Figs health benefits : हाय ब्लड प्रेशर आणि हायपरटेंशन ही आजकाल अनेकांना भेडसावणारी एक सामान्य समस्या आहे. याला सायलेंट किलर असेही म्हणतात. कारण या आजारात कोणताही विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत. निरोगी आहार आणि योग्य जीवनशैलीच्या आधारे तुम्ही ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवू शकता. यात असे ही पदार्थ आहेत जे नैसर्गिकरित्या तुमचा ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते. असाच एक पदार्थ म्हणजे अंजीर. अंजीर हे अतिशय पौष्टिक आणि आरोग्यवर्धक फळ आहे. अंजीरमध्ये फायबर, प्रोटीन्स, उर्जा, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, फॉलेट, मॅग्नेशिअम अशी पोषक तत्वं मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आहारात अंजीरचा समावेश केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. अंजीर खाण्याचे आणखी काय फायदे आहेत, जाणून घेऊया.

अंजीरच्या सेवनाने ब्लड प्रेशर राहते नियंत्रणात

अंजीर हा पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे जो नैसर्गिकरित्या ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतो. म्हणूनच हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांना नेहमी पोटॅशियमचे सेवन वाढवण्याचा सल्ला दिला जातो.

तुम्हाला माहिती आहेच का की, जास्त मीठ खाल्ल्याने तुमचा ब्लड प्रेशर वाढू शकते. पण पोटॅशियममुळे मीठाचे दुष्परिणाम टाळता येतात. तसेच शरीराला अतिरिक्त सोडियमपासून मुक्त होण्यास मदत करते.

कोरडे अंजीर आणि ताजे अंजीर या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते जे आपल्या हृदयाचे आरोग्य अनेक प्रकारे निरोगी ठेवते.

अंजीरचे इतर आरोग्यदायी फायदे:

अंजीर तुम्हाला निरोगी पचनसंस्थेला चालना देण्यास मदत करू शकते. अंजीरमधील हाय फायबर प्रोटीन बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतात.

अंजीर तुमच्या संपूर्ण हृदयाचे आरोग्य वाढवते. अंजीर केवळ रक्तदाब नियंत्रित करत नाही तर कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यासही मदत करते.

आहारात अंजीर घालण्याची योग्य पद्धत:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाळलेले अंजीर सहज उपलब्ध असल्याने बरेच लोक त्याचे सहसा सेवन करतात. तुम्ही वाळलेल्या अंजीर रात्रभर पाण्यात भिजत ठेवत ते स्मूदी, शेक आणि सॅलडमध्ये खाऊ शकता.