निरोगी आरोग्यासाठी आपल्यापैकी अनेकजण प्रयत्न करत आहेत. काही लोक रोज व्यायाम करतात, आहाराकडे लक्ष केंद्रित करतात, पण एक अशी गोष्ट आहे ज्याकडे कोणीही लक्ष देत नाही. आपल्या दिवसाची सुरुवात करताना ही गोष्ट आपण नेहमी विरसतो. सकाळी उठताच न चुकता पाळली पाहिजे अशा एका विशिष्ट सवयीबद्दल डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितले आहे.
चांगले आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी प्रेरणादायी संदेश देणारे डॉ. नेने यांनी अलीकडेच रोज सकाळी स्वतःला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. म्हणजेच स्वत:साठी वेळ काढणे आणि स्वत:ला काय हवे नको त्यावर लक्ष केंद्रित करणे. ते सांगतात की, “मला मदत करणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी एक तास ऊर्जा वापरणे आणि त्या तासात मी काय करण्याची आवश्यकता आहे, माझे ध्येय काय आहे, मी कुठे जात आहे यावर मी विचार करतो… परंतु, त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे मी स्वतःवर लक्ष केंद्रित करतो,” असे डॉ. नेने यांनी इन्स्टाग्रामवर म्हटले आहे.
जसं विमान प्रवासात सर्वप्रथम स्वतःला ऑक्सिजन मास्क लावायला सांगितला जातो आणि नंतर इतरांना मदत करायची असते, तसंच “खूप वेळा लोक हा धडा विसरतात,” असं डॉ. नेने सांगतात. ते नेहमी स्वतःकडे दुर्लक्ष करून, स्वतःच्या खर्चावर इतरांना मदत करण्यात गुंतलेले असतात. पण, दररोज एक तास स्वतःसाठी द्या, स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि मग बाहेर जाऊन जग राहण्याकरिता आणखी सुंदर बनवा,” असं डॉ. नेने पुढे म्हणाले.
हे का महत्त्वाचं आहे?
आपल्याला सर्वांनाच असा अनुभव आला असेल की, सकाळी उठल्यावर बेडमधून बाहेर पडायची इच्छा होत नाही किंवा एखादी नवीन सवय सुरू करण्याचा निर्धार करतो जसे की, लवकर उठणं, निरोगी आहार घेणं, थोडंफार व्यायाम करणं; पण काही दिवसांनी ती प्रेरणा हरवते. शिस्त पाळणं कठीण वाटतं कारण आपण पहिल्याच दिवसापासून सगळं परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. “पण जर आपण आपलं मनाला योग्य प्रकारे प्रशिक्षित केले, तर रोज स्वत:साठी शिस्त पाळणं सहज शक्य होतं,” असं हॅबिल्डचे संस्थापक आणि प्रमाणित योग शिक्षक सौरभ बोथरा यांनी दी इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगतात.
इतर कोणत्याही सवयीसारखंच, मेंदूला प्रशिक्षण देणे वेळ घेणारे काम आहे. “काही दिवस सोपे असतील, काही दिवस कठीण. पण सातत्य ठेवलं तर तुमच्या मेंदूला शिस्तीतून मिळणारी एकाग्रता, ऊर्जा आणि स्पष्टता यांची ओढ वाटू लागते. प्रयत्न सुरू ठेवा, आणि जे सुरुवातीला मेहनतीचं वाटत होतं ते हळूहळू सहज सवयीचं होतं,” बोथरा पुढे म्हणाले.
जर तुम्ही लवकर उठून व्यायाम केला, तर दिवसाची सुरुवात जिंकल्याच्या भावनेमुळे होते! “यामुळे तुमच्या संपूर्ण दिवसात सकारात्मक परिणाम होतो आणि फिटनेसच्या उद्दिष्टांवर टिकून राहणं सोपं जातं,” असंही त्यांनी नमूद केलं.
सकाळची शांत आणि कोणत्याही अडथळा नसलेली वेळ तुमच्या इतर सवयींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यांचा विचार करण्यासाठी उत्तम संधी देते.
प्रत्येकाने हा संकल्प स्विकारला पाहिजे. यामुळे तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीला नक्कीच नवी उंची मिळेल,” अशी शिफारस बोथरा करतात. मात्र, ते पुढे स्पष्ट करतात की,”यासाठी अनिवार्यपणे पहाटे ४ वाजताच उठावं असं नाही. “मुख्य उद्दिष्ट हे आहे की, ती शांत वेळ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी राखून ठेवलेली असावी. ती वेळ स्वतःसाठी वापरण्याबाबत तुम्ही गंभीर राहणं आवश्यक आहे,” असं बोथरा यांनी स्पष्ट केली.