What Not To Eat With Tea: सकाळी, संध्याकाळी, दुपारी, रात्री, थंडीत, पावसाळ्यात अगदी रखरखत्या उन्हातही.. असं म्हणतात चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतोच. आपल्यापैकी अनेक जण चहाप्रेमी असतील. चहा हे जगभरात गाजलेलं पेय आहे. एक तरतरी आणण्यासाठी आणि मरगळ काढून टाकण्यासाठी कटिंग चहा पुरेसा ठरतो. बरं गरीब-श्रीमंत असा काही भेदभावही हा चहा करत नाही. सगळ्यांना हवी तशी ऊर्जा देऊन दिवसभर राबण्याची ताकद देतो. सामानही कमी एक चमचा पावडर, एक चमचा साखर, पाणी आणि थोडं दूध झाला चहा तयार. आता त्यात आवडीनुसार आले, काळीमिरी, तुळस, वेलची, केशर काहीही टाकता येतं. चहाबरोबर अनेकांना फरसाण, पोळी, भजी हे खायला सुद्धा आवडतं . पण मित्रांनो या तुमच्या आवडी कदाचित जीवावरही बेतू शकतात.

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या माहितीनुसार मीठ व दूध कधीच एकत्र खाऊ नये. म्हणजेच चहामध्ये दूध असते तर भजी, पोळी फरसाण हे तेलकट आणि खारट असतं, त्यामुळे फरसाण आणि चहा एकत्र घेतल्यास पोटात दुखू शकते. त्यामुळे दुधाच्या पदार्थांसह फरसाण अर्थात खारट पदार्थांचे सेवन करू नये. याशिवाय चहासह कोणत्या गोष्टींचे सेवन टाळायला हवे हे जाणून घेऊयात..

बेसन: चहाबरोबर खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये बहुतांश वेळा बेसन असतं. अगदी गरम भजी ते फरसाण साधारणपणे बेसन किंवा पिठापासून बनवले जातात. यामुळे पचन समस्या उद्भवू शकतात ज्यामुळे नंतर बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी होऊ शकते.

हिरव्या भाज्या: काही खाद्यपदार्थ एकत्र केल्याने त्यातील पोषणसत्व सुद्धा हानिकारक असू शकतात. चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सॅलेट्स नावाची संयुगे असतात जी रक्तात लोह शोषून घेण्यात अडथळा ठरू शकतात. यामुळे लोहयुक्त भाज्या, सुका मेवा चहासह खाणे टाळावे

लिंबू: अनेकांना लेमन टी आवडतो, परंतु तुम्हाला माहित आहे का की चहाची पाने लिंबूसोबत मिसळली की त्यात आम्ल वाढते. यामुळे पचनप्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

हे ही वाचा<<खजूर भिजवून खाल्ल्याने स्टॅमिना वाढतो का? केसगळतीसह ‘हे’ १४ त्रास होऊ शकतात दूर

हळद: हळदीचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांसह चहा पिणे टाळा. चहा आणि हळदीमध्ये असलेले रासायनिक घटक पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकतात. यामुळे शरीरात ऍसिड रिफ्लक्स होऊ शकतो.

हे ही वाचा<<किडनी स्टोन झाल्यास शरीरात सर्वात आधी दिसतात ‘ही’ लक्षणे; नेमका धोका कशाने वाढतो?

सुका मेवा : दुधासह लोहयुक्त पदार्थ खाणे चुकीचे आहे. चहासोबत सुका मेवा खाल्ल्याने आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. चहामध्ये असलेले टॅनिन नावाचे घटक पोषक तत्वांचे शोषण रोखू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)