डॉ. अविनाश सुपे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजातील पाच टक्के व्यक्तींना मुळव्याधीचा त्रास होऊ शकतो. स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत सर्वांनाच याचा त्रास उदभवू शकतो. म्हणून आज आपण प्रथम १) मूळव्याध म्हणजे काय?, २) मूळव्याध का होते?, ३)

मूळव्याध कुणाकुणाला होऊ शकते? ४) मूळव्याध टाळता येते का? या मूळ प्रश्नांचा आणि त्यानंतर हल्ली नवीन लेसर उपचार पद्धती आली आहे ह्या बाबतीत माहिती घेऊया.

मूळव्याध म्हणजे काय?

गुदद्वारात आतल्या बाजूला अंर्तत्वचेखाली रक्तवाहीन्यांचे पुंजके नेहमी एखाद्या कुशन प्रमाणे काम करत असतात. जेव्हा ह्या पुंजक्यांची वाढ होऊन गाठ होते तेव्हा त्याला मूळव्याध असे म्हणतात. घड्याळ्यातील तीन, सात व अकरा वाजण्याच्या ज्या जागा असतात, त्या जागी मूळव्याध आढळून येते. सुरुवातीस ही गाठ गुदव्दारात आतच असते. नंतर फक्त शौचाच्यावेळी मूळव्याध बाहेर येते किंवा येतात व काही वेळा हाताने आत ढकलावे/ ढकलाव्या लागतात. एक वेळ अशीही येते जेव्हा ते बाहेरच राहते व त्यातील रक्तवाहिन्या गोठतात . ह्यालाच thrombosed piles असे म्हणतात .

हेही वाचा >>> रात्री १०- ११ वाजता झोपत असाल तर जेवणाची योग्य वेळ कोणती? आहारतज्ज्ञांनी सोडवलं कोडं, जाणून घ्या पचनाचा फंडा

मूळव्याध का होते?

गर्भावस्थेत बऱ्याच स्त्रियांना मूळव्याधीचा त्रास होतो परंतु मुले झाल्यानंतर हा त्रास कमी होतो. वयानुसार प्रौढ वयात (सर्वसाधारणपणे वयाच्या ३४-४०) किंवा आजाराने क्षीण झालेल्या व्यक्तीच्या अंगातील शक्ती कमी होते. त्यामुळे गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांच्या पुंजक्यांना पकडून ठेवणाऱ्या स्नायूंमधील ताकद कमी होते, स्नायू सैल पडतात. व रक्तवाहिन्यांच्या पुंजक्यांची गाठ खाली सरकते व मूळव्याध होते. या फुगलेल्या गाठीतील रक्तवाहिन्यांवर कडक संडासचा दाब आल्यास (जो संडासला जोर केल्यामुळे येतो) त्या फुटू शकतात व शौचामधून रक्त पडू लागते. साधारणपणे आई वडिलांना मुळव्याधीचा त्रास असल्यास तो मुलांनादेखील होतो.

मूळव्याध झाली हे कसे ओळखावे?

मूळव्याधीमध्ये शौचाच्या जागी सहसा दुखत नाही किंवा दुखल्यास किंचीत दुखते. भरपूर रक्त जाते- शौचाच्या आधी, बरोबर किंवा नंतर केव्हाही रक्ताची धार लागते किंवा थेंब थेंब रक्त पडण्यास सुरुवात होते, तेव्हा समजावं मूळव्याध झाली आहे.

शौचानंतर एकदम रक्ताची पिचकारी उडणे, (splash in pan ). केव्हा केव्हा या पुंजक्यांना सूज येते, त्यामुळे दुखायला लागतात. केव्हा केव्हा या पुंजक्यातील रक्तवाहिन्यामध्ये गुठळी तयार होते व Thrombosis होऊन भयंकर वेदना होऊ शकतात.

हेही वाचा >>> मद्यपान न करताही यकृताला सूज येण्याचा धोका! डॉक्टर सांगतात, आहार कसा असावा? काय खावं, काय टाळावं?

