“सानवीला गेले आठवडाभर ताप होता काहीही खात नव्हती. काल थोडी लसूण चटणी आणि वरण भात खाल्लाय. थँक्स त्या लसूण चटणीच्या आयडियेबद्दल. नाहीतर नारळ पाण्याशिवाय काहीही खावंसं वाटत नव्हतं तिला” मानसी काळजीने सांगत होती. सध्या सगळीकडेच ताप, खोकला, सर्दीची साथ आहे आणि आजारपणात भुकेवर परिणाम होतोच. अशावेळी कमी प्रमाणात अन्न खाताना उत्तम पोषण मिळावं या एका भूमिकेतून आहारात आवर्जून समाविष्ट केला जाणारा पदार्थ म्हणजे घरात तयार होणाऱ्या विविध चटण्या!

डिप्स आणि केचप्सच्या काळात चटण्यांचं महत्त्व अधोरेखित होणं आवश्यक आहे. घरगुती चटण्यांमध्ये अँटिऑक्सिडंट आणि वेगवेगळ्या प्रकारचे पोषण घटक मुबलक प्रमाणात असतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या चटण्या एकदा तयार केल्या की, साधारण एक ते तीन महिन्यांपर्यंत आरामात फ्रिजमध्ये म्हणजेच कमी तापमानामध्ये साठवून ठेवता येऊ शकतात.

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Which of the raw and pasteurized milk is beneficial
कच्चे व पाश्चराइज्ड यापैकी कोणते दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
yoga poses to relieve gas
Health Special: पोटातील गॅसवर योगासनांचा जालीम उपाय; नेमके काय कराल? – भाग २
What is the Leidenfrost effect
Leidenfrost Effect : जेवण बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरताय? मग नक्की जाणून घ्या ‘या’ हॅकबद्दल
Seaweed imports What is the use of the element What is the benefit of this decision of the central government
चक्क समुद्र शैवालाची आयात? या घटकाचा उपयोग काय? केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किती फायदा?
Can drinking water with food cause gas or indigestion
जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…

चटण्या तयार करण्याच्या पद्धतींमध्ये देखील पाटा-वरवंटा आणि खलबत्ता ते मिक्सर-ग्राइंडर अशी तांत्रिक प्रगती आपण स्वीकारलेली आहेच. या बदलांतून पोषणघटकावर होणारा परिणाम अत्यल्प आहे. अनेकदा मिस्कर मध्ये पोषण घटक शून्य होऊन जातात असा समज आहे, मात्र कमी वेगाने एखादा अन्नघटक एकत्र करत ब्रेक केल्यास त्यातील स्निग्धांश उत्तम प्रकारे मिळून येतात आणि चव आणि प्रभाव शाबूत राहू शकतो. बाजारतील चटण्या विकत घेताना त्यात कोणतेही जास्तीचे चव वाढविणारे अन्नघटक नसतील तर त्या नक्कीच वापरल्या जाऊ शकतात.

हेही वाचा… Mental Health Special: प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्याचे कारण काय? कोणते उपाय कराल?

थोडसं पूर्वापार चालत आलेल्या पद्धतींकडे डोकावल्यास आपल्या लक्षात येईल की, अनेक सहज सोप्या घरगुती चटण्या दुर्लक्षित आहेत. केवळ आजारपणातच नव्हे तर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आपण आहारामध्ये वापरतो म्हणजे भाज्यांचं सूप म्हणा किंवा डाळ- भात म्हणा किंवा वरण- भात म्हणा याच्यासोबत थोडसं काहीतरी हलक मसालेदार म्हणून चटण्यांकडे पाहिलं जातं. चटण्यांचा समावेश करताना अगदी एखाद चमचा चटणी आपल्याला कायम पुरेशी असते.

आता नेमकं कोणत्या चटण्या वापराव्यात असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.

चटण्यांचे आपल्याकडे दोन प्रकार असतात एक म्हणजे कोरडी चटणी आणि दुसरी म्हणजे ओली. कोरड्या चटण्यांचे महत्त्व आहे की, वेगवेगळ्या तेलबियांपासून तयार केल्या जाणाऱ्या चटण्यांमध्ये फार कमी प्रमाणात मीठ वापरले जाते. मात्र स्निग्धाशांचा अर्क जास्त असल्यामुळे त्या चवीला उत्तम असतातच तसेच थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला ऊब मिळावी म्हणून योग्य पदार्थ आणि पोषण घटक या चटण्यांमध्ये समाविष्ट केलेले असतात. तसेच बाहेरगावी जाताना सोयीस्कर अशा या चटण्या आहेत.

१. जवस चटणी: आतड्यांच्या विकारांसाठी आणि पोटांच्या आरोग्यासाठी देखील जवस अत्यंत उपयुक्त असते. जवस चटणी आपण नेहमीच्या आहारामध्ये हमखास वापरू शकतो. अगदी वरण भातासोबत किंवा चटणी- भाकरी किंवा चपाती सोबत किंवा पोळीसोबत तूप आणि जवस असे मिश्रण करून वापरलेली ही चटणी आहारामध्ये उपयुक्त ठरू शकते.

