मुंबईत उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांना गंभीर इशारा दिला असून, रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. अलीकडे अन्न विषबाधा झाल्याच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला देण्यात आला आहे. या प्रकरणांमुळे वाढत्या उष्णतेच्या महिन्यांमध्ये अन्न सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. मुंबई लाइव्हच्या वृत्तानुसार, मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर येथील एका स्थानिक दुकानातून चिकन शॉर्मा खाल्ल्याने एका १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर इतर पाच जणांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या महिन्यात गोरेगाव पूर्व येथे चिकन शॉर्मा खाल्ल्याने किमान १२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उन्हाळ्यात रस्त्यावर खाद्यपदार्थ खाण्याचे धोके

नागरी संस्थेचे आवाहन उन्हाळ्याच्या हंगामात रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाण्याशी संबंधित गंभीर धोके दर्शवते आहे. उन्हाळ्याच्या हंगामात जेव्हा तापमान तीव्र असते, तेव्हा खाद्यपदार्थातील हानिकारक जीवाणू आणि रोगजनकांच्या प्रजननासाठी योग्य वातावरण तयार होते.

स्पर्श हॉस्पिटल बेंगळुरू येथील गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि बॅरिएट्रिक सर्जरीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. प्रणव होन्नावरा श्रीनिवासन यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की, “उन्हाळ्यात उच्च तापमान अन्नामध्ये बॅक्टेरिया वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करते, त्यामुळे अन्नातून पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. साल्मोनेला (Salmonella), ई. कोली (E. coli) आणि स्टॅफिलोकोकस ऑरियस (Staphylococcus aureus t) सारखे सामान्य रोगजनक उबदार वातावरणात वाढतात. म्हणूनच अयोग्यरित्या साठवलेले किंवा हाताळलेले अन्न धोकादायक ठरते.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, जीवाणूंच्या झपाट्याने वाढीमुळे उष्ण हवामानात अन्नातून आजार जास्त प्रमाणात पसरतात.”

हेही वाचा – तापमानाचा वाढला पारा, लाडक्या पाळीव प्राण्यांचे आरोग्य सांभाळा! उष्णतेच्या लाटेमुळे कुत्रा-मांजरही त्रासले, अशी घ्या त्यांची काळजी?

अन्न विषबाधेची कारणे आणि उच्च तापमानाचा प्रभाव

“रस्त्यावरील खाद्यपदार्थ जीवाणू (बॅक्टेरिया), विषाणू (व्हायरस) आणि परजीवी (पॅरसाईट्स) यांच्यामुळे दूषित होण्यासह अनेक कारणांमुळे अन्न विषबाधा होऊ शकते”, असे डॉ. श्रीनिवासन सांगतात. उच्च तापमान जीवाणूंच्या वाढीला गती देऊन हे धोके वाढवते.

श्रीनिवासन यांनी जर्नल ऑफ फूड प्रोटेक्शनमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासाचा हवाला देत सांगितले की, “उबदार परिस्थितीत बॅक्टेरियाची संख्या लक्षणीयरीत्या वाढते, म्हणूनच अन्नातून पसरणारे आजार टाळण्यासाठी योग्य अन्न साठवण आणि हाताळणी महत्त्वपूर्ण ठरते. दूषित पाणी, अशुद्ध स्वयंपाकाची भांडी आणि अन्न हाताळणाऱ्यांची खराब वैयक्तिक स्वच्छता ही देखील सामान्य कारणे आहेत.”

हेही वाचा- Heatwave alert : शरीराला थंडावा देण्यासाठी ‘या’ औषधी वनस्पती आहेत सर्वोत्तम, रोजच्या आहारात करा समावेश

विक्रेते आणि ग्राहकांसाठी प्रतिबंधात्मक उपाय


अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विक्रेत्यांनी आणि ग्राहकांनी अनेक आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत:

विक्रेत्यांसाठी

  • योग्य साठवण: जीवाणूंची वाढ रोखण्यासाठी नाशवंत वस्तू रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्या आहेत किंवा योग्य तापमानात साठवल्या आहेत याची खात्री करा.
  • स्वच्छता पद्धती: नियमित हात धुणे, स्वच्छ भांडी वापरणे आणि अन्नाची तयारी करण्यासाठी वापरला जाणारा टेबल व्यवस्थित स्वच्छ करणे.
  • पूर्णपणे शिजवा: हानिकारक जीवाणू नष्ट करण्यासाठी सर्व अन्न सुरक्षित तापमानात शिजवा. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, अन्नातून पसरणारे आजार टाळण्यासाठी अन्न योग्य तापमानात शिजवणे आवश्यक आहे.

ग्राहकांसाठी

  • प्रतिष्ठित विक्रेते निवडा: चांगल्या स्वच्छता पद्धतींचे स्पष्टपणे पालन करणारे विक्रेते निवडा. स्वच्छ परिसर आणि योग्य पद्धतीने अन्न हाताळले जात आहे का याची खात्री करा .
  • नाशवंत पदार्थ टाळा: सॅलेड, दुग्धजन्य पदार्थ आणि उष्णतेमध्ये लवकर खराब होणारे कच्चे मांस यांसारखे पदार्थ टाळा. हे अन्न योग्य प्रकारे साठवले नाही तर बॅक्टेरिया होण्याची शक्यता असते.
  • स्वच्छतेचे निरीक्षण करा: विक्रेते आणि त्यांच्या स्टॉलच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. योग्य प्रकारे झाकलेले अन्न असलेले स्टॉल स्वच्छ केल्याने अन्न विषबाधा होण्याची शक्यता कमी असते.

हेही वाचा – World No Tobacco Day: “धूम्रपान सोडणे इतके अवघड का आहे? तुम्हाला धुम्रपान करण्याची इच्छा का होते? जाणून घ्या…

नियमांची प्रभाविता आणि अधिक सुधारणांची आवश्यकता

डॉ. श्रीनिवासन स्पष्ट करतात, “सध्याचे नियम रस्त्यावरील खाद्यपदार्थांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवतात, परंतु अंमलबजावणी विसंगत असू शकते. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) च्या मते, नियमित तपासणी करून आणि विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून अन्न सुरक्षा मानकांचे पालन करण्यामध्ये लक्षणीय सुधारणा करू शकतात.

सार्वजनिक आरोग्याचे अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी, त्यांनी खालील सुधारणा सुचवल्या आहेत

अधिक वारंवार तपासणी: अन्न सुरक्षा नियमांचे सतत पालन सुनिश्चित करण्यासाठी तपासणीची वारंवारता वाढवा.

उत्तम पायाभूत सुविधा: विक्रेत्यांना स्वच्छता मानके राखण्यात मदत करण्यासाठी त्यांना योग्य साठवण सुविधा आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्या.

कठोर दंड: अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांसाठी कठोर दंड लागू करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सार्वजनिक जागरूकता मोहिमा: उन्हाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाण्याच्या जोखमींबद्दल आणि चांगल्या स्वच्छता पद्धतींचे पालन करणारे विक्रेते निवडण्याचे महत्त्व याबद्दल लोकांना शिक्षित करा.