Uric Acid Removal Food: कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेप्रमाणेच शरीरात युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढणे हेही आरोग्यासाठी धोकादायक आहे. युरिक अ‍ॅसिड हे रक्तामध्ये आढळणारे एक टाकाऊ पदार्थ आहे. प्युरीन असलेल्या पदार्थांपासून आपल्या शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढतो. अतिरिक्त प्युरीनयुक्त पदार्थ खाण्यामुळे शरीराला युरिक अ‍ॅसिड नष्ट करणे कठीण होते आणि आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

युरिक अ‍ॅसिड म्हणजे काय?

युरिक अ‍ॅसिड हे रक्तामध्ये आढळणारे रसायन आहे. हे प्युरीनयुक्त पदार्थांच्या पचन प्रक्रियेदरम्यान तयार होते. जेव्हा शरीरातील प्युरीनचे प्रमाण एका ठराविक प्रमाणापेक्षा जास्त वाढते आणि मूत्रपिंड ते योग्य प्रकारे फिल्टर करू शकत नाही, अशा स्थितीत शरीरात युरिक अॅसिड वाढू लागते आणि त्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. शरीरात युरिक अ‍ॅसिड जमा होणे अत्यंत धोकादायक मानले जाते.

Which Fruits Can Increase or Reduce Uric Acid In Body Kidney Disease Symptoms Seen In Body
युरिक ऍसिडचा त्रास होत असल्यास कोणती फळे खावी व खाऊ नयेत? किडनीच्या बिघाडाची लक्षणे ‘अशी’ ओळखा
health benefits of fenugreek seeds
तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Uric Acid Cause Kidney Failure These Symptoms can be seen in Legs Know 5 remedies by Ayurveda Expert
किडनी निकामी होण्याआधी पायात दिसतात ‘ही’ लक्षणे; युरिक ऍसिड वाढल्यास हे ५ उपाय येतील कामी
uric acid causes
‘हे’ ५ पदार्थ ५०% यूरिक ॲसिड झपाट्याने काढून टाकतील; जाणून घ्या यादी

शरीरातील रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्यास सांधेदुखी, किडनीचे आजार, हृदयविकाराचा झटका हे धोकादायक आजार होण्याचा धोका वाढतो. जेव्हा आपण प्युरीन असलेले काही पदार्थ खातो तेव्हा शरीरात युरिक अ‍ॅसिडची पातळी सामान्यपेक्षा जास्त असते. रक्तातील खराब युरिक अ‍ॅसिड वाढल्याने किडनी निकामी होण्याचा धोका वाढू शकतो. वाढलेलं युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याविषयी हैदराबाद येथील केअर हॉस्पिटल्सच्या डॉ. जी. सुषमा यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

(हे ही वाचा : शेवग्याच्या शेंगाचे पाणी प्यायल्यानं रक्तातील साखर कमी होते? मधुमेहींसाठी खरंच ठरते वरदान? तज्ज्ञांकडून जाणून घ्या.. )

डॉक्टरांच्या मते, “युरिक अ‍ॅसिड वाढणे याला वैद्यकीय भाषेत हायपरयुरिसेमिया म्हणतात. औषधामध्ये युरिक अॅसिडसाठी अनेक औषधे आणि उपचार उपलब्ध आहेत, परंतु आपण काही आयुर्वेदिक उपायांनीदेखील आराम मिळवू शकतो. ज्यांना युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असल्याने उद्भवणारे त्रास असतात, अशा लोकांनी सिट्रसयुक्त फळांचे सेवन करणे फायद्याचे ठरू शकते. यात विशेषतः संत्रे, आवळा, लिंबू अशी फळं समाविष्ट असतात. या आम्लयुक्त फळांमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण मुबलक असते. ही फळे शरीरातील टॉक्सिन्ससारखे पदार्थ बाहेर काढून टाकण्यात मदत करतात.”

१. केळी

युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी एक केळं खाल्ल्याने तुमच्या शरीरातील युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी होऊ शकते. केळ्यामध्ये प्युरीनचे प्रमाण फारच कमी असते. याशिवाय केळ्यामध्ये जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात आढळतात. सांधेदुखीसारख्या गंभीर समस्यांपासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप फायदेशीर आहे.

२. कमी चरबीयुक्त दूध आणि दही

कमी चरबीयुक्त दूध आणि कमी चरबीयुक्त दही तुमच्या युरिक अ‍ॅसिडवरची पातळी कमी करण्यास मदत करते. एवढेच नाही तर ते तुमच्या शरीरातून युरिक अ‍ॅसिडला बाहेर काढण्यास मदत करते.

३. कॉफी

कॉफीमध्ये काही असे एन्झाइम आढळतात, जे शरीरातील प्युरीन तोडण्याचे काम करते. यामुळे युरिक अॅसिडचा वेग कमी होतो आणि लोकांना युरिक अ‍ॅसिडच्या त्रासापासून सुटका होण्यास मदत मिळते. तसंच कॉफीमध्ये शरीरात युरिक अ‍ॅसिड व्यवस्थित गाळून घेण्याची क्षमताही असते. यामुळे कॉफीच्या मदतीने युरिक अॅसिड स्तर नियंत्रणात राहतो.

(हे ही वाचा : महिलांमध्ये वाढतोय गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग; तुम्हाला दरवर्षी टेस्ट करणे गरजेचे आहे का? डाॅक्टरांनी दिलं उत्तर)

४. लिंबूवर्गीय फळे

आवळा, लिंबू, संत्री, पपई आणि अननस यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, म्हणून ते नैसर्गिकरित्या युरिक अ‍ॅसिडची उच्च पातळी कमी करण्यास मदत करतात.

५. चेरी

चेरीचे सेवन युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे. चेरी युरिक ॲसिड कमी करते, कारण त्यात अँथोसायनिन्स असतात, जे चेरींना त्यांचा रंग देतात. ज्या लोकांना युरिक ॲसिड जास्त आहे, त्यांनी चेरीचे सेवन करावे.