खराब जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि त्यामुळे सतत वाढणारे वजन हे सध्या अगदी तरुण पिढीसमोरही मोठे आव्हान ठरतेय. वाढलेल्या वजनाचा परिणाम केवळ व्यक्तिमत्त्वावर न पडता डायबेटिस, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांसारखे गंभीर आजारही त्यासह जोडले जात आहेत. पण, डाएट व वर्कआऊटचे रूटीन कितीही काटेकोरपणे फॉलो केले तरीही शरीराचे वजन नियंत्रणात येत नाही, अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. वाढत्या वजनामुळे प्रत्येक जण त्रस्त आहे. महिला या समस्येत आघाडीवर आहेत. खूप प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही. त्यामध्ये नक्की काय चूक होतेय, याच विषयावर अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, “शरीरासाठी आवश्यक मात्रेपेक्षा कमी कॅलरीजचे सेवन केल्याने शरीर दुसऱ्या गोष्टींमधून कॅलरीज घेण्यास सुरुवात करते. त्याचा परिणाम असा होतो की, फॅट्स जाळण्याचे वा चरबी कमी होण्याचे प्रमाण कमी होतो आणि ती प्रक्रिया मंदावते. म्हणूनच वजनसुद्धा कमी होणे बंद पडते.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

सडपातळ शरीरासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी आहारातल्या काही चुका आवर्जून टाळायला हव्यात. डाएटिंग आणि एक्सरसाईज हा वजन कमी करण्यासाठी चांगला पर्याय आहे. एक्सरसाईज करणाऱ्यांच्या कॅलरीज बर्न होतात, शरीरावरची चरबी कमी होते, शरीर सुडौल होते. त्यासोबत हेल्दी, लो कॅलरीज डाएट घ्यायला हवा. रोजच्या आहारामधून साखर कमी करण्याचाही उपयोग होतो.

(हे ही वाचा : उपवास करण्यामुळे वजन कमी, रक्तातील साखर अन् कोलेस्ट्रॉल कमी होतं? तज्ज्ञ काय सांगतात…)

दररोज योग्य प्रमाणात जेवणे हा एक नित्य नियमाचा भाग करून घ्या. योग्य प्रमाणात घरचे जेवणे हे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला नक्कीच मदत करील. जेवण योग्य प्रमाणात तसे योग्य पद्धतीत असणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. जंक फूड पूर्णत: टाळून फक्त घरचे जेवण घ्या. वजन कमी करण्यासाठी सकस आहार घेणे फार महत्त्वाचे आहे. आहारात प्रथिने, हेल्दी फॅट्स, फायबर, मिनरल्स व जीवनसत्त्वे असलेले पदार्थ अधिक प्रमाणात घ्या.

जसजसा आपला ताण वाढतो तसे आपण जंक फूड्स, फॅट्स, कॅलरीज जास्त घेतो. कॉर्टिसॉल हार्मोन्स नीट काम करीत नाहीत. मग अतिरिक्त कॅलरीज चरबी म्हणून पोटाभोवती जमा होऊ लागते. परिणामी झोप कमी लागते. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांमध्ये ही समस्या सर्वांत जास्त आढळते.

कमी झोप ही आजकाल अनेकांची समस्या आहे. झोप नीट झाली नाही, तर शरीरामध्ये चरबी जमा होण्यास सुरुवात होते. त्याशिवाय ज्या माणसाचे वजन वाढले आहे, त्यानेदेखील व्यायामासोबत रोज पुरेशी आणि योग्य वेळी झोप घेतली, तर त्याचे वजन कमी होण्यास मदत होते. म्हणून तुम्हाला जर खरोखरच वजन कमी करायचे असेल, तर किमान सात ते नऊ तास झोप घेणे बंधनकारक आहे.