अँटिबायोटिक्सना निर्माण होणाऱ्या या प्रतिरोधामुळे टीबी अर्थात क्षय आजाराचे नियंत्रण अधिक कठीण झाले आहे. टीबीवरील अनेक औषधांना दाद न देणारे लक्षावधी रुग्ण जगभरात आढळून येत आहेत. भारतासाठी ही परिस्थिती अधिक आव्हानात्मक आहे कारण जगभरातील एकूण टीबी रुग्णांपैकी सुमारे २५ टक्के रुग्ण आपल्या देशात आढळतात. आज रोजी देशभरात जवळपास २८ लाख टीबी रुग्ण आहेत. टीबी रुग्णांमध्ये प्रतिरोधाचे प्रमाण सुमारे चार ते पाच टक्के आहे. टीबी रुग्णांमधील अँटिबायोटिक्स प्रतिरोधाचे हे प्रमाण असेच वाढत गेले तर टीबी नियंत्रण आपल्याकरता कठीण गोष्ट होऊन बसणार आहे.

१९५०च्या पूर्वी ज्याप्रमाणे टीबी रुग्णांसाठी शहराबाहेर वेगळी रुग्णालये असत, ती अवस्था येण्याचा धोका या प्रतिरोधामुळे निर्माण झालेला आहे.एचआयव्ही एड्स वरील औषधांमध्ये देखील प्रतिरोध निर्माण होताना दिसतो आहे. मलेरियासाठी कारणीभूत असलेल्या परजीवींपैकी अधिक धोकादायक असणाऱ्या फाल्सीपारम मलेरियामध्ये नेहमीच्या औषधाविरुद्ध निर्माण होणारा प्रतिरोध मलेरिया नियंत्रणातील मोठा अडथळा आहे. अँटीबायोटिक्सच्या वापराबाबतची भारतातील परिस्थिती आपण सर्वांनी काळजी करावी अशी आहे २०१० ची जरी आकडेवारी आपण पाहिली तरी अँटिबायोटिक्सची जवळपास 13 अब्ज युनिट्स आपण देशभरात वापरली. याचा अर्थ सर्व जगभरात भारतातील अँटिबायोटिक्सचा वापर सर्वाधिक आहे. भारतात अँटिबायोटिक्सना वाढत्या प्रतिरोधाची कारणे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

हेही वाचा : एचपीव्हीचा प्रादुर्भाव रोखल्यास गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर मात करणे शक्य, जनजागृतीवर भर देणे आवश्यक

आपल्याकडे मेडिकल स्टोअरमध्ये डॉक्टरांच्या कोणत्याही प्रिस्क्रिप्शन शिवाय अँटिबायोटिक्स सहजतेने उपलब्ध होतात. दुकानदाराच्या किंवा इतर कोणाच्यातरी सल्ल्याने अनेकदा रुग्ण स्वतःहून अँटिबायोटिक्स घेतात अँटिबायोटिक संवेदनशीलता चाचणी किंवा ब्लड कल्चर यासारख्या प्रयोगशाळा तपासण्या सहजतेने उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा डॉक्टर आपल्या अनुभवानुसार अँटिबायोटिकचा वापर करत असतात. प्रमाणापेक्षा जास्त वापर करण्यासोबतच अनेकदा ती अपुऱ्या डोस मध्ये दिली जाणे, यामुळे सुद्धा प्रतिरोध निर्माण होतो. रुग्णाला कदाचित बॅक्टेरियामुळे संसर्ग झालेला असेल आणि तो आपल्याकडून उपचार करावयाचा राहू नये या भीतीने अनेकदा डॉक्टर गरज नसताना रुग्णाला अँटिबायोटिक्स देतात.

