हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला अशा आजरांनी अनेकजण त्रस्त असतात. हिवाळ्यात पडणारे धुके, प्रदूषण, थंडीचे वातावरण यांमुळे आजार आणखी बळावतात. पण या कारणांसह आणखी काही कारणांमुळेही हिवाळ्यात सर्दी खोकल्याचा त्रास होतो, जो टाळता येऊ शकतो. कोणती आहेत ती कारणं जाणून घ्या.

हिवाळ्यात सतत सर्दी खोकला होण्याची कारणं

आणखी वाचा: तुम्हालाही मोज्यांशिवाय बूट वापरण्याची सवय आहे? जाणून घ्या याचा पायांवर काय परिणाम होतो

झोप पुर्ण न होणे
निरोगी राहण्यासाठी ८ तासांची झोप घेणे आवश्यक असते. झोप पुर्ण न झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. यामुळे सामान्य सर्दीचे गंभीर स्वरूप होऊ शकते.

धूम्रपान
धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला हिवाळ्यात सर्दी, खोकल्याचा सर्वाधिक त्रास होऊ शकतो. याचा आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी निरोगी राहण्यासाठी धूम्रपान टाळावे.

स्वच्छता न राखणे
हिवाळ्यात सर्दी, खोकला अशा आजरांची साथ पसरते. त्यामुळे स्वच्छता न ठेवल्यास लगेच असे आजार होऊ शकतात, आजार बळावुही शकतात. त्यामुळे बाहेरून आल्यानंतर, खाण्यापुर्वी हात स्वच्छ धुण्याची सवय लावा, तसेच खोकताना, शिंकताना तोंड व नाक झाका. तुमच्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या.

आणखी वाचा: रात्री झोपण्यापुर्वी ‘हे’ पदार्थ खाणे ठरू शकते आरोग्यासाठी धोकादायक; वेळीच व्हा सावध

तणाव
तणावाचा फक्त मानसिक आरोग्यावरच नाही तर शारीरिक आरोग्यावरही प्रभाव पडतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे सर्दी होण्याचा धोका वाढतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)