची वेळ झाली आहे. मेंदूमध्ये असणारी ती आठवण आपल्याला शांत झोप लागण्यास मदत करू शकते.

शांत झोपेसाठी नियमितपणे झोपेची वेळ पाळणे, झोपण्यासाठी आरामदायी वातावरण तयार करणे व तुमचा ताण नियंत्रित करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्ही अशा इतर घटकांकडे लक्ष न देता, फक्त कोमट दूध पित असाल, तर तुम्हाला शांत झोप लागणार नाही.

हेही वाचा – एका महिन्यासाठी मद्यपान सोडले तर शरीरावर काय परिणाम होईल? Dry January Challenge आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल का?

गैरसमज ४ : कोमट दूध प्यायल्यास झोप येणे हे प्रत्येकासाठी फायदेशीर आहे

सत्य : आनुवंशिकता, वातावरण व जीवनशैली यांसह अनेक घटक झोपेवर परिणाम करतात. एका व्यक्तीला शांत झोप लागण्यास जो उपाय उपयुक्त ठरतो, तो दुसऱ्यासाठी उपयुक्त ठरू शकत नाही. काही लोकांना असे वाटू शकते की, कोमट दूध प्यायल्याने त्यांना झोप येते; तर काही लोकांना कोमट दूध प्यायल्याने झोप येणार नाही

कोमट दूध सर्वांना झोपेसाठी मदत करते, या संकल्पनेचे समर्थन करण्यासाठी थोडेसे वैज्ञानिक पुरावे आहेत आणि कोणतेही उबदार पेय आरामदायी म्हणून काम करू शकते.