अँटिबायोटिक्स वापराबाबत अन्न आणि औषध प्रशासनाची नियामक यंत्रणा अपुरी असल्यामुळे तसेच मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने याबाबतचे नियमन काटेकोरपणे केले जात नाही हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मानवी आरोग्य विभागाशिवाय अँटिबायोटिकचा वापर पशुसंवर्ध,न मत्स्य उत्पादन, शेती यामध्ये देखील केला जातो. अनेकदा तो पशु, मासे किंवा धान्य याच्या निव्वळ वाढीसाठी केला जातो. औषध कंपन्यांमधून बाहेर पडणाऱ्या कचऱ्यामुळे होणारे पर्यावरणीय प्रदूषण देखील अँटिबायोटिक्स प्रतिरोधाला हातभार लावते.

हेही वाचा : Mental Health Special: बुलिंगमुळे मानसिक खच्चीकरण कसं होतं?

सूक्ष्मजीव विरोधी औषधांना निर्माण होणारा प्रतिरोध थांबवण्यासाठी शासकीय पातळीवर आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये या अनुषंगाने एक राष्ट्रीयकार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. २०१७ मध्ये आपण हा प्रतिरोध रोखण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला आहे. त्यामुळे शासकीय पातळीवर योग्य पावले उचलली जातच आहेत. मानवी आरोग्य,शेती, मत्स्य उत्पादन, पशुसंवर्धन आणि पर्यावरण हे सारे विभाग एकमेकांशी समन्वय साधून याबाबतीत योग्य कार्यवाही करत आहेत. मात्र या सगळ्या गोष्टी आपण केवळ शासनावर सोडून चालणार नाहीत. आपले आरोग्य ही आपली व्यक्तिगत आणि कौटुंबिक जबाबदारी देखील आहे आणि म्हणून आपल्या आजारपणामध्ये उपयोगी पडणारी सूक्ष्मजीव विरोधी औषधे आपल्या निष्काळजीपणामुळे निकामी होऊ नयेत. यासाठी आपण देखील आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे.

ॲन्टीबायोटिक्स वाचविण्यासाठी आपण काय करू शकतो ?

१) डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय कधीही स्वतःच्या मनाने अँटिबायोटिक्स घेऊ नयेत.
२) आपल्याला अँटिबायोटिक्स द्या असा आग्रह आपण डॉक्टरांना करू नये.
३) अँटिबायोटिक्स कोणत्या डोस मध्ये आणि किती काळाकरता घ्यावयाचे याबाबत डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
४) आपला उपचार पूर्ण झाल्यानंतर अँटीबायोटिक्सच्या काही गोळ्या, औषधे शिल्लक असतील तर ती इतर कोणाला देऊ
नयेत.
५) आपल्याला जंतुसंसर्ग होऊ नये याकरिता हातांची नियमित स्वच्छता, अन्न आरोग्यदायी पद्धतीने तयार करणे, आजारी
माणसाशी निकट संपर्क टाळणे, सुरक्षित शरीरसंबंध आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक लसीकरण वेळेवर पूर्ण करणे,
आवश्यक आहे.
६) सांगितलेले पाच मुद्दे लक्षात ठेवावेत. स्वच्छता, कच्चे आणि शिजवलेले अन्नपदार्थ वेगवेगळे ठेवणे, अन्न पूर्ण शिजवणे, तयार झालेले अन्न योग्य तापमानामध्ये ठेवणे, अन्न तयार करण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित पाणी व कच्चे पदार्थ वापरणे.

हेही वाचा : ग्रीन टी पिण्याने वजन अन् चरबी कमी होत नाही? नेमके काय म्हणतात आहारतज्ज्ञ जाणून घ्या..

समाज, शासन आणि व्यक्ती म्हणून आपण हातामध्ये हात घेऊन काम केले तर सूक्ष्मजीवाविरुद्ध लढणारी आपली औषधे आपण सुरक्षित ठेवू शकू आणि आपले आरोग्य देखील जपू शकू. म्हणूनच याबाबतीत सर्वसामान्य नागरिक, डॉक्टर्स, हॉस्पिटल्स पशुसंवर्धन मत्स्य उत्पादन आणि शेती क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी सूक्ष्मजीव विरोधी औषधांचा वापर काटेकोरपणे आणि नियमानुसारच करण्याची गरज आहे.