तुमच्या घरात असलेले काटेरी कोरफडी किती फायदेशीर आहे याचा विचार कधी केला आहे का? सूर्यकिरणांच्या संपर्कात आल्यानंतर होणारी त्वचेची आग कमी कररण्यासाठी कोरफड वापरतात. पण, त्यापलीकडेदेखीलकोरफडीचे अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? कोरफडच नव्हे तर कोरफडीचा रस देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण, योग्य कोरफडीचा रस कसा निवडायचा हे माहीत असणे आवश्यक आहे. तसेच कोरफडीच्या रसाचे सुरक्षितपणे सेवन करावे, तसेच कधी सेवन करू नये हे देखील माहीत असणे आवश्यक आहे. याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सल्लागार आहारतज्ज्ञ आणि मधुमेह शिक्षक कनिका मल्होत्रा यांनी आतड्यांचे आरोग्य राखणे, शरीरातील पाण्याची पातळी वाढवणे आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यापर्यंत कोरफडीच्या रसाचे अनेक फायदे सांगितले आहेत.

कोरफडीरस पिण्याचे फायदे काय आहेत?

आतड्याचे आरोग्य आणि शरीरातील पाण्याची पातळी : कोरफडीचा रस पचनास मदत करू शकतो आणि तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवू शकतो. साखर किंवा प्रिझर्वेटिव्ह्ज न घालता कमीत कमी प्रक्रिया केलेला रस निवडा. तुमच्या शरीराच्या मिळणाऱ्या फायद्याचे मूल्यांकन करण्यासाठी ३० मिली पातळ केलेला रस घेण्यापासून हळूहळू सुरुवात करा.

व्हिटॅमिन बूस्ट : कोरफडीचा रस काही ब्रँड्स व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्त्वांनी समृद्ध असतो.

रक्तातील साखरेचे नियंत्रण : प्रारंभिक संशोधन संभाव्य फायदे सूचित करते, परंतु अधिक अभ्यास आवश्यक आहे.

कोरफडीचा रस पचन : पाण्याची पातळी आणि संभाव्य रक्तातील साखर नियंत्रण यांसारख्या अंतर्गत फायद्यांसाठी आदर्श आहे. हे पाणी टाकून पातळ करून सेवन केले जाऊ शकते.

हेही वाचा – रात्री ९ ऐवजी संध्याकाळी ६ पर्यंत जेवण केल्यास तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतात? तज्ज्ञांनी केला खुलासा

कोरफडीचा रस घेताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

मल्होत्रा यांच्या मते, कोरफडीचा रस घेताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे:

काय टाळावे : जर तुम्हाला क्रोहन रोग (Crohn’s disease), अल्सरेटिव्ह कोलायटिस (ulcerative colitis), किडनी समस्या किंवा यकृत रोग यांसारख्या पाचक समस्या असतील किंवा त्यासाठी औषधे घेत असाल (रक्त पातळ करणारे, मधुमेहावरील औषधे), कोरफडीचा रस घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सावकाश सुरू करा आणि सेवन मर्यादित करा: थोड्या प्रमाणात, पातळ करून (३० मिली) सुरुवात करा आणि पेटके किंवा अतिसारासाठी लक्षणे जाणवतात का याचे निरीक्षण करा. इलेक्ट्रोलाइट असंतुलन टाळण्यासाठी दररोज शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सेवन करू नका.

हेही वाचा – मासिक पाळीदरम्यान महिलांनी उपवास करावा का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कधी आणि किती वेळा घ्यावा कोरफडीचा रस?


बहुतेक निरोगी प्रौढांसाठी, सुरक्षित श्रेणी ३० मिली कोरफडीचा रस पाणी टाकून पातळ केला जातो, दिवसातून एक किंवा दोनपेक्षा जास्त वेळा घेऊ नका. मल्होत्रा म्हणतात की, “खूप कमी प्रमाणात (टेबलस्पून) सुरुवात करणे आणि तुमच्या सहनशीलतेच्या आधारावर हळूहळू त्याचे प्रमाण वाढवणे चांगले. सातत्यपूर्ण, मध्यम सेवनावर लक्ष केंद्रित करा.”