आहारतज्ज्ञ म्हणून आहारात नेहमी ताज आणि घरी तयार केलेलं अन्न असावं यासाठी प्रत्येक आहारतज्ज्ञ् आणि पोषणतज्ज्ञ आग्रही असतात . पाकिटबंद पदार्थ खाऊ नका . रेडिमेड फळांचे रस किंवा पदार्थ खाऊ नका हे सांगण्यामागे शारीरिक स्वास्थ्य राखणे हा महत्वच मुद्दा असतो . अलीकडे विविध कारणास्तव वेळ नाही म्हणून पाकिटबंद पदार्थ सर्रास आहारात समाविष्ट केले जातात. एखाद्या पदार्थाचे पाकिटबंद आयुष्य वाढविण्यासाठी म्हणजेच पाकिटबंद असताना त्याचा रंग,पोत , चव , गंध नेहमीपेक्षा जास्त वेळ टिकवून ठेवण्यासाठी विविध प्रक्रिया केल्या जातात. या प्रक्रियेत विविध रसायनांचा वापर केला जातो.

खरंतर या पदार्थांचा वापर मानवी शरीराला नुकसानदायी ठरू नये म्हणून ठरविक प्रमाणातच केला जायला हवा मात्र अनेक संशोधनाअंती या रसायनांचे प्रमाण अनेक पदार्थात वाजवीपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. आजच्या लेखात अशाच वेगेवेगळ्या फूड ऍडिटिव्स म्हणजे पाकिटबंद पदार्थाचे आयुष्य वाढविणाऱ्या पदार्थाबद्दल तसेच त्याचा अतिरेकी वापरामुळे शरीरावर होणाऱ्या परिणामांबद्दल जाणून घेणार आहोत.

हेही वाचा : फक्त पालकच नाही तर तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण झपाट्याने वाढवतील ‘हे’ ५ पदार्थ; सेवनाची पद्धत जाणून घ्या डाॅक्टरांकडून…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणतेही पाकिटबंद अन्न खाताना त्यावर लिहिले घटक , त्यातील रसायनांची मात्रा जाणणे अत्यावश्यक आहे.

भारतीय खाद्यसंस्कृतीत ताजे, गरम किंवा घरगुती पदार्थाना भरपूर महत्व आहे . जेवढा पदार्थ ताजा तेवढं त्यातील पोषणमूल्य चांगलं असतं . हे सगळं लक्षात घेता पाकिटबंद पदार्थ शक्य तितके आहारातून वर्ज्य करून मसाल्यांपासून ते चटण्यांपर्यंत शक्य तिटाके पदार्थ घरीच करून खाणे उत्तम आहे हा बोध घेणे आवश्यक आहे.