रोजच्या धावपळीच्या जगात अनेक जण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यात अनेक छोट्या- छोट्या गोष्टींसाठीही तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय. पण या वाढत्या सेवा- सुविधांचा थेट परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर होतो. त्यामुळे वाढत्या वयाबरोबर आपल्याला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. पण दररोज केवळ दहा मिनिटं चालल्याने आपल्या आरोग्यात अपेक्षेपेक्षा अनेक सुधारणा होण्यास मदत होत आहे. यासह अनेक गंभीर आजारांपासून तुम्हाला सुटका मिळवता येते. एसीई सर्टिफाइड पर्सनल ट्रेनर आणि न्यूट्रिशनिस्ट आंचल खुबचंदानी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी नियमित चालण्याचे काय फायदे आहेत ते सांगितले आहेत.

खुबचंदानी यांनी आपल्या पोस्टमध्ये चालण्याचे पाच मुख्य फायदे सांगितले आहेत.

१) चालल्याने मानसिक, शारीरिक शांतता मिळते.
२) तुम्ही नेहमी सक्रिय राहता.
३) वजन कमी करण्यास मदत होते.
४) शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात राहते.
५) शारीरिकदृष्ट्या तुम्ही आणखी मजबूत होता.

चालण्याचे मानसिक आणि शारीरिक दोन्ही फायदे आहेत. यामुळे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा किमान १० ते २० मिनिटे एखाद्या उद्यानात किंवा जळपासच्या ठिकाणी चाला. नेहमी कोणत्यातरी वाहनावर अवलंबून राहू नका.

यावर उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे संस्थापक संचालक डॉ शुचिन बजाज यांनी म्हटले की, चालणे हा एकंदरीत आरोग्य व्यवस्था सुधारण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. तुम्ही दैनंदिन वेळेत काही वेळ चाललात तर त्याचे शारीरिक आणि मानसिक असे अनेक फायदे मिळू शकतात.

चालण्याचे शरीरास होणार ‘हे’ फायदे

१) ह्रदय आणि रक्ववाहिन्यासंबंधीत आरोग्य सुधारते

दररोज चालल्याने तुमच्या हृदयाची गती आणि रक्ताभिसरण क्षमता वाढवते. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यास, हृदयविकाराचा धोका कमी करण्यास आणि शरीरातील कोलस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास मदत करू शकते.

२) वजनावर नियंत्रण राहते.

चालल्यामुळे शरीरातील कॅलरी बर्न होण्यास चयापचय वाढवते यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. चालणं हा असा व्यायाम आहे जो सर्व वयोगटातील आणि फिटनेस स्तरावरील लोक करू शकतात.

३) मानसिक आरोग्य सुधारते.

चालल्यामुळे तुमचा ताण, चिंता आणि नैराश्य कमी करून मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. यामुळे मूड सुधारतो आणि शरीरातील उर्जा पातळी वाढते.

४) सांधेदुखीपासून आराम मिळते.

सांधेदुखीसारख्या समस्या असलेल्या लोकांसाठी चालणे फायदेशीर ठरू शकते, कारण यामुळे सांध्यातील जडपणा आणि सूज होण्यास मदत होते. सांध्यातील लवचिकता सुधारण्यास मदत मिळते.

५) हाडांचे आरोग्य उत्तम राहते.

दररोज काही वेळ चालल्यामुळे हाडांची आरोग्य सुधारण्यास मदत होते. ऑस्टिओपोरोसिस आणि फ्रॅक्चरचा धोका कमी होतो.

६) पचनक्रिया सुधारते.

चालल्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह वाढतो आणि आतड्यांमधील स्नायू उत्तेजित होतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

७) रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

चालल्यामुळे पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन वाढवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकते, जे संक्रमण आणि रोगांशी लढण्यास मदत करते.

प्रतिदिन किती दिवस चाललं पाहिजे?

आपण दररोज १०,००० पावलं चालली पाहिजेत. जर तुम्ही रोज एक तास व्यायाम करत असाल तर तुम्ही दररोज ७,००० पावलं तरी चाललं पाहिजे असही खूबचंदानी म्हणाल्या. त्यामुळे ज्यांना सांधेदुखीला त्रास आहे अशा लोकांसाठी चालणे चांगले आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी चालण्याचे चांगलेच फायदे आहेत.

यावर धरमशिला नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसिन विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. गौरव जैन म्हणाले की, लोकांनी दररोज १०,००० पावलं तरी चाललं पाहिजे. तुम्ही दररोज किती पावलं चालता याची बेसलाइन सेट करा आणि नंतर तुम्ही तुमचे लक्ष्य गाठेपर्यंत प्रत्येक आठवड्यात १००० ने पावलं वाढवा. तुम्ही दररोज १०,००० पावले चालू लागला की पुन्हा यात वाढ करा. काही आठवड्यांनंतर तुम्ही चालण्याची गती वाढवू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चालल्यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीज कमी होण्यास मदत होते आणि तंदुरुस्त राहता. वजन कमी करण्यासाठीही कॅलरी कमी असणे आवश्यक आहे. यात आरामात चालणे शरीरासाठी फायदेशीर ठरते.