Genelia said Riteish Deshmukh :जिनिलिया आणि रितेश देशमुख हे चित्रपटसृष्टीतील एक आदर्श जोडपे म्हणून ओळखले जातात. हे दोघेही अभिनयासह त्यांच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत राहतात. अलीकडेच त्यांनी शाकाहारी होण्यासाठी आहारात केलेले काही महत्त्वाचे बदल सांगितले आहेत. तसेच जिनिलियानेसुद्धा नुकतेच एका मुलाखतीत रितेश चहा किंवा कॉफी पित नसल्याचा खुलासा केला आहे. त्यावेळी रितेशने सांगितले की तो ग्रीन टी पितो.

नियमित ग्रीन टी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

दूधाची कॉफी आणि चहाच्या तुलनेत ग्रीन टीचे भरपूर आरोग्यदायी फायदे आहेत, असे डीटीएफच्या न्युट्रिशनिस्ट आणि संस्थापक सोनिया बक्षी सांगतात.

त्यांनी काही खालील फायदे सांगितले आहेत.

हृदय : ग्रीन टीमुळे एकूण कोलेस्ट्रॉल कमी होण्यास आणि एचडीएल (चांगले) कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते.

वजन : ग्रीन टीमुळे चयापचय क्रिया सुधारते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

मानसिक सतर्कता : ग्रीन टीमुळे मानसिक सतर्कता व मूड सुधारतो.

पचनक्रिया : ग्रीन टीच्या सेवनाने पोटातील हानिकारक बॅक्टेरिया कमी होतात.

त्वचा : ग्रीन टी प्यायल्याने त्वचेवरील जळजळ कमी होते.

तणाव व एन्झायटी : ग्रीन टीमुळे तणाव व एन्झायटी कमी होण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये दूध कॉफीच्या तुलनेत एक तृतीयांश कॅफिन असते. ज्यांना एन्झायटीचा त्रास आहे, त्यांना आणखी चांगला पर्याय निवडणे गरजेचे आहे.

ब्लड शुगर : ग्रीन टी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

काय लक्षात घ्यावे?

ग्रीन टीच्या अर्कांमध्ये असलेल्या काही घटकांमुळे व्यक्तीच्या वजनावर परिणाम दिसू शकतो. बंगळुरू येथील एस्टर व्हाइटफिल्ड हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ विनी व्ही. सांगतात, “हे परिणाम पोषक आहारासारख्या जीवनशैलीचे अनुकरण केल्याने शरीरावर होणाऱ्या परिणामाच्या तुलनेत कमी आहे.”

बक्षी सांगतात की, उपाशी पोटी ग्रीन टीचे सेवन केल्याने अस्वस्थता, अॅसिडिटी, छातीत जळजळ आणि स्ट्रेस हार्मोन वाढतात. त्या पुढे सांगतात, “या तुलनेत दुधाची कॉफी तुम्ही उपाशी पोटी पिऊ शकता. तरी पण दोन्ही, ग्रीन टी आणि दुधाची कॉफी कधीही जेवणाबरोबर सेवन करू नये, कारण त्यामुळे अन्नातील लोहाचे शोषण कमी करते. जेवण आणि ग्रीन टी किंवा दुधाच्या कॉफीमध्ये कमीत कमी एक तासाचे अंतर ठेवा.”
ग्रीन टी तात्पुरती भूक कमी करण्यास चांगला पर्याय ठरू शकते, पण दीर्घकालीन फिटनेसचा विचार केला तर संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचे पर्याय आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.