Kidneys are going for a toss: हल्ली तरुणांमध्ये बॉडी बनवण्याची क्रेझ वाढली आहे, त्यामुळे कमी वयातच मुलं जिमला जातात. ते जिमलाच जात नाहीत तर जिम जॉईन केल्यानंतर एक मोठी चूकही करतात आणि हीच चूक त्यांच्या जीवावर बेतू शकते. जिमला जाणाऱ्या तरुणांमध्ये किडनी खराब होण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊयात. बालरोगतज्ज्ञ डॉ. शिवरंजनी संतोष यांनी सोशल मीडियावर तरुणांमध्ये प्रोटिन्सच्या अतिसेवनाबद्दल चिंता व्यक्त केली. प्रौढ तरुण १.४१ किंवा १.५ मिलीग्राम प्रति डेसीलीटर क्रिएटिन घेत असल्यामुळे किडनीला त्रास होत आहे. प्रोटिन्स शिफारस केलेल्यापेक्षा जास्त प्रमाणात खात आहेत. शरीराच्या वजनाच्या १.०५ ग्रॅम ते ०.८५ ग्रॅम प्रोटिन्स किंवा २० टक्के कॅलरीज प्रोटिन्सपासून मिळायला हव्यात अशी शिफारस आहे. मात्र, मुले दररोज २-२.५ ग्रॅम जास्त प्रोटिन्स खातात असे डॉ. संतोष यांनी निदर्शनास आणून दिले. दरम्यान, या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मुंबईतील चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट डॉ. विश्वनाथ बिल्ला यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

क्रिएटिनिन म्हणजे काय?

“क्रिएटिनिनची पातळी वाढणे हे मूत्रपिंडाच्या कार्यासाठी चिंताजनक लक्षण असू शकते, विशेषतः जास्त प्रमाणात प्रोटिन्स घेणाऱ्या तरुणांमध्ये,” असे डॉ. विश्वनाथ बिल्ला यांनी सांगितले

क्रिएटिनिन हे स्नायूंच्या चयापचयातून निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ आहे आणि त्याचे प्रमाण अनेकदा किडनीच्या आरोग्याचे सूचक म्हणून वापरले जाते. “आहारामधून जास्त प्रमाणात प्रोटिन्स घेतल्याने किडनीवर अतिरिक्त ताण येऊ शकतो, विशेषतः ज्यांना आधीच आजार आहेत. फिटनेस ट्रेंड किंवा बॉडीबिल्डिंगमुळे प्रेरित तरुण मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स सेवन करून त्यांच्या किडनीच्या कार्यावर जास्त ताण देतात. आहारातीलही प्रोटिन्सचा स्रोत आणि प्रमाण दोन्ही विचारात घेणे आवश्यक आहे,” असे डॉ. बिल्ला म्हणाले.

जेव्हा प्रोटिन्सचे जास्त सेवन कमी हायड्रेशन किंवा इतर आरोग्य समस्यांशी जोडले जाते, तेव्हा ते किडनीवर अतिरिक्त दबाव आणू शकते आणि क्रिएटिनिनची पातळी वाढवू शकते, असे ठाणे येथील किम्स हॉस्पिटल्सचे नेफ्रोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. महेश प्रसाद म्हणाले. आहारातील बदलांव्यतिरिक्त, तरुणांना योग्य हायड्रेशन आणि नियमित किडनीचे कार्य तपासणीचे महत्त्व याबद्दल शिक्षित केले पाहिजे, विशेषतः जर ते उच्च-प्रथिनेयुक्त आहार घेत असतील किंवा तीव्र शारीरिक हालचाली करत असतील तर. “संतुलित पोषणाला प्रोत्साहन देणे आणि वैयक्तिक आरोग्याच्या गरजा समजून घेणे दीर्घकालीन किडनीच्या समस्या टाळण्यास मदत करू शकते. विशिष्ट सल्ला देण्यासाठी आरोग्यसेवा व्यावसायिकांशी सल्लामसलत करणे अत्यंत आवश्यक आहे, असे डॉ. बिल्ला म्हणाले.

डॉ. प्रसाद यांनी खालील प्रमुख शिफारसी सांगितल्या

शिफारस केलेल्या प्रोटिन्सच्या मर्यादांचे पालन करा – सक्रिय व्यक्तींसाठी दररोज प्रोटिन्सचे सेवन प्रति किलोग्राम शरीराच्या वजनाच्या १.८ ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. आदर्शपणे, हे मसूर, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि काजू यांसारख्या नैसर्गिक अन्न स्रोतांमधून मिळवावे.

प्रोटिन्स पावडरचा लवकर वापर टाळा – प्रोटिन्स पूरक आहार १४ ते १५ वर्षांच्या आधी वापरू नये. जर आहारातील कमतरता दिसून येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं प्रोटिन्सचे सेवन करा.

सप्लिमेंट लेबल्स काळजीपूर्वक वाचा – कॅफिन, साखर आणि कृत्रिम घटकांसारखे अनावश्यक पदार्थ नसलेले उत्पादने निवडा.

हायड्रेटेड राहा आणि किडनीच्या कार्याचे निरीक्षण करा. उच्च-प्रथिनेयुक्त आहार घेणाऱ्या लोकांनी पुरेसे पाणी पिण्याची खात्री करावी. डॉ. प्रसाद यांनी इशारा दिला की, किडनी बिघडण्याच्या सुरुवातीला लक्षणे दिसून येत नाहीत, त्यामुळे किडनीच्या ताणाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यासाठी नियमित किडनीच्या कार्य चाचण्या कराव्यात.