Skin cancer risk: सध्या महिलांसाठी मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर या गोष्टी साधारण झाल्या आहेत. कोणताही सण, समारंभ असला की कपडे,दागिन्यांच्या खरेदीबरोबरच पार्लरमध्येही तेवढाच खर्च केला जातो. काइली जेनरपासून रिहानापर्यंत, सेलिब्रिटी आणि अनेक मोठ्या व्यक्तींनी नेल आर्ट, अॅक्रेलिक एक्स्टेन्शन तसंच जेल मॅनिक्युअर यांचं वेड लोकांना लावलं आहे. ग्लॅमरस दिसणारे हे मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर याची किंमत तुम्हाला गंभीर आजारात मोजावी लागू शकते असा इशारा तज्ज्ञ देतात. त्वचेच्या कर्करोगाचा धोका हा जरी दुर्मीळ असला तरी त्याचा फटका आरोग्याला तर बसू शकतो.
कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन दिएगो इथल्या संशोधकांनी या अल्ट्राव्हायोलेट प्रकाश उत्सर्जक उपकरणांचा अभ्यास केला आणि त्यांनी धक्कादायक माहिती समोर आणली आहे. या यूव्ही प्रकाश असलेल्या उपकरणांच्या वापरामुळे मानवी पेशांमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक आहेत, जे २०२३मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रकाशित झाले.
२०२४ मध्ये युरोपियन जर्नल ऑफ डर्मेटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अल्ट्राव्हायोलेट नेल लॅम्पसशी संबंधित त्वचेच्या घातक परिणांमांचा पूर्ण आढावा घेतला. यामध्ये यूव्ही नेल लॅम्प्सच्या दीर्घकाळ संपर्कात राहणे आणि संभाव्य कर्करोगाचा धोका यांचा संबंध असल्याचे मर्यादित पण खूप महत्त्वाचे पुरावे आहेत.
यूव्ही नेल लॅम्प आणि त्वचेचा कर्करोग
PRISMA मार्गदर्शक तत्त्वांनुसार केलेल्या वैद्यकीय डेटाबेस मेडलाइन आणि एम्बेसमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात यूव्ही नेल लॅम्प्सचा त्वचेच्या कर्करोगाशी संबंध असल्याचे मर्यादित मात्र लक्षणीय पुरावे आढळले. संशोधकांनी यावरून असा निष्कर्ष काढला की, यूव्ही प्रकाश आणि जेल पॉलिशच्या सततच्या संपर्कामुळे त्वचेच्या कॅन्सरचा धोका फार नाही.
जेल मॅनिक्युअर आणि अॅक्रेलिक नखं ही सध्या एक स्टाइल स्टेटमेंट आणि स्वत:ची काळजी घेण्याची पद्धत ठरली आहे. असं असताना ते नैसर्गिक नखांना नक्कीच हानी पोहोचवू शकते. तसंच काही प्रमाणात आरोग्याबाबत गुंतागुंतही होऊ शकते. अॅक्रेलिक नखांसाठी वापरल्या जाणाऱ्या गममध्ये बहुतेकदा अल्कोहोल, सायनोअॅक्रिलेट आणि फोटो बॉन्डेड मेथाक्रिलेट असते, तर काही फॉर्म्युलेशनमध्ये फॉर्मल्डिहाइड असते, ते क कार्सिनोजेन आहे. अशा रसायनांच्या दीर्घकाळ आणि वारंवार संपर्कामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो आणि कदाचित कर्करोगाचा धोकाही वाढू शकतो.
जेलच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या नखांच्या समस्या
- स्यूडो-सोरायटिक नखे- नखाखालीलजाड त्वचा सोरायसिसची नक्कल करते, ती अनेकदा मिथाइल मोथाक्रिलेट अॅलर्जीशी संबंधित असते.
- पेरिफेरल न्यूरोपॅथी- रसायनांच्या दीर्घकाळ संपर्कामुळेबोटांमध्ये सुन्नता किंवा मुंग्या येणे
- ट्रॉमिटिक ऑन्कोलिसिस- नखे काढताना नखाच्या तळापासून वेगळी होतात, त्यामुळे त्वचेला संसर्ग होतो.
- जास्त प्रमाणात फाइलिंग आणि रफ रिमूव्हल वापरल्याने नेल प्लेट्स कायमचे खराब होऊ शकते. त्यामुळे रंगहीनता आणि कडा निर्माण होतात.
जेल आणि यूव्ही नेल ट्रीटमेंट दरम्यान सुरक्षित कसे असावे?
मॉफिट कॅन्सर सेंटरच्या माहितीप्रमाणे, यूव्ही नेल लॅम्पशी संबंधित जोखीम कमी करण्याचे काही मार्ग आहेत…
संरक्षण हँड ग्लव्ह्ज वापरा- काही सलूनमध्ये टायटॅनियम डायऑक्साइड असलेल्या विशेष पॉलिमरपासून बनवलेले बोटांशिवाय हँडग्लव्ह्जउपलब्ध असतात. ते तुमचे हात अतिनीस किरणांपासून वाचवण्यासाठी प्रभावी ठरतात.
सनस्क्रीन लावा- अतिनील करणांचे नुकसान कमी करण्यासाठी ग्राहक जेल मॅनिक्युअर करण्यापूर्वी त्यांच्या हातांना किंवा जेल पेडिक्युअरपूर्वी पायांना ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावू शकतात.
पर्यायांचा विचार करा- नियमित मॅनिक्युअर किंवा आरोग्यदायी पर्याय म्हणजे नैसर्गिकरित्या नखांचा आनंद घेणे, अतिनील किरणे आणि कठोर रसायने पूर्णपणे टाळा.
नैसर्गिक नखे सुंदर- सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे नैसर्गिक नखांचा आनंद घेणे आणि यूव्ही प्रकाश रसायने टाळणे.
कर्करोगाचा धोका कमी असला तरी जेल किंवा अॅक्रेलिक नखे नियमितपणे निवडणाऱ्या प्रत्येकासाठी जागरूकता आणि प्रतिबंधात्मक काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे तज्ज्ञांचे मत आहे.