Pillow and sleeping : झोपताना जास्तीत जास्त लोक डोक्याखाली उशी घेतात. काही लोकांना उशीशिवाय झोपच येत नाही. पण, असं करणं आरोग्यासाठी किती नुकसानकारक असतं हे अनेकांना माहीत नसतं. प्रत्येकाच्या झोपण्याच्या सवयी वेगळ्या असतात. काहींना शरीर सरळ रेषेत ठेवून झोपायची सवय असते, तर काही जण आडवे-तिडवे झोपतात, काहींना उशी लागते, तर काही विनाउशीचे झोपतात. खरंतर उशी घेऊन झोपणं शरीरासाठी योग्य नाही, असं म्हटलं जातं. यासंदर्भात MBBS, MD, जनरल मेडिसिन, सल्लागार फिजिशियन डॉ. पॅलेटी सिवा कार्तिक रेड्डी यांनी सविस्तर माहिती दिली आहे. कंटेन्ट क्रिएटर डॉ. मेहस यांच्या मते, उशीचा सतत वापर केल्याने त्वचेवर सुरकुत्या पडू शकतात. कारण उशीमुळे चेहऱ्यावर दबाव पडतो. जे लोक उशीचा वापर करत नाहीत, त्यांना ही समस्या होत नाही. उशी न वापरल्याने पिंपल्स येण्याची समस्याही कमी होते. कारण उशीचे कव्हर नेहमी धुतले जात नाहीत, त्यामुळे त्यातील धूळ-कण यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. यावेळी डॉ. मेहस यांनी एक व्हिडीओ शेअर करत आपण उशीचा वापर चुकीच्या पद्धतीने कसा करतो हे दाखवलं आहे. उंच उशीसह झोपणे त्वचेच्या समस्या वाढवते MBBS, MD, जनरल मेडिसिन, सल्लागार फिजिशियन डॉ. पॅलेटी सिवा कार्तिक रेड्डी यांनी उंच उशीवर झोपल्यास तुमच्या त्वचेवर काय परिणाम होऊ शकतो हे स्पष्ट केले आहे. “उंच उशी घेतल्यानं सर्वात पहिला आजार म्हणजे मानेचा त्रास. उशी घेतल्याने मानदुखी सतत चालू राहते. यासाठी तुम्ही नेहमी लहान उशी अथवा अत्यंत मऊ उशीचा वापर करावा. तसेच उशीमुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. डॉ. रेड्डी पुढे सांगतात, "सतत उशीच्या वापरामुळे त्वचेला कोरडेपणा, संक्रमण होण्याची अधिक शक्यता असते." डॉ. रेड्डी खालील शिफारस करतात की, अशी उशी निवडा जी मानेच्या मणक्यावरील ताण कमी करेल. तरीही जर मानेच्या वेदना कायम राहिल्यास डॉक्टरांकडे जाणे फायदेशीर आहे. डॉक्टर रेड्डी सांगतात, अपुऱ्या पद्धतीच्या उशीचा आधार एखाद्या व्यक्तीच्या मणक्यावर गंभीर परिणाम करू शकतो. ही झीज होऊन मानेच्या डिस्क्स आणि सांध्यांवर परिणाम होतो, ज्यामुळे वेदना होतात. उंच उशीचा वापर केल्याने मणक्याची झीज वाढू शकते, ज्यामुळे स्पॉन्डिलेसिस होण्याचा धोका वाढतो. उंच उशीच्या वापरामुळे सतत मानदुखी, डोकेदुखी आणि खांदेदुखी हा रोजचा त्रास उद्भवू शकतो; यामुळे झोपेमध्ये व्यत्यय, मूडवर परिणाम होऊ शकतो. हेही वाचा >> पोटात साचलेल्या घाणीमुळे जडतात गंभीर आजार; पोषणतज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ पेयानं अंतर्गत अवयव ठेवा स्वच्छ उशी निवडताना महत्त्वाचा घटक डॉ. रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, “उशीचे प्राथमिक कार्य म्हणजे मानेच्या नैसर्गिक वक्रला आधार देणे. डोके आणि मान तटस्थ स्थितीत ठेवणाऱ्या उशा शोधा.” मोठ्या उशीचा परिणाम हा मेंदूतील रक्तप्रवाहावरही होतो, त्यामुळे ही सवय तुम्ही त्वरीत सोडावी. जाडसर उशीवर झोपल्यामुळे मेंदूपर्यंत नीट रक्तपुरवठा होत नाही आणि त्यामुळे केसांनाही योग्य पोषण मिळत नाही; यामुळे केसगळतीचे प्रमाणही वाढते आणि त्याशिवाय त्वचाही खराब झालेली दिसून येते. जर उशी बरोबर नसेल तर तुम्हाला डिस्टर्ब स्लीपची समस्या होऊ शकते. जर तुम्ही उशीचा वापर करत नसाल तर तुम्हाला चांगली झोप येऊ शकते, ज्यामुळे तुमचा सर्व थकवा दूर होतो, तणाव कमी होतो. अर्थातच तणाव आणि थकवा तुम्हाला नसेल तर मानसिक आरोग्य चांगलं राहतं.