तुम्ही गव्हाऐवजी सलग ३० मिलेट्स खाण्याचा विचार करत आहात का? असे केल्यास आरोग्यावर काय परिणाम होईल तेही जाणून घ्या.

याबाबत माहिती देताना होमिओपॅथिक डॉ. नंदिता शाह यांनी स्थापन केलेल्या शरण इंडिया ‘या’ आरोग्य जागरूकता पोर्टलनुसार मिलेट्सच्या सेवनामुळेूपोट फुगणे कमी होणे, लवकर पोट भरणे, काहीतरी खाण्याची लालसा कमी होणे, वजन कमी होणे, मानसिकदृष्ट्या अधिक स्पष्टता मिळणे, नियमित पोट साफ होणे, त्वचेचा पोत सुधारणे, अधिक उत्साही वाटणे यंसारख्या बदलांची अपेक्षा केली जाऊ शकते.

हेही वाचा – तुम्ही सोडायुक्त पेय पिता तेव्हा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून घ्या जाणून

हे बदल खरंच होतात का? (Are these true?)

मिलेट्स आजकाल त्याच्या आरोग्यदायी फायद्यांमुळे खूप लोकप्रिय आहे. तुमच्या आहारात मिलेट्स समाविष्ट करणे फायदेशीर ठरू शकते. कारण- ते फायबरने समृद्ध आणि मॅग्नेशियम, लोह व बी जीवनसत्त्वे यांसारख्या पोषक घटकांनी भरलेले असते.

“गव्हाऐवजी मिलेट्सचे सेवन करणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो,” असे मत झाइनोव्हा शाल्बी हॉस्पिटल, मुंबईच्या आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना व्यक्त केले. “गव्हामध्ये ग्लुटेन असते; जे तुमच्या शरीरासाठी अधिक हानिकारक असते. ग्लुटेनमुळे पोट फुगणे, वजन वाढणे, थकवा, बद्धकोष्ठता, अतिसार व मायग्रेन हे त्रास होऊ शकतात,”असे पटेल म्हणाले.

हेही वाचा – Methanol Poisoning : मिथेनॉल विषबाधा म्हणजे काय? मद्यपानामुळे विषबाधा होऊ शकते का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून….

नियमितपणे मिलेट्सचे सेवन केल्यास पचनशक्ती सुधारते आणि त्यामुळे आपले वजन नियंत्रित करण्यास मदत मिळते. मिलेट्स जास्त काळ पोट भरल्याची भावना निर्माण करते आणि दीर्घकाळ टिकणारी ऊर्जादेखील देऊ शकते. जर तुम्ही ग्लुटेनयुक्त आहाराचे सेवन केल्यास त्रास होत असेल किंवा तुम्हाला सेलियाक रोग (celiac disease) असेल, तर तुम्ही गव्हासह ग्लुैटेन असलेल्या गोष्टी काटेकोरपणे टाळल्या पाहिजेत,” असे पटेल म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चवीबरोबर तडजोड न करता, तुम्ही मिलेट्सपासून विविध पदार्थ बनवू शकता. पण, तुमच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी तुमच्या आहारात कोणतेही महत्त्वपूर्ण बदल करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला गेलाय ना याची खात्री करा,” असे त्यांनी सांगितले.