Govinda Gun Injury daughter Emotional Experience: बॉलीवूड गाजवणारा अभिनेता गोविंदा यांच्या मुलीने म्हणजेच टीना आहुजा हिने सांगितले की, तिच्या वडिलांशी संबंधित एक भयानक घटना घडली होती. अभिनेता गोविंदा यांनी चुकून स्वतःच्या पायाला गोळी झाडली होती. ही घटना मुंबईतील त्यांच्या घरात घडली. गोविंदांकडे परवाना असलेली रिव्हॉल्वर आहे. गोळी लागल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले. उपचारानंतर गोविंदा पूर्णपणे बरा झाला. पण टीनासाठी तो दिवस अजूनही विसरणे कठीण आहे.

फिल्मीग्यानला दिलेल्या मुलाखतीत टीना म्हणाली, “त्या वेळेला माझ्या डोळ्यात आनंदाश्रू होते. कारण त्या वेळी मी देवाकडे खूप प्रार्थना केली होती. आणि मला खूप बरं वाटलं होतं की माझे वडील पुन्हा निरोगी, आनंदी झाले होते आणि त्या संकटातून बाहेर आले होते.”

टीना म्हणाली की, तिनेच वडिलांना रुग्णालयात नेले होते. ती वेळ खूप धक्कादायक होती. ती म्हणाली, “ते कोलकात्याला एका कार्यक्रमासाठी जाणार होते आणि त्यांची सकाळची फ्लाईट होती. त्यांनी पांढरी जीन्स, पांढरा टी-शर्ट आणि जॅकेट घातलेले होते. पण ती जीन्स पूर्ण लाल झाली होती.”

टीना म्हणाली की, तिच्या वडिलांना उपचार घ्यायला सुरुवातीला आवडत नव्हते. ती म्हणाली, “सुरुवातीला ते आयसीसीयूमध्ये होते आणि मी खाली झोपले होते. नंतर त्यांना आयसीयूमध्ये हलवले गेले. माझे वडील खूप हट्टी आहेत, अगदी देसी आहेत. त्यांना अँटिबायोटिक्स घ्यायलाही आवडत नाही, आणि अशा गोष्टींनी ते खूप चिडतात.”

संपूर्ण गोंधळातही टीना त्यांच्याजवळच राहिली आणि रुग्णालयाच्या जमिनीवर झोपली. ती म्हणाली, “त्या वेळी, अपघात झाला तेव्हाही मीच त्यांना रुग्णालयात नेले होते… आणि मी त्यांना म्हटलं, ‘पप्पा, हे सगळं तुमच्या चित्रपटांमुळे झालं आहे,’ कारण जसं सिनेमात दाखवतात तसं तुम्ही धैर्य दाखवलंत आणि रुग्णालयात गेलात.”

अशा मोठ्या भावनिक बदलांचा, म्हणजे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आलेल्या धक्क्यांचा, एखाद्या व्यक्तीच्या मनावर आणि भावनांवर दीर्घकाळात कसा परिणाम होतो?

सोमल खांगरोट, या ‘द आन्सर रूम’च्या परवानाधारक समुपदेशक आणि मानसोपचार तज्ञ म्हणतात, “जेव्हा आपला जवळचा माणूस एखाद्या मोठ्या वैद्यकीय अडचणीतून सावरतो, तेव्हा शरीरात ‘जीएएस मॉडेल’ (General Adaptation Syndrome) नावाची प्रक्रिया सुरू होते. सोप्या भाषेत सांगायचं तर, सुरुवातीला आपलं शरीर ‘अलार्म मोड’मध्ये जातं- म्हणजे लढा की पळा अशी स्थिती येते. त्या वेळी अॅड्रेनालिन आणि कोर्टिसोल सारखे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. त्यानंतर ‘रेझिस्टन्स फेज’ येतो, जिथे आपण सतत सावध आणि ताणाखाली असतो. आणि जेव्हा संकट संपतं, तेव्हा शरीर शांत होण्यासाठी काम करू लागतं. पण जर ताण खूप काळ टिकला, तर त्या सुटकेमुळे डोळ्यात पाणी येणं, थकवा किंवा अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते.”

त्या पुढे सांगतात की, अशा भावनिक धक्क्यांचा दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो- जसे की सततची चिंता, जास्त जागरूक राहणे किंवा त्या घटनेची आठवण करून देणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणे. त्या म्हणतात, “मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर असे ‘आनंदाश्रू’ अनेकदा न व्यक्त केलेल्या भीतीतून येतात. खरी उपचार प्रक्रिया म्हणजे त्या सुटकेचा आनंद आणि आधी झालेली भीती- दोन्ही भावनांना न दाबता, पूर्णपणे स्वीकारणे.”

जेव्हा एखादा रुग्ण स्वतःच्या विश्वासामुळे किंवा अस्वस्थतेमुळे उपचार घ्यायला तयार नसतो, तेव्हा कुटुंबीयांनी आपली चिंता कशी संभाळावी?

खांगरोट म्हणतात, “कुटुंबीयांनी लहान लहान टप्प्यांमध्ये समजुतीने बोलून निर्णय घ्यावा- जसं की एकावेळी एक पाऊल पुढे टाकण्याचं ठरवणं. यामुळे दोन्ही बाजूंना थोडं नियंत्रण असल्याचं वाटतं. त्याचबरोबर, स्वतःच्या भावना सांभाळणंही महत्त्वाचं आहे- जसं की डायरी लिहिणं, थोडा वेळ विश्रांती घेणं किंवा समुपदेशकाशी बोलणं. कधी कधी हे स्वीकारणं की आपण प्रत्येक गोष्ट नियंत्रित करू शकत नाही, हाच सर्वात दयाळू काळजी घेण्याचा मार्ग असतो.”