What Are The Benefits Of Tongue Twister : मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमधील अनेक शब्द आपल्याला माहिती असतात. पण, काही जणांची ते शब्द बोलताना जीभ नीट वळत नाही. असा त्रास असेल, तर अनेकदा आपण तोंडात पेन ठेवून काही वाक्यं म्हणतो किंवा टंग ट्विस्टर वाचून काढतो. अनेकदा मस्करीतसुद्धा एखाद्याला हे टंग ट्विस्टर बोलायला सांगतात. पण, तुम्हाला माहीत आहे का? वरवर मजा-मस्ती म्हणून खेळला जाणारा हा खेळ तुमच्या मेंदूसाठीसुद्धा खूप फायदेशीर आहे.
गेल्या वर्षी ‘व्होग इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान प्रियांका चोप्राने तिच्या आवडत्या टंग ट्विस्टरपैकी काही वाचून दाखवले. त्यात ‘कच्चा पापड, पक्का पापड’ यांचासुद्धा समावेश आहे. वरवर पाहता, मजा आणि खेळ वाटेल असे हे टंग ट्विस्टर प्रत्यक्षात मेंदूला चालना देणारी क्रिया आहे, जी विज्ञानाने समर्थित आहे.
तर याबद्दल जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने, नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील न्यूरोलॉजी सल्लागार डॉक्टर यतीन सागवेकर यांच्याशी चर्चा केली. ‘कच्चा पापड, पक्का पापड’सारखे टंग ट्विस्टर हे फक्त मुलांच्या खेळण्यापुरते मर्यादित नाही. ते बोलणे, स्मरणशक्ती, समन्वय व भाषेवर प्रभुत्व मिळवणे यांसाठी जबाबदार असलेल्या मेंदूच्या अनेक भागांना सक्रिय करते.
मानसिक प्रतिसाद आणि अचूक उच्चार (Tongue Twister Health Benefits)
‘कच्चा पापड, पक्का पापड’ हे वाक्य बोलण्यासाठी जलद मानसिक प्रतिसाद आणि अचूक उच्चार आवश्यक आहे. यांसारखी वाक्य सातत्याने बोलल्यामुळे तंत्रिका मार्गांना मजबूत करण्यास मदत करते आणि चांगल्या संवाद कौशल्यांना समर्थन देते, असे डॉक्टर सागवेकर स्पष्ट करतात.
टंग ट्विस्टरची जटिलता कार्यरत स्मरणशक्ती आणि संज्ञानात्मक लवचिकतेवर परिणाम करते, ज्यामुळे ते विशेषतः भाषा विकसित करण्याचा प्रयत्न करणारी मुले, मेंदूचे कार्य राखण्यासाठी धडपडणारे वृद्ध व स्पीच थेरपी घेणाऱ्या व्यक्ती यांसाठी ते भरपूर फायदेशीर ठरतात. पण, टंग ट्विस्टर केवळ वैद्यकीय फायद्यांसाठी नाही आहेत. अभिनेते, सार्वजनिक वक्ते व भाषा शिकणारे, उच्चार सुधारणारे व स्वरयंत्रांना सुधारू इच्छिणारे हे सर्वच जण टंग ट्विस्टरवर बराच काळ अवलंबून असतात .
बहुभाषिक भाषा बोलणाऱ्या प्रियांकाने प्रयत्न न करताही जीभ वळवण्याच्या उपचारात्मक क्षमतेचे सहजतेने प्रदर्शन केले. डॉक्टर सागवेकर यांनी सुचविल्याप्रमाणे, आठवड्यातून दोन ते तीन वेळा फक्त ५ ते १० मिनिटे सराव केल्याने संज्ञानात्मक तीक्ष्णतेमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकतात. विशेषतः अशा प्रकारच्या शब्दांचा उच्चार करण्यामुळे मेंदूसाठी एक प्रकारचा व्यायाम मिळतो.
मानसिक व्यायामशाळेचे सेशन (mental gym session) – विशेष उपकरणे किंवा वेळखाऊ दिनचर्येशिवाय तुम्ही हा प्रयोग कुठेही बसल्यावर करू शकता. तुम्ही ट्रॅफिकमध्ये ‘कच्चा पापड, पक्का पापड’ म्हणत असाल, तर तुम्ही तुमच्या मेंदूला एक सौम्य; पण शक्तिशाली कसरत देत आहात.