Health Tips for Diabetic Patients: दुपारच्या जेवणात राजमा भात खाल्ल्यानंतर तुम्हाला झोप येते का? किंवा जेवल्यानंतर एका तासाने तुम्हाला कुकीज खाण्याची इच्छा होते का? झोपेची तंद्री येण्याची भावना तुम्हाला जाणवण्याचे कारण फक्त तुम्ही खूप जास्त अन्न खाल्ले एवढेच नाही. त्यामागील आणखी एक कारण आहे आणि ते म्हणजे तुमची रक्तातील साखर लवकर वाढते आणि तितक्याच लवकर ती खाली येते, ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो आणि तुम्हाला काहीतरी खाण्याची इच्छा होते. पण, बदामांमध्ये त्या संपूर्ण प्रक्रियेला रोखण्याची अविश्वसनीय क्षमता असते. ते तुमचे शरीरातील कार्बोहायड्रेट्सच्या प्रक्रियेचा वेग मंदावते आणि तुमच्या शरीरातील साखरेच्या वाढीला आळा घालते.
बदाम- दही भात खाणे चांगले आहे का? (Is eating rice and almonds good for a diabetic?)

तुम्ही दुपारच्या जेवणात दहीभात खात असाल, तर ३० मिनिटांत तुम्हाला उत्साही वाटेल; पण ९० मिनिटांनी तुम्हाला झोप येईल. त्याच दहीभातामध्ये तुम्ही मूठभर सुका मेवा (बदाम, शेंगदाणे यांसारखे) घालून खा. सुक्या मेव्यातील फायबर आणि आरोग्यदायी फॅट्स तुमच्या शरीरात भातासारख्या कार्बोहायड्रेट्सचे पचन होण्याची प्रक्रिया मंद करतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढू शकते आणि जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटू शकते, ज्यामुळे तुम्हाला कुकीज किंवा इतर काही खाण्याची इच्छा होत नाही.

बदाम तुमच्या रक्तातील साखर कमी करू शकतात का? Will almonds bring your blood sugar down?

बदाम हे अत्यंत पौष्टिक आहेत. जेवणाबरोबर फक्त एक मूठभर बदाम खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जवळजवळ ३०% कमी होऊ शकते. त्यात मॅग्नेशियम भरपूर असते, जे तुमच्या शरीराला इन्सुलिनचा वापर चांगल्या प्रकारे करण्यास मदत करते.

तुम्ही कोणता सुका मेवा निवडावा?(Which Nuts Should You Choose?)

अक्रोड तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. म्हणून तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये अक्रोडाचा समावेश केलात, तर तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यामुळे कोणताच त्रास होणार नाही.

पिस्ते हे आकाराने लहान असू शकतात; पण त्याचे अविश्वसनीय असे शक्तिदायी फायदे असतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पांढऱ्या ब्रेडबरोबर पिस्ता खाल्ल्याने तुमच्या शरीराला ब्रेडमधील कार्बोहायड्रेट्स चांगल्या प्रकारे हाताळण्यास मदत होते. पिस्ता पचनक्रिया मंदावतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची मोठी वाढ रोखता येते. त्यामुळे जेवण अधिक संतुलित होते.

काजू आणि शेंगदाणे सहज उपलब्ध आणि परवडणारे पर्याय आहेत. त्यांच्यामध्ये प्रथिने आणि आरोग्यदायी चरबीचे परिपूर्ण मिश्रण असते, ज्यामुळे सर्व प्रक्रिया मंदावते.

कोणत्या पदार्थांबरोबर कोणता सुका मेवा खावा? (Which Nuts Go With What Foods)

उपमा, पोहे किंवा पराठे यांसारख्या नाश्त्याच्या पदार्थांमध्ये बदाम ही एक उत्तम जोड आहे. कारण- त्यांची चव सौम्य असते; जी या पारंपरिक सकाळच्या पदार्थांची चव न बिघडवता, शरीराला पोषण मूल्य देते आणि मॅग्नेशियम खरोखरच तुमच्या चयापचयाला चालना देण्यास मदत करते. दुपारच्या जेवणात तुम्हाला बदाम आणि पिस्त्याचे मिश्रण सेवन करा. रात्रीच्या जेवणात जेव्हा तुम्ही खिचडी, दहीभात किंवा पोळी-भाजी असे हलके कार्बोहायड्रेट्स घेत असता तेव्हा अक्रोड हा आदर्श पर्याय ठरतो. त्यामुळे रात्रीच्या उशिरा स्नॅक्स खाण्याची इच्छा कमी होते. तसेच त्यांच्यात अशी संयुगे आहेत, जी झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकतात. तसेच बहुपयोगी फायदे देणारे शेंगदाणे तुम्ही सर्व गोष्टींसह खाऊ शकता.

सुका मेवा किती आणि कधी खावा? (How Much and When to Have Them)

सुका मेवा मूठभर म्हणजे जो साधारण २०-३० ग्रॅम या प्रमाणात सेवन करावा. तुम्ही ते जेवणाच्या १०-१५ मिनिटे आधी खाऊ शकता किंवा जेवणाबरोबर खाऊ शकता, दोन्हीही उत्तम. जेवणाबरोबर सुका मेवा खाणे अधिक सोपे आणि तितकेच प्रभावी असते.

जरी सुक्या मेव्यामध्ये उष्मांक जास्त असला तरी काही लोक त्याचे सातत्याने सेवन करतात. कारण- त्यांना त्यामुळे त्यांचे वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाते. का? कारण जेव्हा तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहते, तेव्हा तुम्ही पुढच्या जेवणात जास्त अन्न खात नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख क्लिनिकल डाएटिशियन असलेल्या डॉ. रिद्धिमा खमेसरा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीवर आधारित आहे)