Can Diabetes Patients Eat Dry Fruits: डायबिटीज हा जगभरातील कोट्यवधी नागरिकांना छळणारा आजार आहे. डायबिटीज असल्यास जेवणानंतर ब्लड शुगरचे प्रमाण बूस्ट होण्याचा धोका असतो. म्हणूनच जेवणाच्या आधी निदान अर्धा तास अंतर ठेवून गोळ्या- औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो. केवळ डॉक्टरांची औषधेच नाही तर काही घरगुती उपायांनी सुद्धा आपण रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवू शकता. एका आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासात दिलेल्या माहितीनुसार जेवणाच्या अर्धा तास आधी बदामाचे सेवन केल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. पण मंडळी केवळ बदामच नव्हे तर त्याहूनही अधिक फायदेशीर असणारा एक सुका मेवा व त्याचे डायबिटीज रुग्णांना होणारे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपोलो हॉस्पिटल ग्रेटर नोएडाचे डायबिटीज व थॉयराइड स्पेशलिस्ट डॉक्टर बीके राय यांच्या माहितीनुसार, सुका मेवा हा शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अमृतासमान काम करू शकतो. जर आपल्याला डायबिटीज असेल तर आपण बदामच नव्हे तर अक्रोडाचे सेवन सुद्धा करू शकता. ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम व आक्रोड यापैकी नेमका कोणता सुका मेवा फायदेशीर आहे हे जाणून घेऊयात..

डायबिटीज असल्यास बदाम खावे की आक्रोड? (Eat almonds or walnuts to control diabetes)

पोषक तत्वांचे मुबलक प्रमाण असणारे बदाम व आक्रोड दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीरच आहेत, आपण आक्रोडचे फायदे पाहिल्यास यामध्ये मँगनीज, मॅग्नेशियम, तांबे, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम , व्हिटॅमिन बी ६, फोलेट, थियामिन अशी सत्व असतात.तर बदामाच्या ७४ टक्के कार्बोहायड्रेट व १३ टक्के प्रोटीन असते.

दोघांमध्ये सर्वात मोठा फरक हा की, बदामाच्या असणारे अनसॅच्युरेटेड फॅट्स हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, बदामातील फॅट्स कोलेस्ट्रॉल नियंत्रणात मदत करतात. तर बदामातील व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम हे हाडांच्या मजबुतीचा भाग बनतात, बदामाच्या सेवनाने रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.

दुसरीकडे आक्रोडमध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल सुद्धा नियंत्रणात राहू शकते. आक्रोडमध्ये असलेल्या ओमेगा ३ फॅटी ऍसिडने मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते व डायबिटीजचा धोका सुद्धा कमी होतो. आक्रोड हे एक असे सुपरफूड आहे ज्यामुळे हृदयापासून मेंदुपर्यंत सर्व काही सुरळीत काम करू शकते.

हे ही वाचा<<तुमच्या वयानुसार दिवसाला किती कॅलरीज खायला हव्यात? परफेक्ट बॉडीसाठी पाहा सोपा तक्ता

आक्रोड की बदाम, डायबिटीज रुग्णांसाठी बेस्ट पर्याय काय? (Which Dry Fruit is best walnuts or almonds)

जर आपल्याला तुलनाच करायची असेल तर एक टक्का अधिक गुण हा आक्रोडला द्यावा लागेल. बदामाच्या तुलनेत आक्रोडचे पोषक घटक अधिक असतात. आक्रोडमधील ओमेगा ३ फॅटी ऍसिड हे डायबिटीजचा धोका कमी करण्यात फायदेशीर ठरतात. रोज साधारण एक मूठभर आक्रोड खाल्ल्यास शरीर सुदृढ राहण्यास मदत होऊ शकते.

हे ही वाचा<< काजू- बदाम, मनुके भिजवून खावेत की सुके? सर्वाधिक पोषणासाठी ‘हा’ मार्ग आहे बेस्ट

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज लागल्यास वैद्यकीय सल्ला घ्या)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Walnuts vs almonds which dry fruit is better for diabetes how to control blood sugar know from expert svs
First published on: 03-02-2023 at 14:41 IST