शरीर निरोगी ठेवण्यासाठी रक्त शुद्ध असणं फार गरजेचं आहे. रक्त जर शुद्ध नसेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या सतत होऊ लागतात. तसंच रक्त शरीरातील पेशींमधून ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये वाहून नेण्याने महत्वाचे काम ते करते. शिवाय रक्त आपल्या शरीरातील तापमान, PH आणि पाण्याची पातळीदेखील नियंत्रित करते. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध असणं खूप गरजेच आहे.

रक्त शुद्ध ठेवण्यासाठी आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. तर रक्त शुद्ध करण्यासाठी काही औषधे घेण्याचीच गरज असते असं काही नाही, आपण नैसर्गिक उपायांनीदेखील रक्त शुद्ध करु शकतो. TheHealthSite.com शी बोलताना डॉ. वीणू गुप्ता, सल्लागार इंटर्नल मेडिसिन, मणिपाल हॉस्पिटल, गुरुग्राम यांनी नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करण्याचे काही उपाय सांगितले आहेत ते जाणून घेऊया.

व्यायाम –

हेही वाचा- घसा सतत खवखवतोय? तर झटपट आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करुन पाहा

व्यायामामुळे शरीरातील महत्वाचे अवयव बळकट होण्यास मदत होते हे सर्वांना माहिती आहे. पण रक्त शुद्ध करण्यासाठीही व्यायाम महत्त्वाची भूमिका बजावतो. कोणत्याही प्रकारचा व्यायाम शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुधारतो. शिवाय व्यायामामुळे जो घाम येतो त्यामुळे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. तसंच व्यायामुळे शरीरात योग्य ब्लड सर्कुलेशन होते जे यकृत आणि लिम्फ नोड्स व्यवस्थित काम करतात.

पाणी –

रक्त शुद्ध करण्यासाठी पाणी पिणे हा सर्वात सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. पाणी शरीरातील सर्व हानिकारक विषारी आणि टाकाऊ रसायने बाहेर टाकते. शिवाय पाणी रोगजनकांना काढून पाचनक्रिया सुधारते जे यकृताच्या संरक्षण करण्यास उपयोगी ठरते.

बीट –

बिटात नायट्रेट आणि अनेकप्रकारचे अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आढळतात. एका रिसर्चनुसार असं सांगण्यात आलं की, बिटाचा ज्यूस सेवन केल्याने बॉडी डीटॉक्स करण्यास मदत मिळते. याने रक्त शुद्ध होतं आणि लिव्हरही निरोगी राहतं.

बेरी –

हेही वाचा- तुमच्या मुलांचे डोळे कोरडे पडतायत? तर मग जाणून घ्या त्यामागची कारणे आणि घरगुती उपचार

बेरी हे अँटिऑक्सिडंट्सचे समृद्ध स्त्रोत आहेत जे यकृताला नुकसान होण्यापासून वाचवतात. रोजच्या आहारात बेरीचा समावेश करणे खूप फायदेशीर ठरू शकते.

गूळ –

गूळ हा रक्त शुद्ध करण्याचा सर्वात चांगला नैसर्गिक उपाय मानला जातो. गुळात असलेलं आयर्न रक्तातील हीमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. याने ब्लड सर्कुलेशन वाढतं. सोबतच शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर काढले जातात.

भाजीपाला –

ब्रोकोली, कोबी आणि मुळा यांसारख्या क्रूसीफेरस भाज्यांचा आहारात समावेश केल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. याशिवाय रोजच्या आहारात हिरव्या, पालेभाज्यांचाही समावेश करायला हवा.

कडुलिंब –

हेही वाचा- जेवल्यानंतर लघवी केल्याने डायबिटीज होत नाही? यामागील सत्य काय ते तज्ञांकडून जाणून घ्या

कडुलिंबाच्या पानांचे रक्त शुद्ध करणारे गुणधर्म त्वचेच्या, मुरुम, एक्जिमा आणि त्वचेवर पुरळ अशा समस्यांपासून संरक्षण करतात. कडुलिंबच्या कडू आणि तुरट अशा विविध गुणधर्मांमुळे रक्त शुद्ध करणारे म्हणून उत्कृष्ट कार्य करते. कडुनिंबाचे अँटी व्हायरल आणि अँटी फंगल गुणधर्म सर्वांना माहिती आहेत.

लिंबू –

रोज लिंबाचा रस कोमट पाण्यात घालून त्याचे सेवन केल्यानेही रक्त शुद्ध होतं. यातील मिनरल्स आणि व्हिटॅमिन शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत करतात. तसेच याने आपल्या किडनीचं आरोग्यही चांगलं राहतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या)