२. तीळ चटणी: पांढरे तीळ किंवा काळे तीळ भाजून त्याच्यासोबत हलकी लाल मिरची पावडर एकत्र केल्याने आपण उत्तम तिळाची चटणी आहारामध्ये वापरू शकतो. आहारामध्ये समाविष्ट तिळाच्या चटणी सोबत तुम्ही पोळी खाऊ शकता किंवा भात खाऊ शकता किंवा जर तुम्ही ज्वारी किंवा बाजरीची खिचडी करत असाल तर त्यासोबत देखील तीळ चटणी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच तुम्ही जर काही दक्षिणात्य पदार्थ तयार करत असाल त्याच्यासोबत कोरडी चटणी म्हणून तिळाची चटणी वापरली जाऊ शकते

३. लसूण चटणी: लसूण आणि लाल मिरची पावडर यांचे योग्य मिश्रण केल्यास आपल्याला उत्तम कोरडी लसूण चटणी तयार करता येऊ शकते. हलका कोरडेपणा वाढवण्यासाठी यामध्ये सुक्या खोबऱ्याचा देखील वापर अनेक ठिकाणी केला जातो. ही चटणी वेगवेगळ्या पदार्थांबरोबर खाल्ली जाऊ शकते. म्हणजे संध्याकाळी आपण फक्त चणे किंवा उकडलेली कडधान्य खात असून तर त्यामध्येही एकत्र करता येऊ शकते. तुम्हाला ताप खोकला यांसारखे विकार असतील तर तोंडाला चव येण्यासाठी किंवा तुमच्या लाळ ग्रंथींना योग्य आयाम देण्यासाठी ही चटणी अत्यंत उपयुक्त आहे. लसणीमध्ये असणारे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक तुम्हाला उत्तम आयाम देतात. त्यामुळे लसूण चटणी ही देखील तुमच्यासाठी अत्यंत पोषक आहे.

४. कढीपत्ता चटणी: कढीपत्त्याची पानं तीळ किंवा कढीपत्त्याची पानं आणि कोरड्या हिरव्या मिरचीची पूड एकत्र करून केली जाणारी चटणी तुम्ही नेहमीच्या जेवणात देखील वापरू शकता त्याने तुमच्या पदार्थांची चव देखील वाढू शकते. शिवाय तुम्ही डोसा किंवा इडली खात असाल तर त्यासोबत देखील ही चटणी खाऊ शकता. पदार्थांची चव वाढवणारी आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच संपूर्ण पोषण घटक मिळवण्यासाठी आहारातून योग्य हरितके मिळवण्यासाठी कढीपत्त्याची चटणी अत्यंत उपयुक्त आहे.

५. पोडी चटणी: भाजलेल्या डाळींची किंवा डाळ चटणी पोडी दक्षिणात्य प्रकारची ही चटणी डाळींपासून तयार केली जाते. मुगडाळ, उडीद डाळ, चणाडाळ यांपासून तयार केली जाणारी ही चटणी प्रथिनांनी तर युक्त आहेच फण त्याचबरोबर तुम्हाला जेवणासोबत थोडासा क्रंच हवा असेल किंवा काहीतरी कोरडे पण चविष्ट हवे असतील तर ही पोडी चटणी अत्यंत उपयुक्त आहे.

अनेकद कोरड्या चटण्यांमध्ये धणेपूड किंवा जिरेपूड वापरली जाते. चटण्यांसाठी वापरले जाणारे मुख्य अन्न घटक पचायला सहज व्हावेत यासाठी वापरले जाणारे हे पदार्थ चटणी चविष्ट बनविण्यासोबत त्याचे पाचकमूल्य वाढवितात. कोरड्या चटण्यां सोबत भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या ओल्या चटण्यांची खूप मोठी परंपरा आहे. हिरवी चटणी लाल चटणी दक्षिणेकडे गेलं तर पिवळी चटणी, पांढरी चटणी अशा विविध प्रकारच्या चटण्यांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्या त्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या हिरव्या पाल्यासोबत खोबरे आणि विशेष लाल मिरची किंवा हिरवी मिरची असे मिश्रण करून ओल्या चटण्या तयार केल्या जातात . नेहमीच्या कोरड्या अन्न पदार्थांमध्ये हलका ओलावा आणि भरपूर हरितके आणि अँटिऑक्सिडंट्स यांचा योग्य समावेश ओल्या चटण्यांमुळे होऊ शकतो . विशेषतः दाक्षिणात्य पदार्थ खाताना कर्बोदकांसोबत फॅट्सचे (स्निग्ध पदार्थ ) योग्य प्रमाण आहारात ठेवून पचन हलके व्हावे यासाठी ओल्या चटण्यांचे महत्व विशेष आहे. यामुळे दोन्ही प्रकारच्या चटण्या आवर्जून नेहमीच्या आहारात समावेश करा. शक्यतो त्यात मीठाचा वापर कमी करा . म्हणजे चटणीची लज्जत आणि पोषण दोन्ही वाढेल.

याच निमित्ताने तुमच्याकडे कोणत्या चटण्या वापरता हेही आवर्जून कळवा…