आपल्यापैकी अनेकांना झोप टाळणे आवडते, तर काही जण गाढ झोपेसाठी धडपड करीत असतात. त्यामुळे बऱ्याच लोकांना शिफारस केलेली आठ तासांची झोपदेखील पूर्ण करता येत नाही.
PubMed सारख्या वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या नव्या संशोधनांनुसार, “सात ते नऊ तासांपेक्षा जास्त झोपणे टाळावे, अशी शिफारस केली जाते. पण मग खरंच काय योग्य आहे? किती तास झोपायचे सात की नऊ तास? याचं उत्तर आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊ…
“बहुतेक प्रौढांसाठी रात्री सात ते नऊ तासांचा कालावधी झोपेच्या दृष्टीने आदर्श असतो. विश्रांती सुनिश्चित करण्यास व स्मरणशक्ती मजबूत करण्यास ही इष्टतम श्रेणी मदत करते आणि शारीरिक पुनर्प्राप्ती मिळवून देते. झोपेसाठी सात किंवा नऊ तास याची निवड करण्याऐवजी झोपेच्या या कालावधीत तुमच्या शरीरासाठी काय सर्वोत्तम काम साधले जाते हे शोधण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रत्येकाच्या झोपेच्या गरजा थोड्या वेगळ्या असतात म्हणून तुमची दिनचर्या वैयक्तिकृत करणे ही चांगली विश्रांती आणि उत्साही वाटण्याची गुरुकिल्ली आहे,” असे दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलचे अंतर्गत औषध विभागाचे प्रमुख सल्लागार डॉ. नरंदर सिंगला यांनी सांगितले.
“बहुतेक प्रौढांसाठी आदर्श झोपेचा कालावधी दररोज रात्री सात ते नऊ तासांदरम्यान असतो. या वेळेत घेतलेल्या झोपेमुळे शरीराला पुरेशी विश्रांती मिळते. तसेच ती झोप स्मरणशक्ती मजबूत करण्यास मदत करते आणि शारीरिक ऊर्जा परत मिळवून देण्यास चालना देते. सात किंवा नऊ तास यापैकी एक पर्याय निवडण्याऐवजी तुमच्या शरीराला कोणता कालावधी अधिक योग्य ठरतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकाची झोपेची गरज वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्या जीवनशैलीनुसार झोपेची सवय वैयक्तिक गरजेच्या अनुषंगानं समायोजित करणं हेच दीर्घकालीन चांगली विश्रांती आणि उत्साही वाटण्याची गुरुकिल्ली आहे,” असे दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलचे अंतर्गत वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख सल्लागार डॉ. नरेंदर सिंगला यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.
तुम्हाला आवश्यक झोप मिळवण्यास
आपल्याला किती झोपेची गरज आहे, हे ठरवण्यात अनेक घटकांची भूमिका असते. डॉ. नरेंदर सिंगला यांच्या मतानुसार, वय हा एक महत्त्वाचा घटक आहे. वयस्कर व्यक्तींना (६५ वर्षे व त्यापेक्षा अधिक) सुमारे सात ते आठ तास वा त्यापेक्षा थोडी कमी झोपही पुरेशी ठरू शकते; तर तरुण वा प्रौढांसाठी सात ते नऊ तास झोप घेणे हेच सर्वाधिक फायदेशीर ठरते.
“त्याशिवाय वैयक्तिक फरकदेखील महत्त्वाचा आहे. काही लोकांना सात तास झोप मिळाली तरी ते उत्तम कार्यक्षमतेनं दिवस व्यतीत करू शकतात; तर काहींसाठी नऊ तास झोप आवश्यक असते. झोपेचा कालावधी जितका महत्त्वाचा आहे, तितकाच झोपेचा दर्जाही महत्त्वाचा असतो. झोपमोड होणं, ताणतणावाची पातळी जास्त असणं किंवा झोपेसाठी अस्वस्थ वातावरण यांमुळे शिफारस केलेली झोप पूर्ण घेतली तरी दुसऱ्या दिवशी शरीर आणि मनाला ताजेतवानेपणाचा अनुभव मिळत नाही,” असे डॉ. सिंगला यांनी स्पष्ट केले.
“तुम्ही शिफारस केलेला झोपेचा कालावधी पूर्ण केला तरी रात्री झोपेत वारंवार खंड होणे, तणावाची पातळी जास्त असणे किंवा झोपेसाठी अस्वस्थ वातावरण असणे हे सगळे घटक झोपेच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम करू शकतात आणि दुसऱ्या दिवशी ताजेतवाने वाटेल की नाही हे याच घटकांवर अवलंबून असते,” असे डॉ. नरेंदर सिंगला यांनी स्पष्ट केले.
मग ७ ते ९ तासांची झोप आदर्श का मानली जाते?(So, why is 7 to 9 hours of sleep considered ideal?)
सात ते नऊ तासांची झोप ही तुमच्या शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी साह्यभूत ठरते. तसेच, रोगप्रतिकार शक्ती आणि वजन नियंत्रणात ठेवण्यातही मदत करते. तसेच चांगली झोप तुमचे मानसिक आरोग्य सुधारते आणि संज्ञानात्मक कार्यक्षमता म्हणजेच तुमची विचार करण्याची, आकलनाची आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते. तसेच उत्तम झोप मिळाल्यास लक्ष केंद्रित करणे, स्मरणशक्ती व भावना नियंत्रित करण्यास मदत होते. तुम्ही खेळाडू असाल, विद्यार्थी असाल किंवा एखादी कठीण नोकरी करत असाल, तर पुरेशी झोप घेतल्याने तुमची दैनंदिन कामगिरी आणि ऊर्जा पातळी लक्षणीयरीत्या सुधारू शकते,” असे डॉ. सिंगला यांनी सांगितले.
कधीतरी सहा ते सात तास झोपणे तुमच्यासाठी धोकादायक नाही; पण ही सवय कायम ठेवल्यास त्याचा परिणाम तुमच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमता, मूड व रोगप्रतिकार शक्ती यांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तर दुसरीकडे सातत्यानं नऊ तासांपेक्षा जास्त झोपणं हे त्यांच्या नैराश्य (डिप्रेशन) किंवा थायरॉइडसंबंधीच्या समस्यांसारख्या लपलेल्या आरोग्य समस्येचं लक्षण असू शकतं, असे डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी दी इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले. ते मुंबईतील परळ येथील ग्लेनिगल्स हॉस्पिटल इंटर्नल मेडिसन विषयातील सीनियर कन्सल्टंट आहेत.
शेवटी महत्त्वाचं हे आहे की, झोपेच्या सात ते नऊ तासांच्या शिफारशीय मर्यादेत स्वतःसाठी योग्य ‘झोपेचा काळ’ शोधणं आणि सातत्याने दर्जेदार, कोणत्याही अडचणींशिवाय शांत झोप घेणे हे तुमचे ध्येय आहे विसरू नका.
“झोपेचा काळ आणि गुणवत्ता दोन्हींना प्राधान्य दिल्यास तुम्ही अधिक ताजेतवाने, एकाग्र होऊन, दिवसभर पुरेल अशी ऊर्जा मिळवू शकाल,” असे डॉ. सिंगला सांगतात.