मुळव्याधीवरील उपाय

१. शौचास मऊ होण्यासाठी बरेच द्रव प्या आणि भरपूर फायबर (कोंडा एन काढलेली चपाती, भाकरी आणि फळे व पालेभाज्या) खा

२. खाज सुटणे आणि वेदना कमी करण्यासाठी उबदार पाण्याने अंघोळ करा.

३. गाठी सुजल्यास अस्वस्थता कमी करण्यासाठी टॉवेलमध्ये गुंडाळलेला आईस पॅक वापरा.

४. बाहेर आलेल्या गाठी हळूवारपणे परत आत ढकलणे.

५. आपले गुदद्वार स्वच्छ आणि कोरडे ठेवणे.

६. नियमित व्यायाम करणे

मूळव्याधीसाठी रुग्णालयात उपचार

खाण्यामध्ये करायच्या बदलाबरोबर शौचास कडक होऊ नये यासाठी अनेक औषधे दिली जातात. तसेच आत लावण्यासाठी औषधे दिली जातात. अनेक व्यक्तीमध्ये ह्यामुळे रक्त बंद होते. परंतु रक्तस्त्राव सुरु राहिल्यास पुढील उपाय करावे लागतात. त्यामध्ये दुर्बिणीद्वारे रबर बँड बंधन, स्क्लेरोथेरपी व इन्फ्रारेड लाइटने गोठवणे ह्या प्रक्रिया बाह्य रुग्ण विभागात केल्या जाते. ह्या सर्वांमध्ये उपलब्ध असलेला नवा उपचार म्हणजे लेसर.

लेसर उपचार, ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी मूळव्याधीच्या उपचारांसाठी लेसर तंत्रज्ञानाचा वापर करते. मूळव्याधासाठी लेसर उपचार करताना रुग्णाला आंशिक भूल देऊन प्रभावित भागात लेसर फायबर टाकले जाते. लेसर केंद्रित ऊर्जा उत्सर्जित करते, जे मूळव्याध ऊतींना कापू शकते, ते बाष्पीभवन करू शकते किंवा एकत्र करू शकते. लेसर ऊर्जेचा वापर रक्तवाहिन्या सील करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे मूळव्याध ऊतींमध्ये रक्त प्रवाह कमी होण्यास मदत होते. या प्रक्रियेमुळे मूळव्याध संकुचित होऊ शकतो. लेसर उपचार त्याच्या अचूकतेसाठी ओळखले जातात, ज्यामुळे सर्जन अचूकतेसह विशिष्ट क्षेत्रांना लक्ष्य करू शकतो. पारंपारिक शस्त्रक्रिया पद्धतींच्या तुलनेत हे कमी आक्रमक ( Minimally Invasive) मानले जाते.

लेसर प्रक्रिया बऱ्याचदा पारंपारिक शस्त्रक्रिया पद्धतींच्या तुलनेत कमी वेदना/ त्रास देतात आणि रुग्ण लवकर पुन्हा कार्यक्षम होऊ शकतात. मूळव्याध मोठी असेल तर लेसरमुळे ती पूर्णपणे काढणे सुध्दा शक्य आहे. लेसर मुळे रक्त कमी जाते. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की लेसर उपचारांचे फायदे आहेत, परंतु ते मूळव्याधीच्या सर्व प्रकार आणि ग्रेडसाठी योग्य असू शकत नाही. उपचारांची निवड स्थितीच्या तीव्रतेवर अवलंबून असते आणि त्याबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे. कोणत्याही वैद्यकीय प्रक्रियेप्रमाणेच, संभाव्य जोखीम आणि गुंतागुंत आहेत आणि वैयक्तिक प्रतिसाद भिन्न असू शकतात. लेसरचा वापर चुकीचा झाल्यास त्यामुळे जखमा होऊ शकतात व त्या भरण्यास बराच अवधी लागू शकतो. म्हणूनच लेज़र ने उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी विशेष प्रशिक्षण घेतले पाहिजे. जर या उपचारांनी फायदा झाला नाही तर मूळव्याध काढण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता असू शकेल. परंतु हल्ली नवीन उपचारपद्धतीनी शस्त्रक्रियेची गरज खूप कमी झाली आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thrombosed piles causes treatment for thrombosed piles treatment methods for thrombosed piles hldc zws
First published on: 28-01-2024 at 17:02 IST