डॉक्टरांच्या मते शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. उच्च कोलेस्टेरॉल असल्यास हृदयविकाराचा झटका, रक्तदाब, ब्रेन हॅमरेज यासह अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. योगगुरू बाबा रामदेव यांनी एका व्हिडिओमध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यांच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.

लसणाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होते

बाबा रामदेव म्हणाले की, लसणाच्या काही पाकळ्या घ्या आणि रात्री पाण्यात भिजवा. त्याचे छोटे छोटे तुकडे सकाळी काढा. याच्या वापराने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते .

( हे ही वाचा: जेवणात प्रामुख्याने नारळ वापरताय? तर वेळीच व्हा सावध! ‘या’ आजारांमध्ये नारळ करतो विषासमान काम)

या ५ गोष्टींच्या मिश्रणाने कोलेस्ट्रॉल कमी होते

योगगुरू बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार, लसूण, कांदा आणि आले समान प्रमाणात घेऊन ते सर्व ठेचून त्यात लिंबाचा रस मिसळा. आता या सर्वांचा रस काढून मंद आचेवर शिजवा. जेव्हा ते घट्ट होईल तेव्हा त्यात समान प्रमाणात मध मिसळा आणि नियमितपणे एक चमचा सेवन करा. त्यांनी सांगितले की याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल पूर्णपणे नष्ट होते. यासोबतच हृदयविकाराचा झटका, रक्तदाब यांसारख्या गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुधीचा रस घ्या

योग गुरूने सांगितले की कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दुधी खूप फायदेशीर आहे. याच्या रसाचे नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप कमी होते. यासोबतच याच्या सेवनाचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.